Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

जिलाधिकारी की अध्यक्षता में नगर परिषद आम चुनावों को पारदर्शी और सुचारू रूप से संपन्न

Nov 11, 2025 08:33:21
Waghapur, Maharashtra
यवतमाळ : जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नामनिर्देशन प्रक्रिया, आचारसंहिता अंमलबजावणी, मतदान केंद्रांची व्यवस्था तसेच निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Nov 11, 2025 10:02:27
Akola, Maharashtra:अकोला महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज अकोल्यातील प्रमिलाताई ओक सभागृहात पार पडली. एकूण 20 प्रभाग असलेल्या अकोला महानगरपालिकेतील 80 जागांसाठी ही आरक्षण सोडत करण्यात आली. या सोडतीनुसार 80 पैकी 43 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठरल्या आहेत, अनुसूचित जातीसाठी 14 जागा, अनुसूचित जमातीसाठी 02 जागा तर इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) 21 जागा राखीव ठरल्या आहेत. या सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. संभाव्य उमेदवारांनी आपल्या प्रभागांतील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली असून, पक्षश्रेष्ठींकडे तिकिटासाठी हलचालीही वेग घेत आहेत. आज झालेल्या आरक्षण सोडतीनंतर अनेकांचे राजकीय भवितव्य ठरले असून, काहींसाठी ही सोडत आनंदाची ठरली तर काहींसाठी धक्का देणारी ठरली आहे. भाजपमधून निघालेले ज्येष्ठ नगरसेवक हरीश अलीमचंदानी यांच्या प्रभागात महिला (ओबीसी) आरक्षण लागल्याने त्यांना आता दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे. त्याचप्रमाणे भाजपचे सुभाष खंडारे यांच्या प्रभागातही महिला आरक्षण निघाल्याने त्यांना प्रभाग बदलावा लागणार आहे, तर भाजपच्या जानवी डोंगरे यांच्या ठिकाणी पुरुष प्रवर्गासाठी आरक्षण लागू झाल्याने त्यांनाही दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे.आता या आरक्षण सोडतीनंतरच प्रत्येक पक्षाची निवडणूक रणनीती कशी आखली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अकोला महापालिका प्रशासन सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज झाले आहे.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Nov 11, 2025 09:49:55
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण जाहीरण्यात आले आहे. ३२ प्रभागांसाठी हे आरक्षण पडले आहे.... प्रभाग क्रमांक: १ अ) ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक: २ अ) ओबीसी महिला ब) महिला सर्वसाधारण क) सर्वसाधारण ड) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक : ३ अ) महिला अनुसुचित जाती ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड} सर्वसाधारण प्रभाग क्रमांक : ४ अ) महिला अनुसुचित जाती ब) अनुसुचित जमाती क) महिला ओबीसी ड) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक : ५ अ) महिला ओबीसी ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : ६ अ) महिला ओबीसी ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक: ७ अ) ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : ८ अ) अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक: ९ अ) अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : १० अ) महिला अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) अ राखीव ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : ११ अ) अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : १२ अ) ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : १३ अ) अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : १४ अ) ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : १५ अ) ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : १६ अ) अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : १७ अ) महिला अनुसुचित जाती ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : १८ अ) महिला ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) सर्वसाधारण ड) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक: १९ अ) महिला अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) अ राखीव ड) अ राखीव प्रभाग क्रमांक: २० अ) अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : २१ अ) महिला अनुसुचित जाती ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : २२ अ) महिला ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) अ राखीव ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : २३ अ) महिला अनुसुचित जाती ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : २४ अ) ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : २५ अ) अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : २६ अ) अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : २७ अ) अनुसुचित जाती ब) महिला ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : २८ अ) ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : २९ अ) महिला अनुसुचित जाती ब) महिला अनुसुचित जमाती क) ओबीसी ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : ३० अ) अनुसुचित जाती ब) महिला अनुसुचित जाती क) ओबीसी ड) महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक : ३१ अ) महिला अनुसुचित जाती ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक : ३२ अ) महिला अनुसुचित जाती ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव gfx out.. ! या सोडती मध्ये अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. सीमा सावळे, आशा शेडगे, तुषार कामठे, मयूर कलाटे, शाम लांडे, सुलक्षण शिलवंत धर यांच्या सह अनेक दिग्गजांना अपेक्षित आरक्षण पडलेलं नाहीं
0
comment0
Report
SKShubham Koli
Nov 11, 2025 09:49:21
Thane, Maharashtra:ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक – 2025 साठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया संपन्न झाली आहे. ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वाखाली गडकरी रंग्यातन मध्ये हा कार्यक्रम पार पडला. एकूण 33 प्रभागांसाठी ही आरक्षण सोडतीची प्रक्रिया घेण्यात आली. 33 प्रभागांमधील एकूण 131 जागांपैकी 66 जागा महिलांसाठी आरक्षित राखण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील 9 जागांपैकी 5 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील 3 जागात 2 महिला प्रवर्गासाठी राखीव तर एक ओपन ठेवण्यात आली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) अंतर्गत 17 पैकी 9 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गातील 35 पैकी 18 जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर 17, सर्वसाधारण 84 पैकी 41 महिला 43 प्रवर्गणिहाय तसेच, नागरिकांना या संदर्भात काही हरकती अथवा सूचना असल्यास त्या 16 ते 24 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयात दाखल करता येतील, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उमेश बिरारी यांनी दिली आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 11, 2025 09:40:44
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 11, 2025 08:51:37
Chandrapur, Maharashtra:महानगरपालिका निवडणुकीचा बार उडणार आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातून 66 सदस्य पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. 66 पैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. आज सकाळी अकरा वाजेपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत जिल्हाधिकारी कार्यालय ,महानगरपालिकेचे अधिकारी- कर्मचारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांसमक्ष ही सोडत जाहीरण्यात आली. अनुसूचित जातीच्या 13 जागांपैकी 7 जागा महिला राखीव आहेत अनुसूचित जमातीच्या 5 जागांपैकी 3 महिला राखीव आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या 17 जागांपैकी 9 महिला राखीव आहेत तर खुल्या प्रवर्गाच्या एकूण 31 जागांपैकी 14 जागा महिला राखीव असतील. बाईट १) विद्या गायकवाड, आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 11, 2025 08:03:36
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 11, 2025 07:52:52
Pune, Maharashtra:दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट वर असल्याच पाहायला मिळते विशेषतः राज्यातील मंदिराची आणि धार्मिक क्षेत्राची सुरक्षा वाढवण्यात आली है अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर येथे देखील पोलीस प्रशासनाकडून भाविकांच्या वाहनांची आणि भाविकांची कसून तपासणी केली जात आहे शनिशिंगणपूर येथे राज्यातूनच नाही तर देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचं विशेष लक्ष आहे शनिशिंगपूर येथील शनी मंदिर परिसरातून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन पोलीस अधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 11, 2025 07:19:41
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 11, 2025 07:17:09
