Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

एक ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा की मांग, नहीं तो केसरी और हिंदकेसरी गदा वापस!

SMSarfaraj Musa
Feb 28, 2026 09:50:49
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
राज्यात एकच महाराष्ट्र केसरी घ्या, अन्यथा राज्यातील हिंदकेसरी महाराष्ट्र केसरी गदा परत करू - कुस्तीपटूंचा इशारा.. अँकर - एक महाराष्ट्र, त्यामुळे एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे, अन्यथा राज्यातल्या महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी आपल्या गदा राज्य सरकारला परत करून मुंबईतल्या आझाद मैदानावर अमरण उपोषण सुरू करतील, असे इशारा महाराष्ट्रातील कुस्ती वीरांकडून देण्यात आला आहे. हिंदकेसरी दीनानाथ सिंह डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतून कुस्तीपटूंनी, राज्य सरकारला हा इशारा दिला आहे. कुस्ती संघटनांच्या वादामुळे गेल्या काही वर्षांपासून दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहेत, आणि आता संघटनांच्या वाद उफाळून आल्याने चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने एकच महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बाइट - दिनानाथ चौहान - हिंदकेसरी बाइट - चंद्रहार पाटील - डबल महाराष्ट्र केसरी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Feb 28, 2026 11:46:17
Chandrapur, Maharashtra:ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असलेल्या पोस्ट ऑफिस मध्ये आता अमुलाग्र बदल होत आहेत. नव्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या भरती व्यतिरिक्त कामकाजाचे संगणकीकरण आणि डिजिटायझेशन देखील मोठ्या प्रमाणात केले जात आहे. शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात पोस्ट आला अधिक कामाच्या संधी आहेत. म्हणूनच ग्रामीण डाक सेवकांना प्रोत्साहित करण्यासाठी चंद्रपुरात एका संमेलनाचे आयोजन करण्यात झाले. या संमेलनासाठी राज्याचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांनी हजेरी लावली. आता पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून बीएसएनएल 4G सिमकार्ड उपलब्ध होणार असून त्याची अंमलबजावणी उद्यापासून महाराष्ट्रात केली जाणार आहे. याशिवाय दहा कंपन्यांच्या म्युच्युअल फंड व्यवहाराची देखील सुरुवात पोस्टामार्फत करण्यात येत आहे. यासाठी पोस्टातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. पोस्ट ऑफिस मार्फत पासपोर्ट केंद्रांचे कामकाज सुरळीतपणे सुरू असून यापुढील काळात आयआयटी मुंबईसारख्या प्रतिष्ठित संस्थेत समर्पित पासपोर्ट कार्यालय प्रारंभ केले जाणार असल्याच्या महत्त्वाच्या घोषणा अमिताभ सिंग यांनी चंद्रपुरात केल्या.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 28, 2026 11:45:33
Navi Mumbai, Maharashtra:हिंद दि चादर कार्यक्रम खारघर, गुरू तेग बहादुर साहिबजी की 350वीं शहीदी समागम के अवसर पर खारघर में समागम कार्यक्रम हो रहा है। इसके लिए विशेष व्यवस्था की गई है; मुख्य मंडप और दोनों बाजू के मंडपों के बीच लगभग दो लाख भाविक बैठ सकेंगे। सुरक्षा के लिए इस क्षेत्र में दो हजार पुलिस कर्मचारी तैनात हैं और परिसर पर सीसीटीवी नजर है। 600 आपदा मित्र भी तैनात हैं। सुबह के सत्र में दीड़ लाख भक्त दर्शन कर चुके हैं। गर्मी से बचने के लिए प्यास बुझाने के पर्याप्त पानी की व्यवस्था और ठिक-ठिकानों पर ओआरएस की व्यवस्था है, वहीं वरिष्ठ नागरिकों के लिए गोल्फ कार्ट जैसी बैटरी से चलने वाली गाड़ी उपलब्ध कराई गई है, यह जानकारी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी ने दी है।
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 28, 2026 11:16:59
