Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423104

दिल्ली धमाके के बाद मनमाड रेलवे स्टेशन पर सुरक्षा चेक, डॉग स्क्वॉड से तलाशी

SKSudarshan Khillare
Nov 11, 2025 09:25:53
Manmad, Maharashtra
दिल्ली यहाँ झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण देश हा धरला असून देशभरात महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांकडून अलर्ट देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असलेले मनमाड रेल्वे स्थानकावर स्थानिक पोलीस व रेल्वे पोलिसांकडून श्वान पथकाद्वारे कसून तपासणी सुरू करण्यात आली असून संशयित व्यक्तींची चौकशी केली जात आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSamruddhi M Kolhe
Nov 11, 2025 11:09:31
Karjat, Maharashtra:रायगड ब्रेकिंग आभ्यास: आमदार महेंद्र थोरवे यांना धक्का बसण्याची शक्यता थोरवेंचा विश्वासू सहकारी पंकज पाटीलांनी घेतली सुनील तटकरेची भेट सुधाकर घारे यांचा नवा राजकीय डाव आमदार थोरवे यांना धक्का देणारा Anchor - कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्तीय कर्जत विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख पंकज पाटील यांनी काल अचानक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलय. पंकज पाटील यांनी सलग दोन टर्म निवडून आलेले महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना मोठे मताधिक्य दिले होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक दरम्यान पाटील यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची घेतलेली भेट. आमदार महेंद्र थोरवे यांना धक्का देण्यास कारणीभूत ठरू शकते. पंकज पाटील यांनी काही महिन्यांपासून नाराज असून ते आमदार थोरवे यांच्याबरोबर कार्यक्रमस्थळी देखील दिसत नव्हते. येऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर पंकज पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आमदार थोरवेंना जोरदार धक्का देत थोरवेंचा जिवाभावाचा सहकारी फोडल्याने चर्चा सुरू आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 11, 2025 11:05:05
Kalyan, Maharashtra:कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक 2025-2026 साठी 122 प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर. 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर रोजी हरकती सूचना.. 2 डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण जाहीर. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 2025-2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभाग आरक्षण सोडत आज कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडली. एकूण 122 सदस्यीय प्रभागांसाठी ही सोडत काढण्यात आली असून, विविध प्रवर्गांनुसार आरक्षणाचे वाटप करण्यात आले आहे. या सोडतीनंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. विविध पक्षांचे स्थानिक नेते आणि संभाव्य उमेदवार आता आपापल्या प्रभागांच्या आरक्षणानुसार तयारीला लागले आहेत. नगरपालिका निवडणुका 2025-26 साठी ही आरक्षण सोडत निर्णायक मानली जात असून, महिला उमेदवारांसाठी यावेळी मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण झाल्या आहेत. आचार्य अत्रे नाट्यगृहात झालेल्या या सोडतीसाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, संभाव्य उमेदवार आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती. *या सोडतीदरम्यान चार सदस्यीय 29 प्रभाग आणि तीन सदस्यीय 2 प्रभाग अशा एकूण 31 प्रभागांमध्ये आरक्षण प्रक्रिया राबविण्यात आली. प्रवर्गानुसार आरक्षण अनुसूचित जाती (SC): 12 प्रभाग त्यापैकी 6 प्रभाग महिलांसाठी आरक्षित; अनुसूचित जमाती (ST): 3 प्रभाग त्यापैकी 2 प्रभाग महिलांसाठी आरक्षित; इतर मागासवर्गीय (OBC): 38 प्रभाग त्यापैकी 16 प्रभाग महिलांसाठी आरक्षित; सर्वसाधारण प्रवर्ग: 75 प्रभाग त्यापैकी 38 प्रभाग महिलांसाठी राखीव
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 11, 2025 10:51:27
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC: छत्रपती संभाजीनगर शहरातील 29 प्रभागातल्या 115 नगरसेवकांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात 58 महिला आणि 57 पुरुष नगरसेवक असतील. त्यात सर्वसाधारण महिला 30, सर्वसाधारण पुरुष 30, ओबीसी महिला 16 तर ओबीसी पुरुष 15, अनुसूचित जाती आरक्षणामध्ये 11 पुरुष आणि 11 महिला नगरसेवकांसाठी आरक्षण असेल. या आरक्षण सोडतीमध्ये बहुतांश इच्छुक खुश होते. प्रभाग रचना असल्याने ऍडजेस्टमेंट होईल म्हणून बरेच जण आशावादी आहेत. कारण राखीव असो किंवा सर्वसाधारण खुला असेल त्या ठिकाणी दोन महिला आणि दोन पुरुष असा रक्षण या प्रभाग रचनेत असल्यामुळे अडचण होणार नाही अशी अटकळ बांधून आहेत. काही प्रभागात मागील वेळेचे पुरुष नगरसेवकाच्या जागी त्यांची आता धुरा त्यांच्या पत्नी सांभाळू शकतात असं चित्र आहे. या सोडतीत मात्र माजी महापौर नंदकुमार घोडले यांचा 29 क्रमांकाचा प्रभाग OBC आणि सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला. तर अनुसूचित जातीसाठीपुरुष आरक्षण निघाले. त्यामुळं नंदकुमार घोडेले यांना धक्का बसला. या प्रभागातून निवडणुकीला त्यांना उभारणं शक्य होणार नाही, त्यामुळे त्यांच्या पत्नी माजी महापौर अनिता घोडेले या उमेदवार असू शकतात.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 11, 2025 10:51:14
