Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001

अहिल्यानगर में फर्जी दिव्यांग प्रमाणपत्र पर 15 कर्मचारियों के निलंबन; विभागीय जांच की घोषणा

LBLAILESH BARGAJE
Mar 17, 2026 08:04:56
Ahilyanagar, Maharashtra
अहिल्यानगर येथे बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी किंवा नोकरीच्या सवलती घेणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने निलंबित केला आहे. या 15 कर्मचाऱ्यांमध्ये बहुतेक कर्मचारी शिक्षण आणि आरोग्य विभागात नोकरी करतात. जिल्हा परिषदेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीत कार्यरत असताना सोपी कामे किंवा ऐच्छिक ठिकाणी बदली मिळवण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेऊन या कर्मचाऱ्यांनी शासनाची फसवणूक केली आहे या कर्मचाऱ्यांची चौकशी करून शासनाचा घेतलेल्या लाभाची वसुली केली जाणार आहे तर यातील कर्मचारी तसेच ज्यांनी नोकरी मिळवण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेतला आहे त्यांची देखील विभागीय चौकशी करून दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचं जिल्हा परिषदेशे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सांगितला आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Mar 17, 2026 09:36:25
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली फ्लॅश स्लग - जिल्हा न्यायालयाच्या आवारातील दुचाकीला लागलेल्या आगीत,तीन दुचाकी जळून खाक... अँकर - सांगली न्यायालयाच्या आवारात दुचाकींना आग लागून 3 दुचाकी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.विजयनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंग मध्ये उभे असलेल्या एका इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागली,काही क्षणात आगीने रौद्ररूप घेतल्याने शेजारी असणारे आणखी 2 दुचाकीला देखील आग लागली.तळमजल्यावरील असणाऱ्या पार्किंगच्या आवारातून आग आणि धुराचे लोट उठायला सुरुवात झाली,न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच असणाऱ्या पार्किंग मध्ये अचानक लागलेल्या आगीच्या घटनेमुळे सुरक्षा रक्षक,वकिल व नागरीकांची धावपळ उडाली. दमन काही वेळातच अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली आणि ही आग भिजवण्यात आली मात्र या आगीमध्ये तीन दुचाकी जळून खाक झाले आहेत,मात्र या घटनेमुळे न्यायालयाच्या आवारात मोठा गोंधळ उडाला होता.
353
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 17, 2026 09:31:15
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक आहे या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालाय मात्र अध्यक्ष कोणाचा यावरून वाद सुरू आहे आणि त्यातच आता एक नवा ट्व twists निर्माण झाला आहे, उभाठा आणि शिंदे सेना एकत्र येणार अशी जोरदार चर्चा छत्रपती संभाजी नगर मध्ये सुरू आहे आणि दोन्ही पक्षांचे नेते ही चर्चा फेटाळत नाहीये आम्ही देखील सत्तेत सहभागी होऊ शकतो, शिंदे सेने सोबत जाण्यास हरकत काय, आम्ही संत महंत नाहीत राजकारणी आहोत राजकारण आम्हालाही साधावे लागेल असे सूचक विधान अंबादास दानवे यांनी केलाय, शिवसेना भाजप या दोघांचे भांडण झाल्यास आम्हाला संधी आहे. आमचे नगरसेवक सहलीवर गेलेत हे सत्य आहे शिंदे सेनेचे गेलेत की नाही माहिती नाही पण उद्याच्या होणाऱ्या निवडणुकी 24 तास अजून वेळ आहे. त्यामुळे राजकारणात 24 तासात काहीही होऊ शकतं असेही दानवे म्हणाले आहे, त्यामुळे शिवसेना भाजपचा अध्यक्ष पदावरून बिनसले तर शिंदे सेना त्यांच्या 24 संख्याबळासह उबाठाच्या नऊ सदस्यांची साथ घेत सत्ता स्थापन करू शकते आणि दानवेही ही शक्यता फेटाळत नाहीये त्यामुळे भाजप आता अलर्ट मोड वर आहे...
