Back
कल्याण डोंबिवली में 5000 करोड़ के विकास प्रकल्प, मेट्रो-12 और रिंगरोड पर तेजी
ABATISH BHOIR
Feb 20, 2026 11:49:22
Kalyan, Maharashtra
कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकास प्रकल्पांसाठी तब्बल पाच हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दौर्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते. दुसरा पलावा पूल, मेट्रो-१२ प्रकल्प, तिसरा पत्री पूल, कल्याण पूर्व पश्चिम जोडणारा वालधुनी पूल आणि कल्याण रिंगरोड विकास प्रकल्पांची सविस्तर पाहणी करण्यात आली. विशेषतः रिंगरोड प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी येत्या चार पाच दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. प्रकल्पांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करून कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कल्याण डोंबिवली परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता हे पूल व रस्ते प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. मेट्रो-१२ प्रकल्पामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून, पूर्व पश्चिम जोडणी सुलभ होणार आहे. लवकरात लवकर ही सर्व कामे पूर्ण करून कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीमधून दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. विकासकामांमुळे परिसराच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याच बरोबर कल्याण डोंबिवली करांच्या सेवेत १०० नवीन ई बस लवकरच दाखल होतील अशीही माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowFeb 20, 2026 13:51:020
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 20, 2026 13:45:490
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 20, 2026 13:35:220
Report
AKAMAR KANE
FollowFeb 20, 2026 13:18:120
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 20, 2026 13:15:150
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 20, 2026 12:34:090
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 20, 2026 11:55:060
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 20, 2026 11:47:170
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 20, 2026 11:46:170
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 20, 2026 11:32:040
Report
PNPratap Naik1
FollowFeb 20, 2026 11:23:320
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 20, 2026 11:20:440
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 20, 2026 10:34:230
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 20, 2026 10:31:480
Report