Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415621

खेड के पास पुणे-नाशिक मार्ग पर कंटेनर में आग, यातायात भारी बाधित

HCHEMANT CHAPUDE
Mar 16, 2026 11:51:14
Khed, Maharashtra
*ब्रेकिंग* *खेड/पुणे* - पुण्याच्या खेड बाह्यवळ येथे पुणे नाशिक महामार्गावर कंटेनरने पेट घेतला - दिल्ली वरून पुण्याला माल घेऊन जाणाऱ्या कंटेनरला आग - पुणे नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी - घटनास्थळी राजगुरुनगर अग्निशमन दल दाखल - आग विझवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Mar 16, 2026 12:53:29
Rui, Maharashtra:बारामती शहरातील व्यापाऱ्यांच्या वतीने प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिला आहे LPG गैस की तंगी महसूस हो रही है. आदरणीय दादांनी साहेबांनी बारामतीला कभी किसी चीज की कमी नहीं आने दी. अब डोमेस्टिक गैस हो या कमर्शियल गैस, मिल नहीं रही. मुख्यमंत्री कहते हैं गैस का सुरळीत पुरवठा. गैस का पुरवठा नहीं हो रहा. आप लोगों से जाकर पूछिए क्या गैस मिलती है या नहीं. घरगुती या commercial gas मिल रहा/नहीं मिल रहा, वस्तुस्थिति यही है. बारामती पोटनिवडणूक उमेदवार सुकुरिया सुले यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या पक्षाची भूमिका तीच असणार आहे. आपलं सर्वांची इच्छा आहे, महाविकास आघाडीचे सर्व नेते असतील साहेब असतील ताई असतील मी असेल आमच्या कुटुंबाची सर्वांची इच्छा आहे बारामतीकरांची पण इच्छा आहे आणि बारामतीची जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी. ती बिनविरोध झाली पाहिजे. आमच्याकडून महाविकास आघाडी कडून बारामतीसाठी कुठलाही उमेदवार दिला जाणार नाही. आमच्याकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असेल. कुठलाही उमेदवार आम्ही देणार नाही, आम्ही सुनेत्रा काकींना साथ देऊ मदत करू बारामतीचे काही प्रश्न असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या ताईंच्या मार्गदर्शनाखाली काकींच्या मदतीने बारामतीच्या जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. धनगर समाजातील काही नेते निवडणूक लढवण्यावर ठाम. बारामतीतील ते रुग्णालय दादांनी आणलं. या रुग्णालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव दादांनी दिलं. वैद्यकीय शासकीय महाविद्यालय असेल किंवा आयुर्वेदिक महाविद्यालय असेल शेवटी पवार कुटुंबाने साहेब असतील दादा असतील कधीच आम्ही असं राजकारण केलं नाही जात धर्म पहिला नाही. हे दुर्दैव आहे त्यांच्यासह चर्चा करणार आहोत. दादांचे तालुक्यावर उपकार आहेत, त्यांनी खूप काही आपल्यासाठी केले आणि आजही निवडणूक त्यांच्यासाठी आपण सर्वांनी मिळून बिनविरोध करावी आणि हीच खरी श्रद्धांजली असेल. बारामतीची पोटनिवडणुकीची चर्चा, बारामतीची निवडणूक बिनविरोध जावी यासाठी प्रयत्न करू. राष्ट्रीय विलीनीकरण चर्चा. आज सुनेत्रा काकी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, एक कार्यकर्ता म्हणून नागरिक म्हणून किंवा पुतण्या म्हणून मी त्यांच्याकडे जाऊ शकतो. लोकांची काही काम असतील मी विश्वास आहे ती 100% मार्गे लावतील. राज्य सरकारने काढलेला आदेश रद्द करण्याची धनगर समाजातील व्यक्तींची मागणी. हा निर्णय शासनाने घेतला. Baramatiची पोटनिवडणूक झाली तर काय? सशक्त लोकतंत्रात सर्वांना अधिकार आहेत; ते कुठेही जाऊन कोणाच्याही विरोधात निवडणूक लढू शकतात. तर त्यांची इच्छा असेल तर ते निवडणूक लढू शकतात.
