Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001
युद्ध की आहट से बाजार हिल गया, महंगाई डराती सामान्य जनता
VKVISHAL KAROLE
Mar 04, 2026 11:45:42
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
सध्या जग एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे आणि त्याचे पडसाद थेट तुमच्या-आमच्या स्वयंपाकघरापासून ते शेअर बाजारापर्यंत उमटत आहेत. महागाईचा बॉम्ब फुटण्याच्या भीतीने सामान्य माणूस हादरला आहे. शेयर बाजार पडतोय तर धान्य बाजारात आतापासूनच भाव वाढू लागलेत. नेमकं काय घडतंय? पाहुयात आमचा हा विशेष रिपोर्ट युद्धाचा सावट जगभरात पसरले त्यात बाजारपेठ ही त्यातून सुटल्या नाही जवळपास धान्य बाजार असो की सोन्याचा बाजार sगळीकडेच युद्धाचे पडसाद उमटत आहे, त्यामुळं धान्य बाजारातही संभ्रमाचं वातावरण आहे. युद्धामुळे आयात-निर्यात विस्कळीत झालीय. स्वयंपाकाच्या तेलापासून ते डाळींपर्यंतच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच सामान्य गृहिणींचं बजेट कोलमडलंय. अनेक ठिकाणी लोकांनी महिनाभराचा साठा आताच करून ठेवण्यासाठी गर्दी केलीय. व्यापारी सुद्धा चिंता असल्याचं कबूल करताय मात्र घाबरू नये लोकांनी संयम बाळगावा बाजार पेठ इतक्या लवकर अस्थिर होणार नाही असं व्यापारी संघटना सांगतेय.. शेअर बाजारात पुरता गोंधळ उडाला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतल्याने बाजार कोसळलाय. सामान्य गुंतवणूकदार संभ्रमात आहे - शेअर्स विकून बाहेर पडावं की 'होल्ड' करावं? उलाढाल थांबली नसली, तरी भीतीचा पारा मात्र चढलेलाच आहे तज्ञ मात्र घाबरू नका, सावध राहा अफवांवर विश्वास ठेवू नका असा सल्ला देताय.. यावर युद्ध अभ्यासक ही 2 आठवाड्यापेक्षा जास्त युद्ध चालले तर काही परिणाम होईल त्यामुळं लोकांनी घाबरू नये, बाजारपेठ, गुंतवणूक परिणाम दिसतोय, मात्र काही दिवसात हे सगळं संपले तर परिणाम दिसणार नाही त्यामुळं युद्धाचा कालावधी आपल्याला हा विशेष घटक आहे अस सांगताय... युद्ध रणांगणावर असो वा सीमेवर, त्याची किंमत नेहमी सामान्य माणसालाच मोजावी लागते. सध्याची परिस्थिती कठीण आहे, पण अफवांना बळी न पडता संयम राखणं गरजेचं आहे. सुरक्षित राहा आणि लक्ष ठेवने इतकंच सर्वसामान्यांचा हातात आहे...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MAMILIND ANDE
Mar 04, 2026 15:16:35
Wardha, Maharashtra:वर्ध्याच्या 'श्री निवास कॉलनीत' बनावट आयकर अधिकाऱ्यांची फिल्मी स्टाईल धाड - बनावट धाडी टाकणाऱ्या जवळ महागडे मोबाईल असल्याची पोलिसांची माहिती अँकर - वर्धा शहरातील रामनगर परिसरातील श्री निवास कॉलनी येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुहास चिंतामण कोंगरे यांच्या घरी चारचाकी गाडीतून आलेल्या तिघांनी स्वतःला आयकर विभाग मुंबई येथील अधिकारी असल्याचे सांगत घराची झडती घेतल्याची घटना समोर आली आहे.सदर व्यक्तींनी कोंगरे यांना त्यांच्या नावाचा “सर्च वॉरंट” असल्याचे सांगितले. तसेच बनावट ओळखपत्र दाखवून घराची तपासणी केली व घरातला विडिओ काढला. कोंगरे यांनी विचारणा करताच संबंधितांनी दमदाटी करत घरात प्रवेश केला. त्यांच्यासोबत एक ड्रायव्हर आणि आणखी दोन जण होते.घरातील हॉलसह इतर भागांची सुमारे ३० मिनिटे तपासणी करण्यात आली. संपूर्ण कारवाई चित्रपटातील धाडीप्रमाणे करण्यात आल्याने कुटुंबीय घाबरून गेले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून हे खरे आयकर अधिकारी होते की तोतये, याबाबत तपास सुरू आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 04, 2026 14:17:30
Yeola, Maharashtra:आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे. नाशिकच्या येवल्यातील श्रुती विष्णुपंत करेकर ही विद्यार्थिनी एमबीबीएसच्या शिक्षणासाठी रशियाला गेली होती मायदेशात परतण्यासाठी श्रुती करेकर हिने तीन तारखेची फ्लाईट बुक केली होती. मात्र ऐनवेळी सर्व विमाने रद्द झाल्यामुळे श्रुती सध्या रशियामध्येच अडकून पडली आहे 'आपली मुलगी सध्या सुरक्षित असली तरी युद्ध आणखी वाढले तर मुलगी घरी परत येईल की नाही या चिंतेमध्ये आईच्या डोळ्यात अश्रू आले आहेत'. दरम्यान येवल्यातील श्रुतीच्या कुटुंबीयांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 04, 2026 13:34:26