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने राज्य शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, चंद्रपूर शाखेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शासनाने एकस्तर पदोन्नती आणि प्रोत्साहन भत्ता पुर्ववत सुरू ठेवावा, तसेच सर्व प्रलंबित मागण्यांचे तात्काळ निराकरण करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. शासनाने दुर्लक्ष चालू ठेवल्यास हिवाळी अधिवेशनादरम्यान मोठा महामोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.या निदर्शनात जिल्हा व तालुकास्तरीय सर्व विभागांतील कर्मचारी, शिक्षक, जिल्हा परिषद कर्मचारी आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता。
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 11, 2025 10:42:12
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 ची आरक्षण सोडत जाहीर झाली; महिलांसाठी ५० टक्के जागा आरक्षित मनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 ची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पनवेल महानगर पालिकेच्या असलेल्या २० प्रभागातील ७८ सदस्य निवडीसाठी आज आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाला. यामध्ये ५० टक्के महिलांसाठी आरक्षण जाहीर झाला. या अंतर्गत सहा अनुसूचित जातींसाठी, तर तीन महिलांसाठी असणार आहे. तर अनुसूचित जमातीसाठी आलेल्या दोन जागांपैकी एक जागा ही अनुसूचित महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे .
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 11, 2025 10:18:08
Solapur, Maharashtra:सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणूकसाठी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलीय. सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागासाठी ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत पार पडली. 2017 मध्ये झालेल्या सोलापूर महानगरपालिकेची मुदत 2022 साली संपली. जवळपास 3 वर्ष 7 महिन्यापासून सोलापुरात प्रशासकीय कारभार सुरु आहे. सर्वोच न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या काही महिन्यात सोलापूर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी ही प्रारूप आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलीय. ज्या नागरिकांना या आरक्षण सोडत संदर्भात आक्षेप असेल त्यांनी महापालिकेला लेखी कळवावे. 17 ते 24 नोव्हेंबरपर्यंत नागरिक आपली हरकत नोंदवावी लागेल. 2 डिसेंबर रोजी आयोगाच्या सुचनेनुसार अंतिम आरक्षण जाहीर होईल. अशी माहिती मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 11, 2025 10:02:27
Akola, Maharashtra:अकोला महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज अकोल्यातील प्रमिलाताई ओक सभागृहात पार पडली. एकूण 20 प्रभाग असलेल्या अकोला महानगरपालिकेतील 80 जागांसाठी ही आरक्षण सोडत करण्यात आली. या सोडतीनुसार 80 पैकी 43 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठरल्या आहेत, अनुसूचित जातीसाठी 14 जागा, अनुसूचित जमातीसाठी 02 जागा तर इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) 21 जागा राखीव ठरल्या आहेत. या सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. संभाव्य उमेदवारांनी आपल्या प्रभागांतील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली असून, पक्षश्रेष्ठींकडे तिकिटासाठी हलचालीही वेग घेत आहेत. आज झालेल्या आरक्षण सोडतीनंतर अनेकांचे राजकीय भवितव्य ठरले असून, काहींसाठी ही सोडत आनंदाची ठरली तर काहींसाठी धक्का देणारी ठरली आहे. भाजपमधून निघालेले ज्येष्ठ नगरसेवक हरीश अलीमचंदानी यांच्या प्रभागात महिला (ओबीसी) आरक्षण लागल्याने त्यांना आता दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे. त्याचप्रमाणे भाजपचे सुभाष खंडारे यांच्या प्रभागातही महिला आरक्षण निघाल्याने त्यांना प्रभाग बदलावा लागणार आहे, तर भाजपच्या जानवी डोंगरे यांच्या ठिकाणी पुरुष प्रवर्गासाठी आरक्षण लागू झाल्याने त्यांनाही दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे.आता या आरक्षण सोडतीनंतरच प्रत्येक पक्षाची निवडणूक रणनीती कशी आखली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अकोला महापालिका प्रशासन सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज झाले आहे.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Nov 11, 2025 09:49:55