289
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 16, 2026 12:51:51
235
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 16, 2026 12:16:15
Ambernath, Maharashtra:अंबरथ नगरपालिकाेत अधिकाऱ्यांच्या बदल्या राजेश तडवींच्या जागी पंकज पन्हाळे शहर अभियंता तर मेघा कदम यांच्याकडून मिळकत विभागाचा चार्ज काढला बांधकाम विभागाचे अभियंता राजेश तडवी यांना काही महिन्यांपूर्वी शहर अभियंता म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आज अचानक त्यांना उपअभियंता म्हणून जबाबदारी देण्यात आलीये. तर सध्या उपअभियंता असलेल्या पंकज पन्हाळे यांना शहर अभियंता म्हणून जबाबदारी देण्यात आलीये. मुख्याधिकाऱ्यांनी राजेश तडवी यांचं डीमोशन का केलं? हे मात्र समजू शकलेलं नाही. तर दुसरीकडे पालिकेच्या सभेत गेम खेळताना व्हिडीओ व्हायरल झालेल्या मिळकत पर्यवेक्षक मेघा कदम यांच्याकडचा चार्ज काढून तो नवनीत देवरे यांना देण्यात आलाय. मेघा कदम यांच्याकडे आता फक्त पालिकेच्या लीगल डिपार्टमेंटची जबाबदारी असणार आहे. मुख्याधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या या तडकाफडकी बदल्यांमुळे पालिकेत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
428
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 16, 2026 11:51:32
Pandharpur, Maharashtra:उजनी धरण प्रदूषणमुक्त करा , आमदार समाधान आवताडे यांची विधानसभेत मागणी एकीकडे उजनी धरण परिसरात पर्यटन आराखडा मंजूर होत असताना , धरणाच्या पाण्याचे प्रदूषण ही गंभीर बाब आहे. सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात उजनी धरणावर अवलंबून आहे. शेती, पिण्याचे पाणी, मत्स्य व्यवसाय तसेच स्थानिक अर्थचक्रासाठी हे धरण अत्यंत महत्त्वाचे असून जिल्ह्याच्या विकासाशी ते थेट जोडलेले आहे. मात्र सध्या धरणातील प्रदूषणाची समस्या अत्यंत गंभीर बनली असल्यामुळे पर्यावरण, पिण्याचे पाणी आणि पर्यटन विकास या तिन्ही बाबींवर परिणाम होत आहे. राज्य शासनाने सन २०२५–२६ या आर्थिक वर्षाच्या विकास आराखड्यासाठी सुमारे ५४१.१८ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यापैकी सुमारे १०० कोटी रुपयांची तरतूद ही उजनी धरणाच्या विकासासाठी या आराखड्याअंतर्गत करण्यात आलेली आहे. या निधीतून धरण परिसरातील विविध विकासकामे होत असताना उजनी धरणातील वाढत्या प्रदूषणाचा प्रश्नही तितक्याच प्राधान्याने हाताळला जावा, तसेच धरण प्रदूषणमुक्त करण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना आराखड्यात समाविष्ट कराव्यात, अशी मागणी आमदार अवताडे यांनी केली --- Sound Byte - आमदार समाधान आवताडे
162
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 16, 2026 10:54:04
Chakan, Maharashtra:महिलेवर हल्ल्यानंतर कुत्र्यांच्या तोंडाला रक्त; चाकणमध्ये नागरिकांमध्ये भीती चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. सहा भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यानंतर कुत्र्यांच्या तोंडाला रक्त लागल्याची चर्चा परिसरात सुरू असून नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. महिलेवर हल्ला झाल्यानंतर या भटक्या कुत्र्यांच्या तोंडाला रक्त लागल्याने ते पुन्हा हल्ला करतील, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे चाकण औद्योगिक क्षेत्रात रात्रीच्या सुमारास मोठ्या संख्येने कामगार वर्ग काम आटोपून घरी जात असतो. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांकडून पुन्हा हल्ला होण्याची शक्यता व्यक्त होत असून कामगारांसह स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
144
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 16, 2026 10:51:27
Ambernath, Maharashtra:भाजपाकडून शिवसेनेच्या गुढ्या 'साभार परत!' सर्वसाधारण सभेत झालेल्या प्रकाराचा केला निषेध शिवसेनेच्या नगरसेवकांवर भाजपा नगरसेवकांची आगपाखड Anchor : शिवसेनेचे माजी विधानपरिषद सदस्य रविंद्र फाटक यांनी अंबरनाथमधील नगरसेवकांना गुढीपाडव्यानिमित्त पाठवलेल्या गुढ्या भाजपाच्या नगरसेवकांनी साभार परत पाठवल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेने भाजपाच्या नगरसेवकांच्या प्रभागातल्या विषयांना विरोध करत ते रद्द केले होते. याचा निषेध म्हणून भाजपा नगरसेवकांनी ही भूमिका घेतली आहे. VO - भाजपाच्या अंबरनाथ शहर कार्यालयात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला भाजपाचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, गटनेते अभिजित करंजुले, ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पाटील यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी शिवसेनेने सभागृहात घेतलेल्या भूमिकेचा भाजपाने निषेध केला. तसंच आमची ही भूमिका शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनाही समजावी, म्हणून आम्ही या गुढ्या परत करत आहोत, कारण आम्हाला प्लॅस्टिकच्या गुढ्या नको, तर शहराच्या विकासाची गुढी पाहिजे, असं यावेळी भाजपाच्या नगरसेवकांनी म्हटलं. शिवसेनेच्या नगरसेवकांवरही भाजपाने यावेळी आगपाखड केली. तसंच रवींद्र फाटक यांनी पाठवलेल्या गुढ्या आणि शुभेच्छा पत्र साभार परत लिहिलेल्या एका बॉक्समध्ये भरण्यात आली. या सगळ्या गुढ्या त्यांना परत पाठवल्या जाणार असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलं.
