Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201

पेण बाल्गंगा प्रकल्पग्रस्तों के आमरण उपोषण का सुनील तटकरे mediation से समापन

PPPRAFULLA PAWAR
Mar 04, 2026 11:01:27
Chendhare, Maharashtra
पेणच्या बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण स्थगित. खासदार सुनील तटकरे यांच्या मध्यस्थी नंतर पेणच्या बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांनी आपले आमरण उपोषण आज सहाव्या दिवशी स्थगित केले. सुनील तटकरे यांनी आज आंदोलकांची भेट घेतली. प्रकल्प ग्रस्तांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असून पुनर्वसन खात्याचे मंत्री मकरंद पाटील यांच्याशी बोलून याबाबत बैठक आयोजित करू असं आश्वासन सुनील तटकरे यांनी दिलं. प्रकल्पात न वापरलेली जमीन परत करावी आणि सातबारा कोरा करावा, योग्य मोबदला आणि पुनर्वसन अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Mar 04, 2026 12:15:44
Nashik, Maharashtra:देशातील अत्याधुनिक महामार्ग म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग आता सुरक्षिततेच्या प्रश्नामुळे चर्चेत आला आहे. अपघातांसोबतच आता लूटमार आणि मारहाणीच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. नुकत्याच सिन्नरजवळ महिला प्रवाशांना मारहाण करून दागिने चोरी केल्याच्या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वार सोमवार ... मुंबई परिसरातील काही भाविक महिला घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी उल्हासनगर हून संभाजीनगर कडे जात होत्या.... पहाटे तीन वाजता सिन्नर जवळील कोनांबे शिवारात त्यांची गाडी काही लोकांनी अडवली कारची काच फोडत यात बसलेल्या तीन महिलांना मारहाणी केली.. त्याच्याजवळील सोन्याचांदीचे दागिने रोख रक्कम लुटत 70 हजाराची रक्कम लुटून नेलीये. या प्रकरणात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या घटना समोर आल्या आहेत. वाहन अडवून लूटमार प्रवाशांच्या मारहाणीच्या घटना वाहन चोरी अपघातानंतर लुटमार दरोड्याचे प्रयत्न गुन्हेगारीचे कारणे 1)महामार्गावर रात्रीच्या वेळी कमी वर्दळ, 2)लांब अंतरावर पोलीस मदत उपलब्ध नसणे 3) निर्जन भागांमुळे गुन्हेगारांना संधी पोलीस सूत्रांनुसार समृद्धी महामार्गावर आतापर्यंत डझनभरांहून अधिक गुन्हेगारी घटना नोंदवण्यात आल्या आहेत..सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, पेट्रोलिंग आणि आपत्कालीन मदत व्यवस्था वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे वार 2 सागर वाकचौरे अध्यक्ष नाशिक पर्यटन असोसिएशन अरुण सूर्यवंशी सचिव अत्याधुनिक सुविधा असलेल्या समृद्धी महामार्गावर अपघातांसोबतच गुन्हेगारी घटनाही वाढत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.समृद्धी महामार्ग खरोखर सुरक्षित आहे का, असा सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 04, 2026 11:45:42
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सध्या जग एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे आणि त्याचे पडसाद थेट तुमच्या-आमच्या स्वयंपाकघरापासून ते शेअर बाजारापर्यंत उमटत आहेत. महागाईचा बॉम्ब फुटण्याच्या भीतीने सामान्य माणूस हादरला आहे. शेयर बाजार पडतोय तर धान्य बाजारात आतापासूनच भाव वाढू लागलेत. नेमकं काय घडतंय? पाहुयात आमचा हा विशेष रिपोर्ट युद्धाचा सावट जगभरात पसरले त्यात बाजारपेठ ही त्यातून सुटल्या नाही जवळपास धान्य बाजार असो की सोन्याचा बाजार sगळीकडेच युद्धाचे पडसाद उमटत आहे, त्यामुळं धान्य बाजारातही संभ्रमाचं वातावरण आहे. युद्धामुळे आयात-निर्यात विस्कळीत झालीय. स्वयंपाकाच्या तेलापासून ते डाळींपर्यंतच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच सामान्य गृहिणींचं बजेट कोलमडलंय. अनेक ठिकाणी लोकांनी महिनाभराचा साठा आताच करून ठेवण्यासाठी गर्दी केलीय. व्यापारी सुद्धा चिंता असल्याचं कबूल करताय मात्र घाबरू नये लोकांनी संयम बाळगावा बाजार पेठ इतक्या लवकर अस्थिर होणार नाही असं व्यापारी संघटना सांगतेय.. शेअर बाजारात पुरता गोंधळ उडाला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतल्याने बाजार कोसळलाय. सामान्य गुंतवणूकदार संभ्रमात आहे - शेअर्स विकून बाहेर पडावं की 'होल्ड' करावं? उलाढाल थांबली नसली, तरी भीतीचा पारा मात्र चढलेलाच आहे तज्ञ मात्र घाबरू नका, सावध राहा अफवांवर विश्वास ठेवू नका असा सल्ला देताय.. यावर युद्ध अभ्यासक ही 2 आठवाड्यापेक्षा जास्त युद्ध चालले तर काही परिणाम होईल त्यामुळं लोकांनी घाबरू नये, बाजारपेठ, गुंतवणूक परिणाम दिसतोय, मात्र काही दिवसात हे सगळं संपले तर परिणाम दिसणार नाही त्यामुळं युद्धाचा कालावधी आपल्याला हा विशेष घटक आहे अस सांगताय... युद्ध रणांगणावर असो वा सीमेवर, त्याची किंमत नेहमी सामान्य माणसालाच मोजावी लागते. सध्याची परिस्थिती कठीण आहे, पण अफवांना बळी न पडता संयम राखणं गरजेचं आहे. सुरक्षित राहा आणि लक्ष ठेवने इतकंच सर्वसामान्यांचा हातात आहे...
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 04, 2026 10:48:26
Kalyan, Maharashtra:कल्याणात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांवर लाखोंची उलाढाल,40 ते ६० विद्यार्थ्यांची ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक. विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनीचीदेखील फसवणूक. पालकांना घाबरून काही विद्यार्थी समोर येण्यास घाबरतात ANC- कल्याण डोंबिवली परिसरात १८ ते १९ वयोगटातील विद्यार्थ्यांना ट्रेडिंगच्या आमिषाने गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. ठगांनी विद्यार्थ्यांकडून विविध कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर बँक खाती उघडली आणि त्या खात्यांमधून लाखो रुपयांची उलाढाल केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात सुमारे ५० ते ६० विद्यार्थी फसवणुकीचे बळी ठरल्याची माहिती समोर आली आहे.काही विद्यार्थ्यांना त्यांच्या परिचित मित्रांमार्फत ऑनलाइन ट्रेडिंग’मधून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. यासाठी बँक खाते उघडण्याची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांकडून आधार कार्ड, पॅन कार्डसारखी महत्त्वाची कागदपत्रे घेतली गेली. त्यानंतर संबंधित खात्यांमधून लाखो रुपयांची व्यवहार उलाढाल झाल्याचे दोन वर्षांनी विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना घेऊन परिमंडळ ३ चे उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या खात्यांचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी उपायुक्त झेंडे यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यक्तीला आपली वैयक्तिक कागदपत्रे, बँक तपशील किंवा ओटीपी देऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 04, 2026 10:01:40
Satara, Maharashtra:सातारा -साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीत आज भावनांचा एक हळवा क्षण अनुभवायला मिळाला. कोडोली येथील छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.यावेळी खासदार उदयनराजे भोसले स्वतः उपस्थित होते. शिल्पासमोर उभे राहून वडिलांच्या स्मृतींना नमन करताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले. काही क्षण ते निःशब्द उभे राहिले… चेहऱ्यावर दुःख, डोळ्यांत आठवणी आणि मनात वडिलांची उणीव स्पष्ट जाणवत होती.वडिलांचा हात डोक्यावर नसल्याची जाणीव आज पुन्हा एकदा तीव्र झाली… प्रतापसिंह महाराजांच्या शिल्पाकडे पाहताना उदयनराजे भावूक झाले. त्या क्षणी एक खासदार नव्हे, तर आपल्या वडिलांची आठवण काढणारा मुलगा दिसत होता.या वेळी सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण वातावरणात एक भावनिक शांतता पसरली..प्रतापसिंह महाराजांची परंपरा, त्यांचा वारसा आणि त्यांची शिकवण पुढे नेण्याचा निर्धार करत उदयनराजेंनी वडिलांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले…
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 04, 2026 10:00:58
