Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूर जिला परिषद में महायुती के संगीत चेयरफॉर्मुले पर सियासी घमासान

VBVAIBHAV BALKUNDE
Mar 17, 2026 06:48:46
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज... स्किप्ट ::- लातूर जिल्हा परिषदेत महायुतीचा संगीत खुर्ची फॉर्म्युला चर्चेत.... अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांवर सव्वा वर्षांनी फेरबदलाचा  महायुतीचा फार्मूला.... सत्तेसाठी रचलेला डाव काँग्रेसचा गंभीर आरोप....एकाच कार्यकाळात अनेक पदाधिकारी… जिल्हा परिषदेत संगीत खुर्चीचा खेळ ?... लातूर जिल्हा परिषदेत महायुतीचा झेंडा फडकला असून भाजपच्या उषाताई संभाजी पाटील यांची अध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दयानंद दामोदर सुरवसे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र या निवडीपेक्षा जास्त चर्चा रंगली आहे ती महायुतीच्या संगीत खुर्चीच्या फॉर्म्युल्याची… सव्वा वर्षानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय महायुतीने घेतल्याने एकाच कार्यकाळात अनेक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झालेले दिसून येणार आहेत. यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे संविधानिक पद आहे हे संगीत खुर्ची नाही. हा फक्त सत्तेसाठी रचलेला डाव असल्याचा गंभीर आरोप केलाय....
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKShubham Koli
Mar 17, 2026 07:53:21
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 17, 2026 07:19:50
Yavatmal, Maharashtra:शॉट्स - मृताचा फोटो, खुनाचे घटनास्थळ, अटक आरोपी आणि पोलीस. यवतमाळच्या लासीना वाघापूर येथे युवकाच्या खून प्रकरणात लाडखेड पोलिसांनी मारेकरी पती-पत्नीला अटक केली आहे. आतिश देशमुख याच्या डोळ्यात तिखट टाकून त्याची चाकूने हत्या करण्यात आली होती, पोलिसांनी आतिश चे कॉल रेकॉर्डिंग तपासून अंकुश व रुपाली खोडे या दांपत्याला अटक केली. मृत आतीश चे रूपाली सोबत लग्नापूर्वी प्रेम संबंध होते, लग्नानंतर तिने हे संबंध तोडल्याने आतिश तिला त्रास देत होता, तिच्यावर अनैतिक संबंधासाठी दबाव निर्माण करीत होता. याबात वारंवार समजूत काढूनही आतिश ऐकत नसल्याने त्याचा परिणाम मुलांवर होऊ शकतो या धोक्यातून रूपाली व तिचा पती अंकुश याने आतिश चा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
967
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 17, 2026 07:19:05
Pandharpur, Maharashtra:चैत्र वारी तोंडावर असताना पंढरपुरात हॉटेल चालकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेनात, चैत्र वारीत भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. इथे आलेला भाविक चहा, नाष्टा आणि जेवणासाठी हॉटेल मध्ये जातो. पंढरपूर मध्ये मंदिर परिसरात अशी भाविकांच्या गर्दीवर चालणारी 50 हॉटेल्स आहेत. मागील काही दिवसापासून या हॉटेल चालकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाही. त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र थांबा और वाट पाहा एवढंच सरकारी उत्तर त्यांना मिळाले आहे. चार प्रमुख यात्रा मधील चैत्र यात्रा दहा दिवसावर आली आहे. तरीही हॉटेल व्यवसायिकांना गॅस सिलेंडर मिळाले नाहीत. जर चैत्र वारीसाठी आलेल्या भाविकांना या हॉटेल मधून सुविधा देता येणार नाही. गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येईल. त्यामुळे प्रशासनाने सकारात्मक विचार करून व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. -- श्रीराम गणपुले, हॉटेल चालक -- अमोल गंगाखेडकर, हॉटेल चालक
907
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 17, 2026 06:36:06
Jalna, Maharashtra:जालना : ब्रेकिंग | गैस के गोडाऊनमधून 110 सिलेंडर चोरीला अज्ञात चोरट्यांनी लंपास केले गॅस सिलेंडर रामनगरच्या आनंद भारत गॅस गोडाऊन मधील घटना मौजपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अँकर : गैस के गोडाऊन मधून अज्ञात चोरट्यांनी भरलेले ११० गॅस सिलिंडर लंपास केल्याची घटना जालन्यातील रामनगर येथे घडली आहे. त्यात १४ किलो वजनाचे ९६, तर ५ किलो वजनाचे २ आणि १९ किलो वजनाच्या १२ सिलिंडर आहेत. ही घटना जालना तालुक्यातील रामनगर परिसरातील आनंद भारत गॅस गोडाऊनमध्ये १४ ते १६ मार्च रोजी रात्रीच्या sुमारास घडली आहे. याप्रकरणी मौजपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चोरट्यांनी गोडाऊनचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. ४ लाख ५१ हजार ५४३ रुपये इतक्या किंमतीचे सिलिंडर चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात सिद्धार्थ आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गोडाऊनमधून यापूर्वीही गॅस सिलिंडर चोरीला गेल्याच्या घटना घडलेल्या आहे. सध्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर टंचाई निर्माण झाली असून, या काळातच चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात तपासाला वेग दिलाय.
