Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423203

नाशिक में ऑनलाइन गैस बुकिंग के बाद भी सिलेंडर घर तक नहीं पहुंच रहा, लोग परेशान

VNVishal Nagesh More
Mar 16, 2026 10:09:44
Malegaon, Maharashtra
Breaking पॅकेज स्टोरी : विशाल मोरे, मालेगाव - नाशिक जिल्ह्यात ऑनलाइन गॅस बुकींचा फज्जा... - सात ते आठ दिवस आधी घरगुती गॅस बुकिंग करून सुद्धा सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप.. - घरगुती गॅस सिलिंडर घेण्यासाठी गॅस एजन्सीवर उसळली नागरिकांची गर्दी... - गॅस सिलिंडरचे पोलिस, होमगार्ड, बाऊन्सर यांच्या बंदोबस्तात होत आहे वाटप नाशिक जिल्हा प्रशासनाने घरगुती गॅस सिलेंडरसाठी ऑनलाइन बुकिंग करून तीन दिवसात सिलेंडर देण्याचे आदेश दिलेले असताना मात्र मालेगावात जवळपास 7 ते आठ दिवस आधी घरगुती गॅस सिलिंडरची बुकिंग केलेली असताना देखील घरपोच डिलिव्हरी होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून सिलेंडर घेण्यासाठी एकच केली आहे. बाईट: मन्सूर अहमद, ( ब्लू शर्ट, गोल टोपी ) एकीकडे ऑनलाइन बुकिंग केली तरी सिलेंडर 7, 8 दिवस मिळत नाही, दुसरीकडे ऑनलाईन बुकिंग करायला गेले तर ते निट होत नाही. गॅस एजन्सीवर आले तर नंबर वर उभे राहून शेवटी कळत की KYC झाली नाही अशा प्रकारे नागरिक त्रस्त झाले आहे.. बाईट: जमील अहमद, ( व्हाइट शर्ट, गॉगल ) बाईट: महिला ( दोन महिला एकत्र बाईट ) ऑनलाइन बुकिंग करून पण सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक गॅस एजन्सीनवर गर्दी करत आहे. नागरिकांनी एजन्सी धारकांना फोन करून बुकिंग बाबत कळवले असले तरी घरपोच डिलिव्हरी मिळणार नाही दुकानावर अशा प्रकारे उत्तर ग्राहकांना दिले जात असून सिलेंडर ब्लॅक केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी करत नाराजगी व्यक्त केली. बाईट: अशपाक खान, ( डिझाईन शर्ट, गोल टोपी ) बाईट: शेख इम्रान, ( गुलाबी शर्ट, ब्लॅक टोपी ) दरम्यान ऑनलाइन गॅस बुकिंग केल्यावर घरपोच डिलिव्हरी करण्यासाठी गाडी गेली तर त्याठिकाणी सिलेंडर घेण्यासाठी लोक झटापटी करतात... सिलेंडर घेऊन पळतात म्हणून घरपोच डिलिव्हरी काही दिवस आम्ही बंद करून थेट पोलिस, होमगार्ड, बाऊन्सर यांच्या बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप करत असल्याचे एजन्सी धारकांनी सांगितले.. बाईट: ज्ञानेश्वर बैरागी,( व्हाइट शर्ट दाढी ) एकंदरीत प्रशासन जरी ऑनलाइन बुकिंग करून सिलेंडर घरपोच मिळत असल्याचा दावा करत असले तसे आदेश जरी काढले तरी मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होत नसून नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. आणि त्यामुळे आता गॅस एजन्सीवर सिलेंडर घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहेत. Wkt: विशाल मोरे, मालेगाव
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Mar 16, 2026 10:54:04
Chakan, Maharashtra:महिलेवर हल्ल्यानंतर कुत्र्यांच्या तोंडाला रक्त; चाकणमध्ये नागरिकांमध्ये भीती चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. सहा भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यानंतर कुत्र्यांच्या तोंडाला रक्त लागल्याची चर्चा परिसरात सुरू असून नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. महिलेवर हल्ला झाल्यानंतर या भटक्या कुत्र्यांच्या तोंडाला रक्त लागल्याने ते पुन्हा हल्ला करतील, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे चाकण औद्योगिक क्षेत्रात रात्रीच्या सुमारास मोठ्या संख्येने कामगार वर्ग काम आटोपून घरी जात असतो. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांकडून पुन्हा हल्ला होण्याची शक्यता व्यक्त होत असून कामगारांसह स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