159
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 16, 2026 10:50:31
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाचा सोलापूर जिल्ह्यातील टेक्सटाईल इंडस्ट्रिजला मोठा फटका, 150 कोटींचे टॉवेल्स परत मागवले ( PKG ) - आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा सोलापूर जिल्ह्यातील टेक्सटाईल इंडस्ट्रीजला मोठा फटका - दुबईकडे पाठविण्यात आलेल्या 150 कोटींचे टॉवेल्स परत मागवण्याची व्यापारांवर नामुष्की - युद्धामुळे तीन ते पाच हजार डॉलर्स इमर्जन्सी वॉर चार्जेस लावण्यात आल्याने व्यापाऱ्यांची मोठी कोंडी सोलापुर शहरातील पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात कष्टकरी कामगार राहतात. यातील बहुतांश कामगार हे टेक्स्टाईल इंडस्ट्रीज मध्ये रोजंदारीवर काम करतात. टेक्स्टाईल इंडस्ट्रीज मधील बहुतांश वस्तूंची मागणी घटल्यामुळे नाईलाजास्तव असतो व्यापाऱ्यांवर उत्पादन कमी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे काही कामगार देखील कपात करण्यात आले आहेत. आखाती देशातील युद्धाचा परिणाम हा सोलापुरातील रोजंदारी घटकावर देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतोय. ही परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती सोलापुरातील अभ्यासकांना वाटतेय. किरण बनसोडे ( अभ्यासक ) टेक्स्टाईल इंडस्ट्रीज मधील निर्यात व्यवहार जवळपास ठप्प झाले असून नवीन ऑर्डर पूर्णपणे बंद झाल्या आहेत. त्यामुळे आता सरकारने देखील योग्य ती पाऊले उचलण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जातेय.
197
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 16, 2026 10:16:55
1081
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 16, 2026 10:10:34
Kalyan, Maharashtra:KDMC महासभेत सभागृह नेते पदी वरूण पाटील यांची निवड स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेचा मार्ग मोकळा ? कल्याण डोंबिवली महापालिकेचे आज महासभा आयोजित करण्यात आली होती. या महासभेमध्ये शिवसेना-भाजप महायुतीकडून सभागृह नेते पदासाठी भाजपचे नगरसेवक वरून पाटील यांची निवड करण्यात आली. भाजपने गेल्या काही दिवसांपासून स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते पदावर दावा करण्यात आला होता. एकंदरीतच महायुतीकडून आता सभागृह नेते पद भाजपच्या वाट्याला गेल्याने स्थायी समिती सभापतीसाठीचा शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे या महासभेत आज काँग्रेसच्या गटनेता कांचन कुलकर्णी, उबाठाचे गटनेते उमेश बोरगावकर, शिवसेनेचे गटनेते विश्वनाथ राणे यांचा सत्कार करण्यात आला.
1042
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 16, 2026 10:10:14
Nanded, Maharashtra:नांदेड महापालिकेच्या पहिल्या सभेत टिपू सुलतानच्या पुतळ्याच्या विषयावरून सभागृहात वादंग झाला. विरोधकांनी महापौरांच्या आसना समोर गोंधळ घातला. या गोंधळातच महापौरांनी सभा गुंडाळली. आजच्या पहिल्या सभेत इतर विषयांसोबत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचा प्रस्ताव विषय पत्रिकेवर होता. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना, काँग्रेस आणि वंचितचे गटनेते प्रशांत इंगोले यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या पुतळ्याचा प्रस्ताव शहरात उभारावा असा प्रस्ताव मांडला. मात्र हा प्रस्ताव विषय पत्रिकेवर नसल्याने सांगून महापौरांनी चर्चा टाळली. त्यावरुन वंचित आणि काँग्रेस सदस्य थेट महापौरांच्या आसना समोर गेले. या ठिकाणी त्यांनी गोंधळ घातला. गोंधळ सुरु असताना महापौरांनी विषय पत्रिकेला मान्यता देऊन सभा गुंडाळली. दरम्यान टिपू सुलतान यांच्या पुतळ्याचा प्रस्ताव आम्ही सात दिवसांपूर्वी दिला होता. मात्र तो प्रस्ताव विषय पत्रिकेवर घेण्यात आला नाही असा आरोप वंचित आणि काँग्रेसकडून करण्यात आला. दरम्यान सभागृहात विषय पत्रिकेवर चर्चा झाली. बाकीचे जे विषय आहेत, त्यावर अभ्यास करून नंतर चर्चा करू असं उत्तर महापौरांनी दिले. तर सदस्यांनी वादग्रस्त विषय सभागृहात मांडू नये. टिपू सुलतान यांनी देशासाठी काय केले हे आधी सांगावे नंतर त्या विषयावर चर्चा करू असं उपमहापौर म्हणाले