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:श्वासनलिकेत अडकलेली पिन यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून काढली बाहेर अत्यंत कठीण व आव्हानात्मक शस्त्रक्रिया घाटी रुग्णालयात यशस्वी ANC : छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच घाटी येथील कान-नाक-घसा विभागाने अत्यंत कठीण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आहे. शहरातील गणेश कॉलनीत राहणाऱ्या एक १६ वर्षीय मुलगी हिच्या श्वास नलिकेत चुकून सेफ्टी पिन अडकली होती. स्कार्फ नीट करताना तोंडात धरलेली पिन अचानक आत गेल्याने तिला तीव्र खोकला व छातीत वेदना सुरू झाल्या. त्यानंतर तातडीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक्स-रे तपासणीत डाव्या बाजूच्या मुख्य श्वासनलिकेत पिन अडकलेली असल्याचे स्पष्ट झाले. परिस्थिती गंभीर असल्याने त्वरित शस्त्रक्रियेचा निर्णय वरिष्ट डॉक्टरांकडून घेण्यात आला. विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांनी ब्रॉन्कोस्कोपीद्वारे अत्यंत कौशल्याने पिन बाहेर काढली. डीन डॉ. सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून श्वसनाचा त्रास पूर्णपणे कमी झाला आहे. वेळीच उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 04, 2026 09:33:17
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर जिला परिषद के अध्यक्ष पद की चुनावी हलचल अब तेज हो चली है। सर्वाधिक 20 सीटें जीतकर राष्ट्रीय कांग्रेस पार्टी जिला परिषद में पहली जगह पर है, फिर भी अध्यक्ष पद भाजपा ने आक्रामक रणनीति अपनाई है। गोळखुल/गोळखू? निवडणूक और कोल्हापुर जिला बँक चुनाव को देखते हुए भाजपा ने राष्ट्रवादी को घेरने की रणनीति की चर्चा है। कोल्हापुर जिला परिषद में संख्या बल देखें तो— राष्ट्रवादी कांग्रेस 20, कांग्रेस 15, भाजपा 12, शिवसेना (शिंदे गट) 9, जनसुराज्य पक्ष 6, राजर्षी शाहू आघाडी (यड्रावकर गट) 4, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1। राष्ट्रवादी सबसे बड़ा दल है, पर अध्यक्ष पद पाने के लिए भाजपा ने अलग रणनीति बनाई है; भाजपा के 12 और जनसुराज्य पक्ष के 5 सीटों के बल पर अध्यक्ष पद पाने की कोशिश की जा रही है। राष्ट्रवादी ने कुछ जगह युति धर्म नहीं निभाने के आरोप लगाए हैं, इस पर भाजपा और जनसुराज्य पक्ष ने कहा है कि राष्ट्रवादी अध्यक्ष पद पर कब्जा करने के लिए घेराबंदी कर रहे हैं। अध्यक्ष पद पर राष्ट्रवादी का नैसर्गिक दावा माना जा रहा है, पर संख्या-गणित और भविष्य की राजनीतिक समीकरणों को देखते हुए भाजपा आक्रामक भूमिका निभा रही है। कोल्हापुर जिला परिषद अध्यक्ष पद की चुनावी जंग अब सिर्फ जिले तक सीमित नहीं रहेगी, बल्कि गोगुळ और जिला बैंक की चुनावी रंगत भी तय करेगी। अब राष्ट्रवादी कांग्रेस अगली चाल क्या खेलेगी, यह सबकी नजरों में है।
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 04, 2026 09:33:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यभर काल धुळीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना, छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र या सणाला गालबोट लागला आहे. संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील कमळापूर येथे अंगावर पाणी ऊडाल्याचा तर शहरातील गारखेडा परिसरातील इंदिरानगरमध्ये अंगावर कलर टाकल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. कमलापूर येथील घटनेत चार जखमी झाले असून, इंदिरानगरच्या घटनेत दोन जखमी आहे. इंदिरानगर येथील टोळक्याने परिसरातील गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. तसेच कमलापूर येथील मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. दोन्ही घटनांबाबत पोलिसांकनडून गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 04, 2026 09:02:35
