Back
कल्याण-डोंबिवली में छात्रों के बैंक खातों से लाखों की ठगी, 50–60 छात्र फंस गए
ABATISH BHOIR
Mar 04, 2026 10:48:26
Kalyan, Maharashtra
कल्याणात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांवर लाखोंची उलाढाल,40 ते ६० विद्यार्थ्यांची ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक.
विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनीचीदेखील फसवणूक.
पालकांना घाबरून काही विद्यार्थी समोर येण्यास घाबरतात
ANC- कल्याण डोंबिवली परिसरात १८ ते १९ वयोगटातील विद्यार्थ्यांना ट्रेडिंगच्या आमिषाने गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. ठगांनी विद्यार्थ्यांकडून विविध कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर बँक खाती उघडली आणि त्या खात्यांमधून लाखो रुपयांची उलाढाल केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात सुमारे ५० ते ६० विद्यार्थी फसवणुकीचे बळी ठरल्याची माहिती समोर आली आहे.काही विद्यार्थ्यांना त्यांच्या परिचित मित्रांमार्फत ऑनलाइन ट्रेडिंग’मधून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. यासाठी बँक खाते उघडण्याची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांकडून आधार कार्ड, पॅन कार्डसारखी महत्त्वाची कागदपत्रे घेतली गेली. त्यानंतर संबंधित खात्यांमधून लाखो रुपयांची व्यवहार उलाढाल झाल्याचे दोन वर्षांनी विद्यार्थ्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत महेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना घेऊन परिमंडळ ३ चे उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या खात्यांचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी उपायुक्त झेंडे यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यक्तीला आपली वैयक्तिक कागदपत्रे, बँक तपशील किंवा ओटीपी देऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 04, 2026 13:34:260
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 04, 2026 13:31:320
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 04, 2026 13:00:280
Report
SNSWATI NAIK
FollowMar 04, 2026 12:35:100
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 04, 2026 12:15:440
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 11:45:420
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 04, 2026 11:17:110
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 04, 2026 11:01:270
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 10:32:180
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 04, 2026 10:01:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 10:00:580
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 09:46:390
Report
PNPratap Naik1
FollowMar 04, 2026 09:33:170
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 09:33:020
Report
