Back
नागपुर के पारशिवनी में पुल से कार गिरने से 8 घायल, दो की हालत गंभीर
AKAMAR KANE
Feb 20, 2026 13:18:12
Nagpur, Maharashtra
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात येणाऱ्या महादुला–चिंचोली मार्गावरील पुलावर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाखाली कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात कारमधील 8 प्रवाशांपैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, सावली ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या महादुला–चिंचोली मार्गावरून गुरुवारी सायंकाळी MH-CB 7973 क्रमांकाची कार जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार पुलावरून खाली पडली. या कारमध्ये 4 महिला, 4 पुरुष आणि दीड वर्षाचे एक बालक प्रवास करत होते. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना बाहेर काढून पारशिवनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे, तर किरकोळ जखमींवर पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowFeb 20, 2026 15:35:400
Report
PNPratap Naik1
FollowFeb 20, 2026 14:00:360
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 20, 2026 13:51:020
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 20, 2026 13:45:490
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 20, 2026 13:35:220
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 20, 2026 13:15:150
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 20, 2026 12:34:090
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 20, 2026 11:55:060
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 20, 2026 11:49:220
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 20, 2026 11:47:170
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 20, 2026 11:46:170
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 20, 2026 11:32:040
Report
PNPratap Naik1
FollowFeb 20, 2026 11:23:320
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 20, 2026 11:20:440
Report