Amravati, Maharashtra:अखेर बच्चू कडूंनी मेळघाटातील वनविभागाच कार्यालय घेरल; परिसरात पोलिसाचा मोठा बंदोबस्त तैनात शेतकरी कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठी आणि मेळघाटातील आदिवासींच्या समस्या समोर आणण्यासाठी बच्चू कडू यांनी मेळघाटात 250 किलोमीटरचे पायी यात्रा सुरू केली आहे. त्यांच्या या पायी यात्रेचा आजचा चौथा दिवस असून बच्चू कडू संपूर्ण मेळघाट पिंजून काढत असून मेळघाटातील आदिवासींच्या समस्यांना वाचा फोडत आहे. मात्र वनविभागाच्या अटींमुळे मेळघाटचा विकास होत नसल्याचा बच्चू कडू यांनी म्हटलं होतं त्यामुळे आता बच्चू कडू यांनी जारीदा येथील वनविभागाच्या कार्यालयाला घेरलं असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान आता बच्चू कडू आणि व वनविभाग हा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे。
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 04, 2026 12:15:44
Nashik, Maharashtra:देशातील अत्याधुनिक महामार्ग म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग आता सुरक्षिततेच्या प्रश्नामुळे चर्चेत आला आहे. अपघातांसोबतच आता लूटमार आणि मारहाणीच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. नुकत्याच सिन्नरजवळ महिला प्रवाशांना मारहाण करून दागिने चोरी केल्याच्या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वार सोमवार ... मुंबई परिसरातील काही भाविक महिला घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी उल्हासनगर हून संभाजीनगर कडे जात होत्या.... पहाटे तीन वाजता सिन्नर जवळील कोनांबे शिवारात त्यांची गाडी काही लोकांनी अडवली कारची काच फोडत यात बसलेल्या तीन महिलांना मारहाणी केली.. त्याच्याजवळील सोन्याचांदीचे दागिने रोख रक्कम लुटत 70 हजाराची रक्कम लुटून नेलीये. या प्रकरणात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या घटना समोर आल्या आहेत. वाहन अडवून लूटमार प्रवाशांच्या मारहाणीच्या घटना वाहन चोरी अपघातानंतर लुटमार दरोड्याचे प्रयत्न गुन्हेगारीचे कारणे 1)महामार्गावर रात्रीच्या वेळी कमी वर्दळ, 2)लांब अंतरावर पोलीस मदत उपलब्ध नसणे 3) निर्जन भागांमुळे गुन्हेगारांना संधी पोलीस सूत्रांनुसार समृद्धी महामार्गावर आतापर्यंत डझनभरांहून अधिक गुन्हेगारी घटना नोंदवण्यात आल्या आहेत..सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, पेट्रोलिंग आणि आपत्कालीन मदत व्यवस्था वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे वार 2 सागर वाकचौरे अध्यक्ष नाशिक पर्यटन असोसिएशन अरुण सूर्यवंशी सचिव अत्याधुनिक सुविधा असलेल्या समृद्धी महामार्गावर अपघातांसोबतच गुन्हेगारी घटनाही वाढत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.समृद्धी महामार्ग खरोखर सुरक्षित आहे का, असा सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 04, 2026 11:01:27
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 04, 2026 10:48:26
Kalyan, Maharashtra:कल्याणात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांवर लाखोंची उलाढाल,40 ते ६० विद्यार्थ्यांची ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक. विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनीचीदेखील फसवणूक. पालकांना घाबरून काही विद्यार्थी समोर येण्यास घाबरतात ANC- कल्याण डोंबिवली परिसरात १८ ते १९ वयोगटातील विद्यार्थ्यांना ट्रेडिंगच्या आमिषाने गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. ठगांनी विद्यार्थ्यांकडून विविध कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर बँक खाती उघडली आणि त्या खात्यांमधून लाखो रुपयांची उलाढाल केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात सुमारे ५० ते ६० विद्यार्थी फसवणुकीचे बळी ठरल्याची माहिती समोर आली आहे.काही विद्यार्थ्यांना त्यांच्या परिचित मित्रांमार्फत ऑनलाइन ट्रेडिंग’मधून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. यासाठी बँक खाते उघडण्याची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांकडून आधार कार्ड, पॅन कार्डसारखी महत्त्वाची कागदपत्रे घेतली गेली. त्यानंतर संबंधित खात्यांमधून लाखो रुपयांची व्यवहार उलाढाल झाल्याचे दोन वर्षांनी विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना घेऊन परिमंडळ ३ चे उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या खात्यांचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी उपायुक्त झेंडे यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यक्तीला आपली वैयक्तिक कागदपत्रे, बँक तपशील किंवा ओटीपी देऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top