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण जाहीरण्यात आले आहे. ३२ प्रभागांसाठी हे आरक्षण पडले आहे.... प्रभाग क्रमांक: १ अ) ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक: २ अ) ओबीसी महिला ब) महिला सर्वसाधारण क) सर्वसाधारण ड) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक : ३ अ) महिला अनुसुचित जाती ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड} सर्वसाधारण प्रभाग क्रमांक : ४ अ) महिला अनुसुचित जाती ब) अनुसुचित जमाती क) महिला ओबीसी ड) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक : ५ अ) महिला ओबीसी ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : ६ अ) महिला ओबीसी ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक: ७ अ) ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : ८ अ) अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक: ९ अ) अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : १० अ) महिला अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) अ राखीव ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : ११ अ) अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : १२ अ) ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : १३ अ) अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : १४ अ) ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : १५ अ) ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : १६ अ) अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : १७ अ) महिला अनुसुचित जाती ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : १८ अ) महिला ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) सर्वसाधारण ड) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक: १९ अ) महिला अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) अ राखीव ड) अ राखीव प्रभाग क्रमांक: २० अ) अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : २१ अ) महिला अनुसुचित जाती ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : २२ अ) महिला ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) अ राखीव ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : २३ अ) महिला अनुसुचित जाती ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : २४ अ) ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : २५ अ) अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : २६ अ) अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : २७ अ) अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : २८ अ) ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : २९ अ) महिला अनुसुचित जाती ब) महिला अनुसुचित जमाती क) ओबीसी ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : ३० अ) अनुसुचित जाती ब) महिला अनुसुचित जाती क) ओबीसी ड) महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक : ३१ अ) महिला अनुसुचित जाती ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : ३२ अ) महिला अनुसुचित जाती ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव gfx out.. ! या सोडती मध्ये अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. सीमा सावळे, आशा शेडगे, तुषार कामठे, मयूर कलाटे, शाम लांडे, सुलक्षण शिलवंत धर यांच्या सह अनेक दिग्गजांना अपेक्षित आरक्षण पडलेलं नाहीं
0
comment0
Report
SKShubham Koli
Nov 11, 2025 09:49:21
Thane, Maharashtra:ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक – 2025 साठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया संपन्न झाली आहे. ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वाखाली गडकरी रंग्यातन मध्ये हा कार्यक्रम पार पडला. एकूण 33 प्रभागांसाठी ही आरक्षण सोडतीची प्रक्रिया घेण्यात आली. 33 प्रभागांमधील एकूण 131 जागांपैकी 66 जागा महिलांसाठी आरक्षित राखण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील 9 जागांपैकी 5 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील 3 जागात 2 महिला प्रवर्गासाठी राखीव तर एक ओपन ठेवण्यात आली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) अंतर्गत 17 पैकी 9 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गातील 35 पैकी 18 जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर 17, सर्वसाधारण 84 पैकी 41 महिला 43 प्रवर्गणिहाय तसेच, नागरिकांना या संदर्भात काही हरकती अथवा सूचना असल्यास त्या 16 ते 24 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयात दाखल करता येतील, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उमेश बिरारी यांनी दिली आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 11, 2025 09:40:44
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 11, 2025 08:51:37
Chandrapur, Maharashtra:महानगरपालिका निवडणुकीचा बार उडणार आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातून 66 सदस्य पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. 66 पैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. आज सकाळी अकरा वाजेपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत जिल्हाधिकारी कार्यालय ,महानगरपालिकेचे अधिकारी- कर्मचारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांसमक्ष ही सोडत जाहीरण्यात आली. अनुसूचित जातीच्या 13 जागांपैकी 7 जागा महिला राखीव आहेत अनुसूचित जमातीच्या 5 जागांपैकी 3 महिला राखीव आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या 17 जागांपैकी 9 महिला राखीव आहेत तर खुल्या प्रवर्गाच्या एकूण 31 जागांपैकी 14 जागा महिला राखीव असतील. बाईट १) विद्या गायकवाड, आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
Advertisement
Back to top