Back
भाजपा ने शिवसेना की गुढ़ी पर साभार वापस भेजा, शहर विकास की मांग तेज
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 16, 2026 10:51:27
Ambernath, Maharashtra
भाजपाकडून शिवसेनेच्या गुढ्या 'साभार परत!' सर्वसाधारण सभेत झालेल्या प्रकाराचा केला निषेध शिवसेनेच्या नगरसेवकांवर भाजपा नगरसेवकांची आगपाखड Anchor : शिवसेनेचे माजी विधानपरिषद सदस्य रविंद्र फाटक यांनी अंबरनाथमधील नगरसेवकांना गुढीपाडव्यानिमित्त पाठवलेल्या गुढ्या भाजपाच्या नगरसेवकांनी साभार परत पाठवल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेने भाजपाच्या नगरसेवकांच्या प्रभागातल्या विषयांना विरोध करत ते रद्द केले होते. याचा निषेध म्हणून भाजपा नगरसेवकांनी ही भूमिका घेतली आहे. VO - भाजपाच्या अंबरनाथ शहर कार्यालयात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला भाजपाचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, गटनेते अभिजित करंजुले, ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पाटील यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी शिवसेनेने सभागृहात घेतलेल्या भूमिकेचा भाजपाने निषेध केला. तसंच आमची ही भूमिका शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनाही समजावी, म्हणून आम्ही या गुढ्या परत करत आहोत, कारण आम्हाला प्लॅस्टिकच्या गुढ्या नको, तर शहराच्या विकासाची गुढी पाहिजे, असं यावेळी भाजपाच्या नगरसेवकांनी म्हटलं. शिवसेनेच्या नगरसेवकांवरही भाजपाने यावेळी आगपाखड केली. तसंच रवींद्र फाटक यांनी पाठवलेल्या गुढ्या आणि शुभेच्छा पत्र साभार परत लिहिलेल्या एका बॉक्समध्ये भरण्यात आली. या सगळ्या गुढ्या त्यांना परत पाठवल्या जाणार असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलं.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowMar 16, 2026 12:19:1433
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 16, 2026 12:16:1569
Report
KJKunal Jamdade
FollowMar 16, 2026 12:00:5169
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 11:51:32162
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 11:51:14168
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 10:54:04144
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 16, 2026 10:50:31197
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 16, 2026 10:16:551081
Report
ABATISH BHOIR
FollowMar 16, 2026 10:10:341042
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 16, 2026 10:10:141093
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 16, 2026 10:09:441023
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 10:04:561135
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 16, 2026 10:02:271084
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 09:41:52156
Report