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - उजनीतील दूषित पाण्यामुळे सोलापुरात वाढतोय कॅन्सरचा धोका ? - सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील दूषित पाण्यामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका ? - अनेक जलतज्ञांनी याविषयी मत मांडल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला गंभीर विषय - पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसी, पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहरातील दूषितपाणी पसरतेय उजनी धरणात - अलीकडच्या काळात सोलापूर जिल्ह्यात पाच ते सहा नवीन कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी बाईट - डॉ. राजेंद्र सिंह ( सुप्रसिद्ध जलतज्ञ ) ( महत्वाच्या सदरची बाईट 9 महिने अगोदरची आहे मात्र अत्यंत महत्त्वाची आहे ) याच विषयाचे गांभीर्य ओळखत सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सभागृहात हा महत्त्वपूर्ण विषय मांडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित याकडे लक्ष देऊन समस्या सोडवण्याची विनंती देखील करण्यात आलीय. बाईट - देवेंद्र कोठे ( आमदार, सोलापूर शहर मध्य ) उजनीच्या पाण्यामुळे कॅन्सरचे प्रमाण सोलापुरात वाढते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सोलापुरात अलीकडच्या काळात पाच ते सहा कॅन्सरची उभारण्यात आलेली हॉस्पिटल.... अनेक वेळा हा महत्त्वाचा मुद्दा फक्त तांत्रिकदृष्ट्या सिद्ध होत नसल्यामुळे याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही असे देखील चर्चा आहे. मात्र उजनीच्या दूषित पाण्यामुळे कॅन्सरचा धोका होऊ शकतो असे मत सोलापुरातील अन्य अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. बाईट - संजय पाठक ( उजनी धरण अभ्यासक ) END P2C सोलापुरात कॅन्सरचे हॉस्पिटल आणि रुग्ण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत हे त्रिकाल सत्य आहे... आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर असून उजनीच्या जल प्रदूषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय तोडगा काढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अभिषेक आदेप्पा, सोलापूर प्रतिनिधी
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 28, 2026 11:03:15
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बालवैज्ञानिकांनी विज्ञान प्रदर्शनी भरवून विविध वैज्ञानिक प्रकल्प आणि नवनवीन प्रयोग सादर केले. स्काय इंटरनॅशनल पब्लिक स्कुल मध्ये आयोजित या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रमोद यादगिरवार व प्राचार्य सुप्रभा यादगिरवार यांनी केले. विज्ञान प्रदर्शनांत बाल वैज्ञानिकांनी पर्यावरण पूरक तंत्रज्ञान, सौरऊर्जा आणि दैनिक जीवनातील वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित प्रकल्प मांडून वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविला. कचरा व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, जलशुद्धीकरण, प्रकाशाचे विकिरण, अँटी स्लिप अलार्म या विषयावर छोटे प्रयोग लक्षवेधी ठरले.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 28, 2026 10:51:11
Yeola, Maharashtra:खा. निलेश लंके ऑन DGCA अहवाल आणि रोहित पवार नेते भेट ज्या नेत्याने शेवटच्या श्वासापर्यंत राज्यासाठी काम केलं त्या नेतृत्वाला न्याय मिळत नसेल हे कुठल्या दिशेने सुरू आहे..... आमदार रोहित पवार हे अतिशय अभ्यासपूर्वक मांडणी करून ज्या चुका झाल्या आहेत त्या दाखवण्याचे प्रयत्न करत आहेत मात्र अद्याप पर्यंत कुठलाही न्याय मिळालेला नाही... खासदार निलेश लंके ऑन शिखर बँक घोटाळा क्लीन चिट क्लीन चिट जरी मिळाली असली तरी शिखर बँक घोटाळ्याचा आणि अजितदादा पवारांचा कोणताही संबंध नसताना अजित दादांना त्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला होता..... ही क्लीन चीट मागेच दिले असती तर दादा सारख्या नेत्याला मानसिक त्रास झाला नसता.... खासदार निलेश लंके ऑन राज ठाकरे धोका धूके वक्तव्य रोहित पवार असतील व आमचे काही नेते असतील हे मुंबई आणि बारामतीतील