Jalna, Maharashtra:जालना : धावेडी गावात शेतकरी दांपत्याने आपल्या प्रिय गायीला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला आहे. गायीच्या अंत्यविधीला वाजंत्री लावण्यात आली आणि बैलगाडीतून तिची अंत्ययात्रा काढली गेली. अँकर: जालना तालुक्यातील धावेडी गावात एका शेतकरी दांपत्याने आपल्या प्रिय गायीला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला आहे. या गायीच्या अंत्यविधीला वाजंत्री लावण्यात आली आणि बैलगाडीतून तिची अंत्ययात्रा काढण्यात आली. परिसरात हा अनोखा आणि हृदयस्पर्शी सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागात नवविवाहित तरुणीला लग्न झाल्यानंतर आंदण म्हणून गाय देण्याची परंपरा आहे. धावेडी गावातील साबळे कुटुंबालाही विवाहावेळी अशीच एक गाय "भाग्यलक्ष्मी" म्हणून मिळाली होती. या गाईच्या दूध आणि गोऱ्हे विक्रीतून साबळे कुटुंबाने स्वतःचं नशीब बदललं. एका गायीपासून सुरू झालेली वाटचाल आज 17 म्हशी विकत घेण्यापर्यंत पोहोचली आहे. घरात समृद्धी, आनंद आणि सुख आणणाऱ्या या भाग्यलक्ष्मी गायीचं वृद्धापकाळाने निधन झालं. तेव्हा साबळे दांपत्याने तिच्यावरील कृतज्ञता व्यक्त करत एखाद्या सौभाग्यवती स्त्रीच्या सन्मानाप्रमाणे तिचा अंत्यविधी केला. या गायीला नव्या कोऱ्या साडी-चोळीने सजवण्यात आलं, ओटी भरली गेली, आणि वाजन्त्रीच्या सुरात भावपूर्ण वातावरणात बैलगाडीतून तिची अंत्ययात्रा काढून शेतातच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गायीचं हे अंतिम दर्शन पाहताना ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ही घटना माणूस आणि जनावरामधील नातं किती घट्ट असतं याचं जिवंत उदाहरण ठरली आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 11, 2025 06:47:18
Akola, Maharashtra:अनेक वर्षांपासून कागदोपत्री अडकलेल्या अकोल्यातील शिवणी विमानतळ विस्तार प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. राज्य सरकारने धावपट्टी विस्तारासाठी तब्बल ₹२०८.७६ कोटींच्या खर्चास प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरी दिली आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय ३० ऑक्टोबर २०२५ रोजी राज्याचे मुख्य secretary यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेषाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या शिवणी विमानतळाची धावपट्टी १४०० मीटर आहे. मात्र, वाणिज्यिक उड्डाणांसाठी किमान १८०० मीटर धावपट्टी आवश्यक असल्याने येथे नियमित विमानसेवा सुरू होऊ शकलेली नाही. प्रस्तावित योजनेनुसार २२.२४ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार असून त्यामुळे धावपट्टीची लांबी १८०० मीटरपर्यंत वाढवली जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून विमानतळाचा विस्तार केवळ फाइलपुरता मर्यादित होता. जिल्हा प्रशासनाने चार वेळा राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवूनही महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी आणि विमानतळ प्राधिकरणाकडून ठोस कारवाई झालेली नव्हती. २०२४-२५ च्या राज्य अर्थसंकल्पात अकोला विमानतळासाठी निधी न दिल्याने हा प्रकल्प मागे पडला होता. दरम्यान, अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून ३१ मार्च २०२५पासून नियमित उड्डाणे सुरू झाल्याने अकोलेकरांमध्ये नाराजी होती. आता विशेषाधिकार समितीच्या मंजुरीमुळे शिवणी विमानतळाच्या विस्ताराला गती मिळणार असून अकोल्यातून थेट हवाई प्रवासाचे स्वप्न साकार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पासाठी अकोल्याचे भाजपचे खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्र आणि राज्यस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. तसेच काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी देखील स्वतंत्ररीत्या प्रयत्न केल्याने आता या विषयावर श्रेयवादाचे राजकारण देखील रंगू लागले आहे.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 11, 2025 06:45:52
Pune, Maharashtra:दिल्लीमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण देशात सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने देखील अलर्ट जारी केला असून, देहूरोड पोलिस ठाण्याच्यावतीने घातपात विरोधी पथक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५, होमगार्ड पथक, तसेच पुणे शहर आणि रेल्वे पोलिस दलाचा समावेश असलेले सुमारे ३५० ते ४०० पोलिस अधिकारी व कर्मचारी या सुरक्षा व्यवस्थेत तैनात आहेत. यावेळी पोलीस अधिकारी मंदिर परिसरातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि शिस्त राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे।
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 11, 2025 06:34:54
Pandharpur, Maharashtra:दिल्ली येथील बॉम्बस्फोट घटनेनंतर पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात पोलिसांनी हाय अलर्ट दिला आहे. आज सकाळपासूनच विठळ मंदिर परिसरात पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे येथे दररोज हजारो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विठ्ठल मंदिर परिसरामध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर बंदूकधारी पोलीसांची सुरक्षा देण्यात आली आहे. याबरोबरच मंदिर परिसरातील सगळे रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. मंदिर परिसरातून सुरक्षेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी...
0
comment0
Report
Advertisement
Back to top