144
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 16, 2026 10:51:27
Ambernath, Maharashtra:भाजपाकडून शिवसेनेच्या गुढ्या 'साभार परत!' सर्वसाधारण सभेत झालेल्या प्रकाराचा केला निषेध शिवसेनेच्या नगरसेवकांवर भाजपा नगरसेवकांची आगपाखड Anchor : शिवसेनेचे माजी विधानपरिषद सदस्य रविंद्र फाटक यांनी अंबरनाथमधील नगरसेवकांना गुढीपाडव्यानिमित्त पाठवलेल्या गुढ्या भाजपाच्या नगरसेवकांनी साभार परत पाठवल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेने भाजपाच्या नगरसेवकांच्या प्रभागातल्या विषयांना विरोध करत ते रद्द केले होते. याचा निषेध म्हणून भाजपा नगरसेवकांनी ही भूमिका घेतली आहे. VO - भाजपाच्या अंबरनाथ शहर कार्यालयात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला भाजपाचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, गटनेते अभिजित करंजुले, ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पाटील यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी शिवसेनेने सभागृहात घेतलेल्या भूमिकेचा भाजपाने निषेध केला. तसंच आमची ही भूमिका शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनाही समजावी, म्हणून आम्ही या गुढ्या परत करत आहोत, कारण आम्हाला प्लॅस्टिकच्या गुढ्या नको, तर शहराच्या विकासाची गुढी पाहिजे, असं यावेळी भाजपाच्या नगरसेवकांनी म्हटलं. शिवसेनेच्या नगरसेवकांवरही भाजपाने यावेळी आगपाखड केली. तसंच रवींद्र फाटक यांनी पाठवलेल्या गुढ्या आणि शुभेच्छा पत्र साभार परत लिहिलेल्या एका बॉक्समध्ये भरण्यात आली. या सगळ्या गुढ्या त्यांना परत पाठवल्या जाणार असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलं.
159
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 16, 2026 10:50:31
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाचा सोलापूर जिल्ह्यातील टेक्सटाईल इंडस्ट्रिजला मोठा फटका, 150 कोटींचे टॉवेल्स परत मागवले ( PKG ) - आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा सोलापूर जिल्ह्यातील टेक्सटाईल इंडस्ट्रीजला मोठा फटका - दुबईकडे पाठविण्यात आलेल्या 150 कोटींचे टॉवेल्स परत मागवण्याची व्यापारांवर नामुष्की - युद्धामुळे तीन ते पाच हजार डॉलर्स इमर्जन्सी वॉर चार्जेस लावण्यात आल्याने व्यापाऱ्यांची मोठी कोंडी सोलापुर शहरातील पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात कष्टकरी कामगार राहतात. यातील बहुतांश कामगार हे टेक्स्टाईल इंडस्ट्रीज मध्ये रोजंदारीवर काम करतात. टेक्स्टाईल इंडस्ट्रीज मधील बहुतांश वस्तूंची मागणी घटल्यामुळे नाईलाजास्तव असतो व्यापाऱ्यांवर उत्पादन कमी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे काही कामगार देखील कपात करण्यात आले आहेत. आखाती देशातील युद्धाचा परिणाम हा सोलापुरातील रोजंदारी घटकावर देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतोय. ही परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती सोलापुरातील अभ्यासकांना वाटतेय. किरण बनसोडे ( अभ्यासक ) टेक्स्टाईल इंडस्ट्रीज मधील निर्यात व्यवहार जवळपास ठप्प झाले असून नवीन ऑर्डर पूर्णपणे बंद झाल्या आहेत. त्यामुळे आता सरकारने देखील योग्य ती पाऊले उचलण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जातेय.