635
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 17, 2026 09:30:56
Jalna, Maharashtra:जालना | सालगड्याच्या मुलाचं UPSC मध्ये यश, पत्र्याच्या शेडमध्ये राहून यश मिळवल्यानं सत्कारासाठी गावकऱ्यांची गर्दी (पॅकेज) अँकर : यश मिळवण्यासाठी परिस्थिती कधीही अडथळा ठरत नाही. त्यासाठी अथक परिश्रम, सातत्य, जिद्द अन चिकाटीची आवश्यकता असते. हेच सिद्ध करून दाखवलं आहे. जालन्यातील भिकन रोजेकर याने. नुकत्याच जाहिर झालेल्या युपीएससी परीक्षेच्या अंतिम गुणवत्ता यादीत भिकन देशात 812 रॅंक ने उत्तीर्ण झाला आहे.भिकनच्या वडिलांनी सालगडी म्हणून काम केलेलं असल्यानं भिकनचं यश कौतुकाचा विषय बनलाय.पाहूया भिकनच्या यशावरचा हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ :१: यूपीएससी परीक्षेचे निकाल लागले आणि जालन्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या सपकाळ जळगाव गावातल्या नागरिकांच्या आनंदाला उधाण आलंय.याच गावातल्या एका सालगड्याच्या मुलानं यूपीएससी परीक्षेत जोरदार मुसंडी मारत 812 वी रँक मिळवलीय. भिकन रोजेकर असं या यशस्वी विद्यार्थ्यांचं नाव आहे.याआधी भिकनने 4 वेळा यूपीएससीची परीक्षा दिली पण पदरी निराशाच पडली पण पाचव्या प्रयत्नात त्यानं यशाला गवसणी घातली.भिकनला IPS कॅडर मिळण्याची शक्यता वर्तवली जातीय.भिकन रोजेकर यांचे प्राथमिक शिक्षण चाळीसगाव तालुक्यातील वाडा येथे झाले. भिकन यांनी माध्यमिक शिक्षण जळगाव सपकाळ येथील विनय विद्यालयातून, तर पदवी छत्रपती संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयातून पूर्ण केली.त्यानंतर भिकनने UPscच्या तयारी साठी दिल्ली गाठली आणि पाचव्या प्रयत्नात युपीएससी सर करत घर गाठलं. भिकन रोजेकर,यूपीएससी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी(चेक्स शर्टवरील बाईट) भिकनच्या कुटुंबाची परिस्थिती तशी बेताचीच आहे.त्याच्या वडिलांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात सालगडी म्हणून काम केलंय.भिकनच्या कुटुंबाकडे अवघी 2 एकर जमीन आहे.या जमिनीवरच राब राब राबून या कुटुंबाची वर्षभर गुजरान चालते.मात्र भिकनं यूपीएससीत यश मिळवल्यानं वडिलांच्या डोळ्यांचे पारणे फेडले गेलेत. जगन रोजेकर,भिकनचे वडील(फेटा घातलेले) यूपीएससीच्या निकालात भिकननं मिळवलेल्या यशामुळे त्याच्या गावातील नागरिकांसह परीसरातील नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाहीय.दररोज लोक येऊन भिकनसह कुटुंबियांचा सत्कार करतायत.एका सालगड्याच्या मुलानं पत्र्याच्या शेडमध्ये राहून यश मिळवल्याचा आनंद गावकऱ्यांच्या आणि भिकनच्या मित्रांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. गावातील नागरिक आणि भिकनच्या हिरव्या शर्टवरील मित्राचा बाईट टाकावा. भिकनच्या कुटुंबात आई,वडील,बहीण आणि भाऊ राहतात. भिकनचा भाऊ भारतीय सैन्य दलात सैनिक म्हणून काम करतोय.तर भिकनने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्यानं रोजेकर कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाहीय.त्यामुळे झी-२४ तास कडूनही भिकनच्या यशाचं कौतुक आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
716
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 17, 2026 09:19:23
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:वाशीमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. गॅस एजन्सीसमोर आज सकाळ पासूनच ग्राहकांच्या लांब रांगा लागल्या असून, महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकजण कडक उन्हात तासन्‌तास उभे राहून सिलेंडरची प्रतीक्षा करत आहेत. घरगुती वापरासाठी अत्यावश्यक असलेला गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. उशिरा होणारा पुरवठा आणि अपुरा साठा यामुळे ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन सुरळीत पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात या येत आहे。
885
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 17, 2026 09:05:55
Nashik, Maharashtra:एसटी चालक-वाहकांची अल्कोटेस्ट होणार नंतरच हाती स्टेअरिंग देणार ! अँकर प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या मद्यपी एसटी कर्मचाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने आता कडक पाऊल उचलले आहे. आता चालक आणि वाहक या दोघांचीही ड्यूटी सुरू होण्यापूर्वी अल्कोटेस्ट केली जाणार आहे. या चाचणीत पात्र ठरल्यानंतरच चालकाच्या हाती स्टेअरिंग दिले जाईल. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार असून, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविणाऱ्यांच्या मनमानीला चाप बसणार आहे. एसटी आगारात हजर होताच चालक आणि वाहकांना आता एका मशीनद्वारे स्वतःची तपासणी करून घ्यावी लागेल. त्यांच्या श्वासातील मद्याचे प्रमाण मोजले जाईल. ही प्रक्रिया आता दैनंदिन कामकाजाचा भाग असेल. केवळ हजेरी लावली म्हणजे काम मिळाले असे आता होणार नाही. जोपर्यंत संबंधित कर्मचारी अल्कोटेस्टमध्ये 'पास' होत नाही तोपर्यंत त्याला गाडीवर किंवा ड्युटीवर पाठविले जाणार नाही.
1091
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 17, 2026 09:05:10
Akola, Maharashtra:अकोला शहरात पाणीटंचाईची समस्या तीव्र होत चालली आहे. 65 एमएलडी प्लांटवरून होणारा पाणीपुरवठा आता दोन दिवसाआड न राहता थेट चौथ्या दिवशी करण्यात येणार आहे. अकोला महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मुख्य जलस्त्रोत असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पामध्ये सध्या सुमारे 39 दलघमी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.सद्यस्थितीत वाढत्या तापमानामुळे शहरात तीव्र उन्हाळा जाणवत असून पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.यासोबतच वाढत्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे.ही परिस्थिती लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे आता अकोला शहरात पाणीपुरवठा तीन दिवसाआड, म्हणजेच चौथ्या दिवशी केला जाणार आहे. नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
1026
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 17, 2026 09:04:18
Yeola, Maharashtra:कांदा दरात सातत्याने होत असलेली पडझड तसेच मका उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव व इतर पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नाशिकच्या येवल्यात भव्य अशा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन येत्या 24 मार्च रोजी करण्यात आले आहे. या जनआक्रोश मोर्चासाठी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू हे देखील उपस्थित राहणार असून नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चात उपस्थित राहणार आहे येवला प्रांताधिकारी कार्यालय या ठिकाणी या मोर्चा संदर्भात निवेदन देण्यात आला असून या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश निंबाळकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
975
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 17, 2026 08:50:51
Washim, Maharashtra:वाशिम शहरातील टेम्पल गार्डन आणि तारांगण सध्या बंद असून त्याची दुरवस्था झाली आहे. नगरपरिषदेशने ९ कोटी रुपये खर्च करून ७ते ८ वर्षांपूर्वी उभारलेला हा प्रकल्प देखभाल अभावामुळे उद्ध्वस्त झाला आहे. गार्डनमध्ये गवत, झाडें-झुडपे वाढली असून झोके,तुटलेले बाकडे फुटलेले आणि परिसर कचऱ्याने भरलेला आहे. तसेच, खगोलप्रेमींसाठी उभारलेले तारांगणही अनेक वर्षांपासून बंद असून त्यातील साहित्य आगीत नष्ट आहे. कोट्यवधी खर्च असूनही सुविधा बंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे टेम्पल गार्डन आणि तारांगणाची दुरुस्ती करून नागरिकांनसाठी खुले करण्याची मागणी केली जातं आहे.