Kalyan, Maharashtra:KDMC मुख्यालयाबाहेर डॉक्टर-नर्सेसचे कामबंद आंदोलन. चार महिन्याचा पगार दिलाने काम बंद आंदोलन. आमचा घर कसे चालणार, आमचे घराचे हप्ते कसे फेडणार.. कल्याण डोंबिवलीकरांसाठी धक्कादायक बातमी… कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाबाहेर डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू करत कामबंदचा इशारा दिला आहे. तब्बल चार महिन्यांचा पगार थकीत असल्याचा आरोप करत प्रशासन आणि लोकप्रतिनिधीजवर संताप व्यक्त करण्यात आला. जवळपास २५० ते ३०० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले असून आरोग्य सेवेवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली शहरातील आरोग्य व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली है. राष्ट्रीय आरोग्य अभियान अन्तर्गत कार्यरत कंत्राटी डॉक्टर, नर्सेस, सिस्टर्स और अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केडीएमसी मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन छेडले आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मागील चार महिन्यांपासून त्यांना वेतन मिळालेले नाही. वारंवार महानगरपालिकेला पत्रव्यवहार करूनही कोणताही ठोस निर्णय घेता आला नाही. आंदोलनाच्या वेळी एका कर्मचाऱ्यांना चक्कर देखील आल्याने संताप व्यक्त केला गेला. “अनेक वर्षांपासून आम्ही नागरिकांची सेवा करत आहोत. मात्र चार महिन्यांपासून पगार नाही. बँकेचे हप्ते, घरखर्च, औषधे – हे सगळं कसं भागवायचं?” महापौरांनी “माहिती नाही” असे उत्तर दिल्याने नाराजी पसरली. “गरज असते तेव्हा आरोग्य shibirांसाठी आम्हाला रात्रंदिवस रस्त्यावर उभं केलं जातं, पण आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातं,” आंदोलनकर्त्यांनी कहा. केडीएमसीच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना मुंबईकडे पाठवले जात असल्याची परिस्थिती आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांनीही कामबंद आंदोलन सुरू केलं असून आरोग्य सेवा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जाते.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 04, 2026 08:48:07
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 04, 2026 08:47:18
Akola, Maharashtra:अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय येथे कार्यरत असताना शासनाची रक्कम भरण्यास विलंब झाल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालय लोहो, जि. यवतमाळ येथील सहाय्यक अधीक्षक प्रमोद देंगे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. शासनाच्या कामासाठी खर्च झालेल्या रकमेसंदर्भात सविस्तर स्पष्टीकरण व आवश्यक कागदपत्रे सादर करूनही आपल्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचा दावा देंगे यांनी केला आहे. १५ सप्टेंबर २०२५ पासून वेतन व निर्वाहभत्ता न मिळाल्याने आपली आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ४ लाख ५१ हजार आणि ४२ हजार रुपये अशी एकूण रक्कम अद्याप परत मिळाली नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. चौकशी अहवाल न देणे, संगनमताने कारवाई करणे व पदाचा गैरवापर झाल्याचे आरोप करत त्यांनी निलंबन तात्काळ रद्द करून थकीत वेतन देण्याची मागणी केली आहे.दरम्यान, आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आज अकोल्यातील आरोग्य उपसंचालक कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत आंदोलन थांबवले. या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 04, 2026 08:32:35
Amravati, Maharashtra:संघर्ष करणार मेरे लिये नई बात नही... मै किसी भी मोड से सुरुवात कर सकती हुं; राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने नवनीत राणांचं व्हाट्सअप स्टेटस चर्चेला अँकर :- भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजपने महाराष्ट्रातून चार जागी आपली उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे मात्र या यादीत माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव नसल्याने नवनीत राणा यांचे व्हाट्सअप स्टेटस चर्चेचा विषय ठरले आहे. संघर्ष करणार मेरे लिये नई बात नही... मै किसी भी मोड से सुरुवात कर सकती हुं असे म्हणत नवनीत राणा यांनी व्हाट्सअप स्टेटस ला एक व्हिडिओ अपलोड केला आहे त्यामुळे नवनीत राणांच्या या व्हाट्सअप स्टेटस ची सध्या जोरदार चर्चा असल्याचा पाहायला मिळत आहे.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top