149
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 16, 2026 10:16:55
145
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 16, 2026 10:10:34
Kalyan, Maharashtra:KDMC महासभेत सभागृह नेते पदी वरूण पाटील यांची निवड स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेचा मार्ग मोकळा ? कल्याण डोंबिवली महापालिकेचे आज महासभा आयोजित करण्यात आली होती. या महासभेमध्ये शिवसेना-भाजप महायुतीकडून सभागृह नेते पदासाठी भाजपचे नगरसेवक वरून पाटील यांची निवड करण्यात आली. भाजपने गेल्या काही दिवसांपासून स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते पदावर दावा करण्यात आला होता. एकंदरीतच महायुतीकडून आता सभागृह नेते पद भाजपच्या वाट्याला गेल्याने स्थायी समिती सभापतीसाठीचा शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे या महासभेत आज काँग्रेसच्या गटनेता कांचन कुलकर्णी, उबाठाचे गटनेते उमेश बोरगावकर, शिवसेनेचे गटनेते विश्वनाथ राणे यांचा सत्कार करण्यात आला.
207
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 16, 2026 10:10:14
Nanded, Maharashtra:नांदेड महापालिकेच्या पहिल्या सभेत टिपू सुलतानच्या पुतळ्याच्या विषयावरून सभागृहात वादंग झाला. विरोधकांनी महापौरांच्या आसना समोर गोंधळ घातला. या गोंधळातच महापौरांनी सभा गुंडाळली. आजच्या पहिल्या सभेत इतर विषयांसोबत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचा प्रस्ताव विषय पत्रिकेवर होता. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना, काँग्रेस आणि वंचितचे गटनेते प्रशांत इंगोले यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या पुतळ्याचा प्रस्ताव शहरात उभारावा असा प्रस्ताव मांडला. मात्र हा प्रस्ताव विषय पत्रिकेवर नसल्याने सांगून महापौरांनी चर्चा टाळली. त्यावरुन वंचित आणि काँग्रेस सदस्य थेट महापौरांच्या आसना समोर गेले. या ठिकाणी त्यांनी गोंधळ घातला. गोंधळ सुरु असताना महापौरांनी विषय पत्रिकेला मान्यता देऊन सभा गुंडाळली. दरम्यान टिपू सुलतान यांच्या पुतळ्याचा प्रस्ताव आम्ही सात दिवसांपूर्वी दिला होता. मात्र तो प्रस्ताव विषय पत्रिकेवर घेण्यात आला नाही असा आरोप वंचित आणि काँग्रेसकडून करण्यात आला. दरम्यान सभागृहात विषय पत्रिकेवर चर्चा झाली. बाकीचे जे विषय आहेत, त्यावर अभ्यास करून नंतर चर्चा करू असं उत्तर महापौरांनी दिले. तर सदस्यांनी वादग्रस्त विषय सभागृहात मांडू नये. टिपू सुलतान यांनी देशासाठी काय केले हे आधी सांगावे नंतर त्या विषयावर चर्चा करू असं उपमहापौर म्हणाले
144
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 16, 2026 10:04:56
Pandharpur, Maharashtra:solapur जिल्ह्यातील मोडनिंब येथील स्वरांजली कला केंद्र येथे देह विक्री व्यवसाय सुरू असल्याची माहिती टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक राहुल अत्राम यांना मिळाली. यानंतर पोलिसांच्या पथकाने स्वरांजली कला केंद्र आणि स्वागत लॉज येथे छापा टाकला असता येथे देह विक्री व्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी 25 पीडित महिलांची पोलिसाने सुटका केली. त्यांना सोलापूर येथील सुधारगृहात पाठवले आहे. या महिलांमध्ये बीड जिल्ह्यातील उप सरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणातील नर्तिका सुद्धा असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक राहुल अत्राम यांनी मोडनिंब पोलिस औट पोस्ट जवळच सुरू असलेलं मानवी तस्करी आणि अनैतिक व्यापाराचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे.
