Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421506

बदलापूर के स्त्री बीज विक्री प्रकरण: डॉक्टर अमोल पाटिल अदालत में हाजिर

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 04, 2026 13:31:32
Ambernath, Maharashtra
बदलापूर के स्त्री बीज विक्री प्रकरण: डॉक्टर अमोल पाटील याला पोलिसांनी केलं अंबरनाथ कोर्टात हजर अमोल पाटील याला कोर्टाने सुनावली पाच दिवसांची पोलीस कोठडी या प्रकरणात आता डॉक्टर अमोल पाटील याचा कडून मोठ्या खुलासा होण्याची शक्यता
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Mar 08, 2026 14:47:09
0
comment0
Report
UPUmesh Parab
Mar 08, 2026 14:32:49
Oros, Maharashtra:आज 8 मार्च महिला दिनापासून सुरू झालेल्या जल महोत्सव येत्या 22 मार्च जागतिक जल दिनापर्यंत सुरू राहणार आहे. कुर्ली येथील आयोजित कार्यक्रमात जल कुंभाची मिरवणूक, जलकुंभ पूजन आदी कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्र्यांसमवेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. जल जीवन मिशनमध्ये महाराष्ट्र नंबर एक वर आहे. येत्या सहा महिन्यात महाराष्ट्रात शुध्द पेयजल प्रत्येक घरात पोहोचवणार आहोत. एकही घर यापासून वंचित राहणार नाही. जल जीवन मिशनची यशस्विता इतकी आहे की इतर देशदेखील आता त्याचे अनुसरण करू लागले आहेत. अशा शब्दात जल जीवन मिशन बाबत गौरव उद्गार केंद्रीय रेल्वे तथा जल आपूर्ति राज्यमंत्री व्हि. सोमण्णा यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील कुर्ली गावामध्ये जल महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी देखील मोदी सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी तब्बल 1 लाख 17 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. मोदीजी नेहमी रेल्वे रस्ते आणि पाणी योजनांना अग्रक्रम देतात. मोदीजींचे काम, व्हिजन विकसित भारत 2047 आपण पाहतो आहोत आणि यातून झालेला विकास केवळ महाराष्ट्र, कर्नाटक किंवा दक्षिण भारतातच नव्हे तर संपूर्ण देशात दृष्टीस पडत आहे, असे ते पुढे म्हणाले.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 08, 2026 14:15:53
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. विठूरायावर केशर आणि गुलालाची उधळण केल्यावर ” अवघा रंग एक झाला , रंगी रंगला श्रीरंग ” या अभंगाची प्रचिती आली. वसंतोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे रंगपंचमी. वसंत पंचमी पासून रंगपंचमी पर्यंत दररोज विठूरायाला पांढऱ्या पोशाखावर गुलाल टाकून पूजा केली जाते. सलग महिनाभर हा दिनक्रम सुरु असतो. या उत्सवाची सांगता रंगपंचमीला होते. रंगपंचमी दिवशी दुपारी 4.30 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पाद्यपुजा केली देवाच्या अंगावर केशरयुक्त रंग व गुलाल टाकण्यात आला. नंतर डफाची पुजा करुन नामदेव पायरी- तुकाराम भवन - पश्चिम द्वार - चौफाळा - पश्चिम द्वार - व्हीआयपी गेट - नामदेव पायरी अशी मंदिर प्रदक्षिणा करून डफाची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. सदर मिरवणुकीमध्ये रंगाची उधळण करून व मानकऱ्यांना प्रसाद देवून वसंतोत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी उत्साहात मंदीर समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
0
comment0
Report

AKAMAR KANE
Mar 08, 2026 14:01:50
Nagpur, Maharashtra:
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 08, 2026 13:48:04
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह चौथे दिवशी लोटांगण आंदोलन, लोहारडोंगरी खाण विरोध आणि जिल्ह्यातील मानव वन्यप्राणी संघर्ष निवारण्याच्या मागण्या रेटल्या अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष, वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू आणि ताडोबाच्या महत्त्वपूर्ण वन्यजीव कॉरिडोरला धोका निर्माण करणाऱ्या 'लोहारडोंगरी' खाण प्रकल्पाविरोधात इको-प्र संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाने आज चौथ्या दिवशी प्रवेश केला. या आंदोलनाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाला वन्यजीव रक्षणाप्रती लक्ष वेधण्यासाठी आज आंदोलनस्थळी 'लोटांगण आंदोलन' करण्यात आले. लोटांगण आंदोलन मधे सहभागी डझनभर आंदोलक सहभागी झाले होते. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प ते उमरेड-कऱ्हांडला तसेच नवेगाव-नागझिरा या अतिशय संवेदनशील व्याघ्र भ्रमणमार्गातील प्रस्तावित ‘लोहारडोंगरी’ लोहखनिज खाण रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या 'सेव्ह लोहारडोंगरी, सेव्ह ताडोबा' या ऑनलाईन मोहिमेला अभूतपूर्व यश मिळत आहे. अवघ्या काही दिवसांत या याचिकेने २५,००० स्वाक्षऱ्यांचा आकडा पार केला असून, हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आता जनचळवळ अधिक तीव्र झाली आहे. बाईट १) किशोर जामदार, आंदोलक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 08, 2026 13:00:21
Beed, Maharashtra:बीड: विवाहित महिला महीने में तीन बार बिक्री; जबरदस्ती तीन विवाह, लातूर के विवाहित महिला ने विष पिलाकर आत्महत्या का प्रयास... अहिल्यानगर में उपचार जारी। आंचलिक खबर: लालच के चलते मानवीय तस्करी का चौंकाने वाला मामला बीड जिले में सामने आया। लातूर जिले के एक गाँव की रहने वाली महज 23 वर्ष की विवाहित युवती की एक महीने में तीन जगह बिक्री कर उसे जबरदस्ती तीन बार विवाह कराए जाने की घटना सामने आई है। पुणे और तुळजापूर के एजेंटों ने लाखों रुपये का सौदा कर युवती का व्यापार किया गया, ऐसा आरोप है। आष्टी में भी विवाह लाने का प्रयास हुआ। इसके बाद मानसिक उत्पीड़न और इस अमानवीय प्रथा से तंग आकर पीड़िता ने विष पिलाकर आत्महत्या का प्रयास किया। उसके उपचार अहिल्यानगर जिले के मिरजगाव में चल रहे हैं। इस मामले में आष्टी पुलिस ने चार संदिग्धों के खिलाफ मामला दर्ज किया है और आगे की जाँच जारी है。
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 08, 2026 12:19:03
Dharashiv, Maharashtra:तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमीचा पारंपारिक उत्सव साजरा श्री तुळजाभवानीला नैसर्गिक रंग लावत करण्यात आली रंगपंचमी साजरी श्री तुळजाभवानी मंदिर येथे आज रंगपंचमीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळच्या अभिषेक पूजेनंतर देवीला पांढराशुभ्र शालू नेसविण्यात आला आणि त्यावर सप्तरंगांची उधळण करून रंगपंचमीचा धार्मिक सोहळा पार पडला. मंदिरातील महंत आणि पुजाऱ्यांनी देवीला रंग लावून पारंपरिक पद्धतीने पूजा केली. त्यानंतर पुजारी व भाविकांनी एकमेकांना रंग लावत रंगपंचमीचा आनंद व्यक्त केला. या उत्सवात प्रामुख्याने नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला. यावेळी महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, सहायक व्यवस्थापक अमोल भोसले, पुजारी तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.रंगपंचमीच्या निमित्ताने तुळजाभवानी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 08, 2026 10:46:45
Bhandara, Maharashtra:भंडारा शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागील पंधरा दिवसांपासून शहरात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दसरा मैदान येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. या पाहणीदरम्यान पाणी سाठवण टाक्यांमध्ये घाण, माती, लोखंडाचे कण आणि जीव जंतू आढळल्याने खळबळ उडाली है. भंडारा शहरात गेल्या १५ दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. नागरिकांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत भंडारा-गोंदिया लोकसभेचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दसरा मैदान परिसरातील जलशुद्धीकरण केंद्राची अचानक पाहणी केली. पाहणीदरम्यान पाणी साठवण टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण, माती, लोखंडाचे कण तसेच जीव जंतू आढळून आले. त्यामुळे नागरिकांना दिले जाणारे पाणी किती अस्वच्छ आणि धोकादायक आहे, हे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर जलशुद्धीकरण केंद्रातील मशिनरीमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचेही दिसून आले. या गळतीमुळे मशिनमधील ऑईल आणि ग्रीस पाण्यात मिसळत असल्याचा गंभीर प्रकार देखील उघड झाला. हेच दूषित पाणी शहरातील नागरिकांना पुरवले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत खासदार प्रशांत पडोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जलशुद्धीकरण केंद्राची तात्काळ स्वच्छता करण्याची मागणी केली आहे. तसेच संपूर्ण यंत्रणेची तांत्रिक तपासणी करून दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील खासदारांनी दिला आहे. दरम्यान, दूषित पाणी पुरवठ्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 08, 2026 10:17:37