1081
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 17, 2026 08:22:46
Kalyan, Maharashtra:क्लस्टर योजनेविरोधात २७ गावांतील नागरिकांची केडीएमसी मुख्यालयावर धडक,परिपत्रक फाडत, जाळून केला निषेध व्यक्त,सर्व पक्षीय हक्क संरक्षण हक्क संघर्ष समिती आक्रमक, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील २७ गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या क्लस्टर योजने विरोधात स्थानिक भूमिपुत्रांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर २७ गाव सर्व पक्षीय संरक्षण हक्क संघर्ष समिती आणि येथील नागरिकांनी आज केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली. यावेळी या शासन निर्णयाची होळी करत आणि परिपत्रकाचे कागद फाडत निषेध व्यक्त केला. क्लस्टर योजना, ग्रोथ सेंटर आणि बुलेट ट्रेन बिझनेस हब यांसारख्या विविध योजनांमुळे २७ गावांतील स्थानिक नागरिक व भूमिपुत्रांवर परिणाम होत आहे. २७ गावांचा विकास नाही, सुविधा नाही तर मग मालमत्ता कराची सक्ती चालणार नाही अशी भूमिका यावेळी या नागरिकांनी घेतली. यावेळी मोर्चेकर्यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकत लवकरच केडीएमसी महापौर, आयुक्त, २७ गावांतील लोकप्रतिनिधी आणि संघर्ष समिती यांची संयुक्त बैठक लावून याावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असल्याचे अध्यक्ष सुमित वझे यांनी सांगितले.
1048
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 17, 2026 08:17:15
Bhandara, Maharashtra:कंत्राटी कामगारांचा डोंगरी बुजरुक माईन्स गेट समोर कामबंद आंदोलन.... मागच्या कंत्राटदारनी जे वेतन दिले त्याही पेक्षा वेतन कमी देण्याचे प्रयत्न सातत्याने कंत्राटदार करत आहेत , नियमानुसार जे वेतन मिळायला पाहिजे ते तर मिळतच नाही त्या उलट वेतन हे वेळेवर होत नाही ,त्याउलट कामगार आपल्या रास्त मागणीसाठी काही बोलायाला गेले तर त्यांना कामावरून काढून टाकण्यात येते त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जमात आत्यात. या सर्व समस्या वर कायम स्वरुपी मार्ग काढण्यासाठी प्रहार कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन डोंगरी माईन्सच्या मुख्य प्रवेशद्वार समोर सुरू आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे....
1044
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 17, 2026 08:05:15
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरात काँग्रेसचे भाजप विरोधात आंदोलन सोलापुरातील कुंभारवेस परिसरात शहर काँग्रेस कमिटीकडून उपहासात्मक आंदोलन नरेंद्र मोदी यांच्या नाल्यातून गॅस बनविण्याच्या संकल्पनेवर टीका करत सुरूय गॅस आंदोलन नाल्यातून गॅस निर्मिती उपक्रमावर काँग्रेसकडून उपस्थिती करण्यात आले प्रश्नचिन्ह पंतप्रधानांच्या विरोधात जोरदार निदर्शन करत उपहासात्मक_reply-गटारीवर काँग्रेस करत आहे आंदोलन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विश्वगुरू संबोधत काँग्रेसची उपरोधक घोषणाबाजी थाळी वाजवणे, लाईट बंद करणे, १५ लाख खात्यात येथील अशी खोटी आश्वासन भाजपने दिल्याचा काँग्रेस कडून करण्यात आला आरोप काँग्रेसच्या गॅस आंदोलनावेळी सोलापूर शहर पोलिसांचा काढेकोट बंदोबस्त असल्याच पाहायला मिळाल..
1055
comment0
Report
Advertisement
Back to top