Back
गडचिरोली की बैंक में संवेदनहीनता, कोमात वृद्धा को बैंक के दरवाज़े तक लाने पर हंगामा
AAASHISH AMBADE
Feb 28, 2026 10:20:07
Gadchiroli, Maharashtra
गडचिरोलीत बँकेची संवेदनशून्यता, कोमातील वृद्धेला न्यावे लागले थेट बँकेत
गडचिरोली जिल्ह्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या पोर्ला शाखेचा कारभार आणि अधिकाऱ्यांची असंवेदनशीलता पुढे आली आहे. एका कोमात गेलेल्या वृद्ध महिलेला पैशांसाठी चक्क चारचाकी वाहनाने बँकेच्या दारात आणण्याची वेळ आली. या प्रकारामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला जात असून, संबंधित व्यवस्थापकाची तत्काळ बदली करण्याची मागणी जोर धरत आहे. काटली येथील रहिवासी शांताबाई मानकर या मागील काही दिवसांपासून कोमात आहेत. त्यांच्या औषधोपचारासाठी पैशांची गरज असल्याने त्यांच्या मुलगी व जावई २५ फेब्रुवारी रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पोर्ला येथे गेले होते. त्यांनी वृद्धेच्या अंगठ्याचा ठसा घेऊन पैसे काढण्याची विनंती केली. मात्र, शाखा व्यवस्थापकाने "खातेदाराला प्रत्यक्ष हजर करा, त्याशिवाय पैसे देणार नाही", अशी आडमुठी भूमिका घेत त्यांना परत लावले. खातेदार गंभीर आजारी असल्यास, तर बँकेने मेडिकल सर्टिफिकेट मागविणे आवश्यक आहे. मात्र, तसे न करता कोमात असलेल्या महिलेला बँकेत आणण्यास भाग पाडले गेले. शेवटी हतबल नातेवाइकांनी किरायाची गाडी करून वृद्धेला बँकेत नेले. पोर्ला शाखेचे व्यवस्थापक आणि उपशाखा व्यवस्थापक यांची वागणूक सर्वसामान्य खातेदारांशी अत्यंत असभ्य असल्याची तक्रार नागरिक वारंवार करत आहेत. मात्र, उच्च पदस्थ बँक प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowFeb 28, 2026 12:18:110
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 11:46:170
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 28, 2026 11:45:330
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 28, 2026 11:16:590
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 28, 2026 11:03:150
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 28, 2026 10:51:110
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 28, 2026 10:49:300
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 28, 2026 10:30:230
Report
AKAMAR KANE
FollowFeb 28, 2026 10:20:270
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 28, 2026 10:16:520
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 28, 2026 10:03:550
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 28, 2026 09:50:490
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 09:17:540
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 28, 2026 09:17:360
Report