पोलीस स्टेशन मध्ये गेले मात्र अद्यापही गुन्हा दाखल करून घेतला नाही इतकी वाईट अवस्था आहे.... नेतृत्वाच्या बाबतीत असं होत असेल तर गोरगरीब लोकांना दिवसाढवळ्या मारून टाकलेतरी गुन्हा दाखल केला जाणार नाही.... एवढा मोठा नेता गेला आहे आणि त्या बाबतीत काही शंका असतील तक्रार असेल तर ती दाखल करून घेतली पाहिजे कायदा सांगतो... मात्र दाखल करून घेत नसेल तर ही हुकूमशाही चालू आहे... खासदार निलेश लंके ऑन 2024 पासून विलीनीकरण चर्चा अजित पवार जयंत पाटील भेटायला बोलावले विलीनीकरण ह्या गोष्टी लपून राहिल्या नव्हत्या... नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुकांना आम्ही सर्वांनी एकत्रित प्रचार केला... काही उमेदवारांना तर आम्ही चॉईसने चिन्ह दिले घड्याळ पाहिजे की तुतारी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दादांसह रोहित पवार यांच्यासह आम्ही सर्व एकत्र प्रचाराला फिरत होतो.... याचा अर्थ हे सर्व आधीच ठरलेलं होतं... खासदार निलेश लंके ऑन लाडकी बहीण योजना मुळे अन्याय कुठल्या खात्यावर अन्याय होतो की नाही होतो हे आता बाजूला ठेवून लाडकी बहीण योजना चालू केली ना ती आता चालू ठेवली पाहिजे... कुठल्या विभागाला किती निधी द्यायचा हे पाहण्यासाठी सरकारचे लोक सक्षम असतात त्यांनी मॅनेज केले पाहिजे... आमचे म्हणणे आहे लाडकी बहीण योजना ही सुरूच ठेवली पाहिजे उलट कबूल केलेले पैसे वाढवून दिले पाहिजे.... माझा विश्वास आहे जाहीर केलेले 2100 रुपये द्यायला सरकार लवकर सुरू करते... खासदार निलेश लंके ऑन गाईंचा मृत्यू या संदर्भात आम्ही त्या विभागातील तज्ञ लोकांशी संपर्कात आहोत... लोकांना मदत मिळाली पाहिजे या संदर्भात मागणी पण आम्ही केली आहे.... खासदार निलेश लंके ऑन मंत्री पंकजा मुंडे अधिकारी निलंबित अधिकारी मंत्र्यांचे ऐकत नसेल तर सर्वसामान्यांना दारात सुद्धा उभा करत नसेल... हे थांबले पाहिजे कुठेतरी... खासदार निलेश लंके ऑन मराठी भाषा मराठी भाषा ही जिवंत राहिली पाहिजे सर्व भाषांचे मूळ ही मराठी भाषा आहे....
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Feb 28, 2026 10:49:30
Buldhana, Maharashtra:झी २४ तासच्या बातमीचा इम्पॅक्ट झेडपीच्या गुरुजींचं चॅलेंज अन् मंत्र्यांचा व्हिडिओ कॉल! झी २४ तास इम्पॅक्ट अँकर: "कॉन्व्हेंटच्या शिक्षकांना चॅलेंज देणाऱ्या बुलढाण्यातील मंगरूळ नवघरे शाळेची यशोगाथा तुम्ही 'झी २४ तास'वर पाहिली... आणि या बातमीचा राज्याच्या शिक्षण विभागात मोठा 'इम्पॅक्ट' झालाय. खुद्द शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या शाळेच्या शिक्षकांना आणि चिमुकल्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांनी कौतुक केलंय. पाहूयात, झी २४ तासच्या बातमीचा हा मोठा परिणाम..." "बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील एका छोट्याशा गावाची शाळा आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलीये. 'झी २४ तास'ने मंगरूळ नवघरे शाळेचा 'मराठी बाणा' जगासमोर मांडला आणि त्याची दखल थेट मंत्रालयात घेतली गेली. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्वतः पुढाकार घेत शाळेचे मुख्याध्यापक अमोल अंभोरे यांना व्हिडिओ कॉल केला." "केवळ फोन करून मंत्र्यांनी औपचारिकता पाळली नाही, तर त्यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कॉन्व्हेंटला टक्कर देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या या चिमुकल्यांचा आत्मविश्वास पाहून मंत्री महोदयही थक्क झाले. लोकसहभागातून ७ लाखांचा निधी जमा करून शाळेचा कायापालट करणाऱ्या ग्रामस्थांचंही मंत्र्यांनी विशेष अभिनंदन केलं." "एकीकडे मराठी शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त होत असताना, मंगरूळ नवघरे शाळेने दिलेली ही 'संजीवनी' आता राज्यासाठी 'रोल मॉडेल' ठरतेय. झी २४ तासच्या बातमीमुळे या जिद्दी शिक्षकांच्या कष्टाला आज राज्याच्या सर्वोच्च पातळीवर मानाची पावती मिळाली आहे."