1031
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 17, 2026 06:34:02
Nashik, Maharashtra:डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणी आरोपी अद्यापही फरार... डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येच्या ठिकाणी आढळल्या दोन वापरलेल्या सिरिंज अन् एक चाकू... डॉ.मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येनंतर PM रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा कुटुंबाने केला होता आरोप... संशयित आरोपी डॉ. निलेश जेजुरकर अद्याप फरार, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह... नाशिक मधल्या गंगापूर रोड येथील डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी डॉ. निलेश जेजुरकर हे अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. मात्र फिर्यादी यांच्या वकिलांकडून मनीषा जेजुरकर च्या ठिकाणी मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या त्या ठिकाणी वापरलेले सिरिंज आणि एक चाकू आढळून आल्याच सांगितले आहे. डॉ. मनीषा यांचे पती डॉ.निलेश जेजुरकर हे घरात असताना मनीषा यांनी आत्महत्या केलीच कशी असा सवाल देखील उपस्थित केला. या प्रकरणात फरार असलेले आरोपींना जामीन मंजूर देऊ नये तसेच पोलिसांकडून देखील जो तपास सुरू आहे त्यावर आम्हाला संशय असल्याचं फिर्यादी यांचे वकील ॲड. जयदीप वैशपायन यांनी म्हटले आहे. डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबाकडून देखील अनेक आरोप करण्यात आले होते या संदर्भात पोलिसांकडून अद्याप कोणताही तपासांती ठोस पुरावा मिळालेला नाही. आरोपी फरार असून देखील पोलिसांकडून नेमका काय तपास सुरू आहे यावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यामुळे डॉक्टर जेजुरकर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी डॉ निलेश जेजुरकर यांना अटक कधी होणार हे बघणं देखील आता महत्त्वाचा असणार आहे.
1053
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 17, 2026 06:32:59
Rui, Maharashtra:इंदापुरात लोणी देवकर जवळ क्रुझर आणि ट्रकचा भीषण अपघात.... अपघातामध्ये क्रुझरमधील तिघांचा जागीच मृत्यू...... क्रुझर चा टायर फुटल्याने समोर येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाल्याची माहिती.... Anchor _पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर परिसरात एका क्रुझर जीपचा टायर फुटून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्याने मोठा अपघात झालाय या अपघातामध्ये क्रुझर गाडीतून प्रवास करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झालाय. अपघातामध्ये मृत पावलेले तीनही लोक लोणी देवकर एमआयडीसी मधील खाजगी कंपनीतील कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. घटनाास्थळांे महामार्ग पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्रुझर गाडी मधून हे तीनही कर्मचारी प्रवास करत होते यावेळी अचानक गाडीचा टायर फुटला आणि रस्ता दुभाजक ओलांडून ही गाडी समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली गेली या गंभीर अपघातात क्रुझरमधील चालकासह तिघेजण जागीच मृत्यू पावलेत.
1095
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 17, 2026 06:30:32
Kolhapur, Maharashtra:बनावट नोटा खरीदने वाले मजूर के साथ उसे बेचने वाले पेंटर की कल शाहूपुरी पुलिस ने गिरफ्तारी की. गुरू राजेंद्र मेंगाणे और राहुल प्रकाश किरुगडे ये दोनों नाम हैं. शाहूपुरी पुलिस ने कल दुपहर रेल्वे स्टेशन परिसर में कार्रवाई की. उनके पास से 1 लाख 31 हजार रुपये के बनावट नोट जब्त किए गए, यह सूचना पुलिस निरीक्षक संतोष डोके ने दी. निपाणी के मजूर गुरू को कोल्हापुर में 33 प्रतिशत दर पर यानी पच्चास हजार रुपये में बनावट नोट एक लाख पचपन हजार रुपये मिलते हैं, ऐसी जानकारी मिली थी. इसके अनुसार उसने राहुल किरुगडे से संपर्क किया. दुपहर दोनों मिलकर रेलवे स्टेशन परिसर में मिलने वाले थे, ऐसी जानकारी शाहूपुरी पुलिस को मिली. पुलिस ने सापळा रचकर इन दोनों को गिरफ्तार कर लिया है.
1038
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 17, 2026 06:20:46
Bhandara, Maharashtra:आखाती युद्धाचा परिणाम अब भंडारा जिल्ह्यातील छोट्या व्यवसायांवरही दिसून येत आहे. भंडाऱ्याच्या वरठी येथे रेल्वे स्थानक परिसरातील चहा विक्रेत्यांना गॅस सिलेंडरचा तुटवडा भासू लागल्याने त्यांनी पर्याय म्हणून इंडक्शनचा वापर सुरू केला आहे. दिवसभर चहाच्या विक्रीवरच उदरनिर्वाह अवलंबून असल्याने दुकान बंद ठेवणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे सिलेंडर संपल्यानंतरही ग्राहकांची सेवा खंडित होऊ नये म्हणून इंडक्शनवर चहा बनवून ते आपला रोजचा गाडा पुढे नेत आहेत. बदलत्या परिस्थितीतही व्यवसाय टिकवण्यासाठी स्थानिक चहा विक्रेते नव्या पर्यायांचा अवलंब करत असल्याचे चित्र सध्या वरठी येथे पाहायला मिळत आहे.
1071
comment0
Report
Advertisement
Back to top