1093
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 16, 2026 10:09:44
Malegaon, Maharashtra:Breaking पॅकेज स्टोरी : विशाल मोरे, मालेगाव - नाशिक जिल्ह्यात ऑनलाइन गॅस बुकींचा फज्जा... - सात ते आठ दिवस आधी घरगुती गॅस बुकिंग करून सुद्धा सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप.. - घरगुती गॅस सिलिंडर घेण्यासाठी गॅस एजन्सीवर उसळली नागरिकांची गर्दी... - गॅस सिलिंडरचे पोलिस, होमगार्ड, बाऊन्सर यांच्या बंदोबस्तात होत आहे वाटप नाशिक जिल्हा प्रशासनाने घरगुती गॅस सिलेंडरसाठी ऑनलाइन बुकिंग करून तीन दिवसात सिलेंडर देण्याचे आदेश दिलेले असताना मात्र मालेगावात जवळपास 7 ते आठ दिवस आधी घरगुती गॅस सिलिंडरची बुकिंग केलेली असताना देखील घरपोच डिलिव्हरी होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून सिलेंडर घेण्यासाठी एकच केली आहे. बाईट: मन्सूर अहमद, ( ब्लू शर्ट, गोल टोपी ) एकीकडे ऑनलाइन बुकिंग केली तरी सिलेंडर 7, 8 दिवस मिळत नाही, दुसरीकडे ऑनलाईन बुकिंग करायला गेले तर ते निट होत नाही. गॅस एजन्सीवर आले तर नंबर वर उभे राहून शेवटी कळत की KYC झाली नाही अशा प्रकारे नागरिक त्रस्त झाले आहे.. बाईट: जमील अहमद, ( व्हाइट शर्ट, गॉगल ) बाईट: महिला ( दोन महिला एकत्र बाईट ) ऑनलाइन बुकिंग करून पण सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक गॅस एजन्सीनवर गर्दी करत आहे. नागरिकांनी एजन्सी धारकांना फोन करून बुकिंग बाबत कळवले असले तरी घरपोच डिलिव्हरी मिळणार नाही दुकानावर अशा प्रकारे उत्तर ग्राहकांना दिले जात असून सिलेंडर ब्लॅक केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी करत नाराजगी व्यक्त केली. बाईट: अशपाक खान, ( डिझाईन शर्ट, गोल टोपी ) बाईट: शेख इम्रान, ( गुलाबी शर्ट, ब्लॅक टोपी ) दरम्यान ऑनलाइन गॅस बुकिंग केल्यावर घरपोच डिलिव्हरी करण्यासाठी गाडी गेली तर त्याठिकाणी सिलेंडर घेण्यासाठी लोक झटापटी करतात... सिलेंडर घेऊन पळतात म्हणून घरपोच डिलिव्हरी काही दिवस आम्ही बंद करून थेट पोलिस, होमगार्ड, बाऊन्सर यांच्या बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप करत असल्याचे एजन्सी धारकांनी सांगितले.. बाईट: ज्ञानेश्वर बैरागी,( व्हाइट शर्ट दाढी ) एकंदरीत प्रशासन जरी ऑनलाइन बुकिंग करून सिलेंडर घरपोच मिळत असल्याचा दावा करत असले तसे आदेश जरी काढले तरी मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होत नसून नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. आणि त्यामुळे आता गॅस एजन्सीवर सिलेंडर घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहेत. Wkt: विशाल मोरे, मालेगाव
1023
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 16, 2026 10:04:56
Pandharpur, Maharashtra:solapur जिल्ह्यातील मोडनिंब येथील स्वरांजली कला केंद्र येथे देह विक्री व्यवसाय सुरू असल्याची माहिती टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक राहुल अत्राम यांना मिळाली. यानंतर पोलिसांच्या पथकाने स्वरांजली कला केंद्र आणि स्वागत लॉज येथे छापा टाकला असता येथे देह विक्री व्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी 25 पीडित महिलांची पोलिसाने सुटका केली. त्यांना सोलापूर येथील सुधारगृहात पाठवले आहे. या महिलांमध्ये बीड जिल्ह्यातील उप सरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणातील नर्तिका सुद्धा असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक राहुल अत्राम यांनी मोडनिंब पोलिस औट पोस्ट जवळच सुरू असलेलं मानवी तस्करी आणि अनैतिक व्यापाराचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे.
1135
comment0
Report
Advertisement
Back to top