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 28, 2026 10:30:23
Chendhare, Maharashtra:पनवेल तालुक्यातील कोरल वाडी आणि घेरावाडी या आदिवासी वाडीवरील ग्रामस्थांनी पानीासाठी रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण आज तिसरया दिवसही सुरूच आहे. मात्र या आंदोलनाची दखल प्रशासनाकडून घेतली गेली नाही. दरम्यान आंदोलकांची प्रकृती बिघडत चालली आहे. असून बेबी वाघे या आंदोलक महिलेची प्रकृती खालावली असून तिला उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वाडयांसाठी जलजीवन मिशन कार्यक्रमातून नळपाणी योजना तीन वर्षांपूर्वी मंजूर झालीपरंतु अद्याप या योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. त्‍यामुळे इथल्‍या ग्रामस्थांनी पोराबाळांसह उपोषणाचा मार्ग पत्‍करला आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 28, 2026 10:20:27
Nagpur, Maharashtra:नागपूर मेजर जनरल (नि) अनिल बाम इराणवर केलेले हल्ले आणि पाकिस्तान -अफगाणिस्तान या युद्धांबाबत केलेला 121 (on अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण ) याचे दुरोगामी परिणाम होईल इजराइलच्या खोमेनी यांच्या रेसिडेन्शिसच्या जवळ हल्ले केला आहे इजरायलच्या या हल्याला अमेरिकेची साथ आहे हे चिघळले तर खूप दूर जाणार तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहोत रशिया आणि चीन इराणच्या सोबत आहे अमेरिकेने इजरायलच्या खांद्यावरून इराणवर हल्ला केला आहे काल आणि परवाच भारत, चीन, रशिया आणि अमेरिका यांनी अगोदरच एडव्हायझरी इराणमधील आपल्या लोकांसाठी जारी केली होती (on भारतावर परिणाम ) भारतावर डायरेक्ट परिणाम होणार नाही इकोनॉमिकली मोठे परिणाम होईल. इकॉनोमिकली मागे जाऊ मोठे काही झाले तर डायरेक्टली ही परिणाम होईल व्हेनुझूलावर अमेरिकेचा कब्जा आहे त्याचा अमेरिकेला फायदा आहे ( इराण प्रत्युत्तर देणार ) इराण प्रत्युत्तर नक्की देणार इराणचे नेतृत्व आपल्या नागरिकांना काय उत्तर देतील गेल्या वेळेला हल्ले नियंत्रित झाले मात्र यायवेळेला नियंत्रण करणे कठीण आहे हे वाढू शकत इराणमध्ये ज्यावेळी लोकांचे सरकारविरुद्ध आंदोलन सुरू होते त्यावेळी त्याची माहिती फारशी बाहेर आली नसती त्या वेळी तिथल्या लोकांना सरकारने सरप्रेस केले होते आज डोनाल্ড ट्रम्प यांनी ट्वीट करून सांगितले की हा लोकांविरुद्ध नाही तर खोमिनी आणि त्यांच्या इस्लामिक इराणवर आहे (on अफगाणिस्तान -पाक ) पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या ड्यूरेण्ड लाईनवरून नेहमीच क्लॅशेस होतात अफगाणिस्तान क्लेम करत आहे की आम्ही 52 पाकिस्तानी सैनिक मारले पाकिस्तान मात्र काहीच झाले नाही असं दाखवत आहे बारा सैनिक मेल्याचे सांगत आहे अफगाणिस्तानकडे मोठे शस्त्र नसले तरी पाकिस्तान हादरले आहे हे सगळं अमेरिकेच्या अफगाणिस्तान बग्राम एअर बेस साठी आहे आंतरराष्ट्रीय जिओपोलॉटिक्स चा भाग आहे आखाती देश हा डिस्टर्ब एरिया आहे आखाती देशांमध्ये देशांनी आपले एअर स्पेस बंद केले आणि इंटरनेट बंद केले इजराइलने आपला आयन डोम एक्टिवेट केला आहे
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 28, 2026 10:20:07