139
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 16, 2026 09:41:43
Kalyan, Maharashtra:केडीमसीतील नगरसेवक मधुर म्हात्रे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी. अच्छा महासभेमध्ये मधुर मात्रे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोबत नसल्याने हकलपट्टी निश्चित. आजच्या महासभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दहा नगरसेवक उपस्थित एक नगरसेवक अनुपस्थित ANC -कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी एक असलेल्या मधुर म्हात्रे यांच्यावर अखेर पक्षशिस्त भंगाची कारवाई करण्यात आली आहे. वारंवार नोटीस देऊनही पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहणे तसेच पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, केडीएमसी निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकूण ११ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी मधुर म्हात्रे हे निवडून आल्यानंतरपासूनच शिवसेना शिंदे गट यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून त्यांना वारंवार कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. मात्र, नोटीस देऊनही मधुर म्हात्रे यांनी पक्षाच्या नाव नोंदणीसह गटाच्या कोणत्याही बैठकीला उपस्थिती लावली नाही. इतकेच नव्हे तर पालिकेच्या महासभेच्या दिवशीही पक्षाने दिलेला आदेश धुडकावल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अखेर पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईनंतर केडीएमसीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आता १० नगरसेवक शिल्लक राहिले असून पक्षशिस्त पाळण्याबाबत इतर सदस्यांना देखील स्पष्ट संदेश देण्यात आल्याचे आज महासेभेत ubt चे दहा नगरसेवक उपस्थित असून मधुर म्हात्रे आज ही महासभेत ubt सोबत अनुपस्थित असल्याने नक्कीच कारवाई होणार असल्याचे बोलले जात आहे.
121
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 16, 2026 09:38:11
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील दर्याचेवडगाव गावात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. 8 ते 10 घरांची पूर्ण पडझड झाली असून 40 ते 50 घरांचे नुकसान झाले आहेत. अनेक घरांची पत्रे उडून गेली असून शेती पिकांचेही नुकसान झाले आहे. 83 वर्षीय रुक्मिणी दिनकर कांबळे यांच्या घराचे पत्रे उडल्यामुळे घर कोलमडले. या परिस्थितीने गावकऱ्यांना मोठे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी म्हणून प्रयत्न करायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अवकाळी पावसाचा परिणाम शेतांवरही असलेला दिसत असून ज्वारी, मका आणि गवताच्या गंजींचे नुकसान झाले आहे. प्रशासन पंचनामे सुरू ठेवणार असल्याची माहिती आहे, मात्र मदत कधी मिळेल याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. ग्रामस्थांनी तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.
157
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 16, 2026 09:37:01
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर नगरपालिकाकी स्थायी समिति अध्यक्ष पद पर उबाठा शिवसेना के मनस्वी संदीप गि-हे का विजय। सत्ता-धारी भाजपा-शिवसेना-उबाठा-अपक्ष आघाडी और विपक्ष कांग्रेस के पास स्थायी समिति में 8-8 मत थे, नियम अनुसार ईश्वरचिठ्ठी के फैसले से मनस्वी गीहे का निर्णय हुआ। 66 सदस्यीय मनपा में कांग्रेस सबसे बड़ा दल था, भाजपा के पास शिवसेना शिंदे गट समेत 24 सदस्य थे। किसी को बहुमत (34) नहीं मिला। महापौर-उपमहापौर सत्ता स्थापना के लिए कई समीकरण बदले गए, पर अंततः भाजपा-शिवसेना-उबाठा-अपक्ष आघाडी ने सत्ता पर कब्जा कर लिया। स्थायी समिति में सत्ता और विपक्ष के बराबर 8-8 मत रहे, ईश्वरचिठ्ठी का फैसला किसके पक्ष जाएगा, इस पर सबकी नजरें थीं। भाजपा ने उबाठा शिवसेना के साथ बरती गई दोस्ती को इस ताजा विजय से पुख्ता किया है。
92
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 16, 2026 09:36:41
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर शहर पोलिसांनी कर्णकर्कश आवाजात फिरणाऱ्या दुचाकीचे सायलेन्सर काढून रोलर खाली केले. पंढरपूर शहरात मागील काही दिवसांपासून बुलेट तसेच इतर दुचाकी वाहन चालक सायलेन्सरमध्ये बदल करून त्यातून विचित्र आवाज, कानाला त्रास देणारे आवाज काढून वाहन चालवत होते. शाळा महाविद्यालय परिसरात असे प्रमाण वाढले होते. पंढरपूर शहर वाहतूक शाखेने अशा दुचाकींचे विविध आवाजात वाजणाऱ्या 70 सायलेन्सर काढून जप्त केले. तसेच आज पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात या सायलेन्सरवर रोलर फिरवून त्यांना चपटे करून नष्ट केले. भविष्यात कोणी अशा पद्धतीने कर्णकर्कश आवाजात दुचाकी चालवली तर अशा प्रकारे कारवाई करण्याचा इशारा पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी दिला आहे.
116
comment0
Report
Advertisement
Back to top