Back
गुरुजी के चैलेंज से बुलढाणा स्कूल की चर्चा, शिक्षा मंत्री ने सम्मानित किया
MNMAYUR NIKAM
Feb 28, 2026 10:49:30
Buldhana, Maharashtra
झी २४ तासच्या बातमीचा इम्पॅक्ट
झेडपीच्या गुरुजींचं चॅलेंज अन् मंत्र्यांचा व्हिडिओ कॉल! झी २४ तास इम्पॅक्ट
अँकर:
"कॉन्व्हेंटच्या शिक्षकांना चॅलेंज देणाऱ्या बुलढाण्यातील मंगरूळ नवघरे शाळेची यशोगाथा तुम्ही 'झी २४ तास'वर पाहिली... आणि या बातमीचा राज्याच्या शिक्षण विभागात मोठा 'इम्पॅक्ट' झालाय. खुद्द शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या शाळेच्या शिक्षकांना आणि चिमुकल्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांनी कौतुक केलंय. पाहूयात, झी २४ तासच्या बातमीचा हा मोठा परिणाम..."
"बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील एका छोट्याशा गावाची शाळा आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलीये. 'झी २४ तास'ने मंगरूळ नवघरे शाळेचा 'मराठी बाणा' जगासमोर मांडला आणि त्याची दखल थेट मंत्रालयात घेतली गेली. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्वतः पुढाकार घेत शाळेचे मुख्याध्यापक अमोल अंभोरे यांना व्हिडिओ कॉल केला."
"केवळ फोन करून मंत्र्यांनी औपचारिकता पाळली नाही, तर त्यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कॉन्व्हेंटला टक्कर देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या या चिमुकल्यांचा आत्मविश्वास पाहून मंत्री महोदयही थक्क झाले. लोकसहभागातून ७ लाखांचा निधी जमा करून शाळेचा कायापालट करणाऱ्या ग्रामस्थांचंही मंत्र्यांनी विशेष अभिनंदन केलं."
"एकीकडे मराठी शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त होत असताना, मंगरूळ नवघरे शाळेने दिलेली ही 'संजीवनी' आता राज्यासाठी 'रोल मॉडेल' ठरतेय. झी २४ तासच्या बातमीमुळे या जिद्दी शिक्षकांच्या कष्टाला आज राज्याच्या सर्वोच्च पातळीवर मानाची पावती मिळाली आहे."
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowFeb 28, 2026 12:18:110
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 11:46:170
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 28, 2026 11:45:330
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 28, 2026 11:16:590
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 28, 2026 11:03:150
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 28, 2026 10:51:110
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 28, 2026 10:30:230
Report
AKAMAR KANE
FollowFeb 28, 2026 10:20:270
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 10:20:070
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 28, 2026 10:16:520
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 28, 2026 10:03:550
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 28, 2026 09:50:490
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 09:17:540
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 28, 2026 09:17:360
Report