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोलीत बँकेची संवेदनशून्यता, कोमातील वृद्धेला न्यावे लागले थेट बँकेत गडचिरोली जिल्ह्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या पोर्ला शाखेचा कारभार आणि अधिकाऱ्यांची असंवेदनशीलता पुढे आली आहे. एका कोमात गेलेल्या वृद्ध महिलेला पैशांसाठी चक्क चारचाकी वाहनाने बँकेच्या दारात आणण्याची वेळ आली. या प्रकारामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला जात असून, संबंधित व्यवस्थापकाची तत्काळ बदली करण्याची मागणी जोर धरत आहे. काटली येथील रहिवासी शांताबाई मानकर या मागील काही दिवसांपासून कोमात आहेत. त्यांच्या औषधोपचारासाठी पैशांची गरज असल्याने त्यांच्या मुलगी व जावई २५ फेब्रुवारी रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पोर्ला येथे गेले होते. त्यांनी वृद्धेच्या अंगठ्याचा ठसा घेऊन पैसे काढण्याची विनंती केली. मात्र, शाखा व्यवस्थापकाने "खातेदाराला प्रत्यक्ष हजर करा, त्याशिवाय पैसे देणार नाही", अशी आडमुठी भूमिका घेत त्यांना परत लावले. खातेदार गंभीर आजारी असल्यास, तर बँकेने मेडिकल सर्टिफिकेट मागविणे आवश्यक आहे. मात्र, तसे न करता कोमात असलेल्या महिलेला बँकेत आणण्यास भाग पाडले गेले. शेवटी हतबल नातेवाइकांनी किरायाची गाडी करून वृद्धेला बँकेत नेले. पोर्ला शाखेचे व्यवस्थापक आणि उपशाखा व्यवस्थापक यांची वागणूक सर्वसामान्य खातेदारांशी अत्यंत असभ्य असल्याची तक्रार नागरिक वारंवार करत आहेत. मात्र, उच्च पदस्थ बँक प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 28, 2026 10:16:52
Akola, Maharashtra:अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे ‘हॉर्टिकल्चर डे’ निमित्त फळे, भाजीपाला, फुलपिके तसेच औषधी व सुगंधी वनस्पती पिकांच्या दोन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित वाणांची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे.दोन्ही दिवस विद्यापीठाचे प्रक्षेत्र शेतकरी बांधवांसाठी अवलोकनाकरिता खुले राहणार असून विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून तज्ज्ञ शास्त्रज्ञांकडून शंका समाधान केले जाणार आहे. यासोबतच कृषीविषयक भव्य प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले आहे.यंदाच्या हॉर्टिकल्चर डे निमित्त तब्बल 370 एकर क्षेत्रावर उद्यानविद्याविषयक 703 पिकांची प्रात्यक्षिके पाहता येणार आहेत. यामध्ये 33 भाजीपाला पिकांचे 38 वाण 20 एकर क्षेत्रावर प्रदर्शित करण्यात आले आहेत. तसेच 42 फळ पिकांचे वाण 300 एकर क्षेत्रावर लागवड तंत्रज्ञानासह दाखविण्यात येणार आहेत. याशिवाय 10 एकर क्षेत्रावर 540 औषधी व सुगंधी वनस्पतींची प्रात्यक्षिके ठेवण्यात आली आहेत.या दोन दिवसीय शिवार फेरी व चर्चासत्र कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह विशेषतः विदर्भातून अंदाजे एक लाख शेतकरी उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातीलच नव्ह तर देशभरातील शेतकरी, कृषी विस्तार अधिकारी, कर्मचारी, युवक-युवती व विद्यार्थ्यांनी या अद्वितीय संधीचा लाभ घ्यावा आणि इतरांनाही याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 28, 2026 10:03:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीराजे सदा फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे फेरीवाल्यांनी शहागंज भागात एका दांपत्याला मारहाण केली त्यातून आता महापालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे तरी या कारवाईवर एमआयएम आक्षेप घेतला आहे आणि त्यांनी थेट महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावण्याचा प्रकार सुरू केला आहे यामुळे