Satara, Maharashtra:साताऱ्यातील सुरूर-वाई- पाचगणी-महाबळेश्वर- पोलादपूर रस्त्याचे मागील दीड वर्षापासून धीम्या गतीने काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या पाचगणी महाबळेश्वरच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप होत असून याच्या निषेधार्थ महाबळेश्वर बरोबरीने पाचगणी येथेही झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत आज 8 मार्चला महाबळेश्वर पाचगणी बंदची हाक देण्यात आली होती . पाचगणी महाबळेश्वर मधून जाणारा रस्ता तातडीने पूर्ण करावा. मागील दीड वर्षात रस्त्याच्या झालेल्या दयनीय अवस्थेमुळे याचा मोठा परिणाम पाचगणी शहरासह महाबळेश्वरला देखील बसलेला पाहायला मिळत आसल्याने आज महाबळेश्वर पाचगणी मध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद पाहायला मिळाला खरंतर शनिवार रविवार महाबळेश्वर येथे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते परंतु महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी अक्षरश आज या बंदच्या पार्श्वभूमीवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 08, 2026 10:02:19
Akola, Maharashtra:Anchor : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “सक्षम महिला – सुरक्षित राष्ट्र” या ब्रीदवाक्याखाली हा कार्यक्रम पार पडला. अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत महिला अधिकारीांनी पुढाकार घेत हा उपक्रम आयोजित केला होता. महिलांच्या सन्मान, सक्षमीकरण आणि सुरक्षित वाहतूक संस्कृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांवर कुटुंबासोबत समाजाचीही मोठी जबाबदारी असते, त्यामुळे सुरक्षित वाहन संस्कृती निर्माण करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. उपस्थित महिलांना रस्ता सुरक्षा नियमांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कारदेखील करण्यात आला. यावेळी वाहन चालवणाऱ्या काही महिलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेटचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमातून महिलांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 08, 2026 10:01:56
Beed, Maharashtra:बीड: अपघातात मुलगा गमावला… पण त्याचे अवयव दान करून दिले दुसऱ्याला जीवनदान; बीडच्या गाडे कुटुंबाचा हृदयस्पर्शी निर्णय दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र मुलाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवत त्याच्या कुटुंबाने घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये हळहळ व्यक्त होत असतानाच गाडे कुटुंबाच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बीडमधील संग्राम गाडे हा तरुण मित्रासोबत पुण्याकडे जात असताना बारामतीजवळ त्यांची दुचाकी अपघात झाला. या अपघातात संग्रामच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान संग्रामचा दुर्दैवी मृत्यू झाला. संग्रामचे वडील रमेश गाडे हे चहा विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलाच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र संग्राम या जगात कोणाच्या तरी रूपाने मुलगा जिवंत राहावा, या भावनेतून त्यांनी मोठा निर्णय घेतला. संग्राम ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर त्याच्या वडिलांनी आणि कुटुंबीयांनी अवयवदानासाठी होकार दिला. “माझा मुलगा गेला आहे, पण त्याचे अवयव दुसऱ्याला जीवन देतील तर त्याच्यापेक्षा मोठं समाधान नाही,” असे भावनिक शब्द संग्रामच्या वडिलांनी व्यक्त केले. जिल्हा रुग्णालयात सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संग्रामचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आला. तरुण मुलाच्या मृत्यूचे दु:ख सहन करत गाडे कुटुंबाने घेतलेल्या या निर्णयाने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि मानवतेचा खरा अर्थ पुन्हा एकदा समोर आला.
0
comment0
Report
Advertisement
Back to top