मात्र राजकारण चांगलंच पेटला आहे महापालिकेच्या कारवाईला एमआयएमच्या विरोधी पक्षनेत्याचा आक्षेप महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विरोधी पक्ष नेत्यांची दमदाटी एम आय एम चा फेरीवाल्यांना अभय ? छत्रपती संभाजी नगरात दांपत्याला मारहाण झाल्यानंतर महापालिकेने फेरीवाल्यां विरोधात जोरदार मोहीम उघडली मात्र याच मोहिमे विरोधात आता एमआयएम रस्त्यावर उतरला आहे, विरोधी पक्षनेते समीर बिल्डर हे जिथे जिथे महापालिकेचे पथक जात आहे तिथे तिथे जाऊन या पथकाला विरोध करत आहे अधिकाऱ्यांना दमदाटी केली जातेय इतकाच नाही तर त्यांना हुसकावून लावल्या जातेय, कारवाई केली तर खबरदार अशा पद्धतीचा इशारा जणू एमआयएमचे हे नेते महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देत आहे यावरून आता संभाजीनगरचे पालकमंत्री मात्र चांगले संतापले आहे हे गुंडगिरी खपवून घेतल्या जाणार नाही जशास तसे उत्तर दिले जाईल आणि याबाबत महापालिका आयुक्तांनी सांबांधित नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे Byte संजय शिरसाठ,  पालकमंत्री या मुद्द्यावर एम आय एम आक्रमक झाले आहे चूक कोणी केली शिक्षा मात्र महापालिकेचे पथक दुसऱ्यांना देत आहे , अशा अन्यायकारक कारवाई होऊ देणार नाही प्रसंगी प्रशासना विरोधात उभे राहू असं एमआयएम पक्षाचे महापालिकाेल विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांचे म्हणणं आहे... तर पालकमंत्री संयाग शिरसाठ यांनी आमच्यावर टीका करण्याऐवजी स्वतःचं काय चाललंय हे बघा असा टोला हे त्यांनी संजय शिरसाठ यांना लगावला Byte समीर बिल্ডर,  विरोधी पक्ष नेता महापालिका या मुद्द्यावर चूक कोणी केली शिक्षा मात्र महापालिकेचे पथक दुसऱ्यांना देत आहे , अशा अन्यायकारक कारवाई होऊ देणार नाही प्रसंगी प्रशासना विरोधात उभे राहू असं एमआयएम पक्षाचे महापालिकाेल विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांचे म्हणणं आहे
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 28, 2026 09:17:54
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 28, 2026 09:17:36
Jalna, Maharashtra:जालना : अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांकडून आंदोलनाची तयारी सुरु आंदोलनस्थळी मराठा बांधवांकडून साफसफाई अंतरवाली सराटीत आंदोलनासाठी पुन्हा मंडप उभा राहणार जरांगे पाटील जून महिन्यात पुन्हा उपोषण करणार? अँकर- अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांकडून आंदोलनाची तयारी सुरु करण्यात आलीेये.. हैदराबाद गॅजेटिअरच्या जीआर नंतर जरांगे पाटलांनी आंदोलन थांबवलं होतं. मात्र जीआर निघूनही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत. त्यामुळं जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलन सुरु करणार आहेत. यासाठी अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी साफसफाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपोषणस्थळी मंडप उभारला जाणार आहे.जरांगे यांच्या जून महिन्यात होणाऱ्या आंदोलनाच्या निमित्तानं होणाऱ्या मराठा आंदोलकांच्या बैठकी देखील यांच ठिकाणी घेता याव्यात यासाठी अंतरवाली सराटीये येथील मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी साफसफाई करण्यात आली आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 28, 2026 09:03:47
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top