Back
अक्कलकुवा के डोटकीपाडा सड़क: मानक उल्लंघन का आरोप, जांच की मांग
PPPRASHANT PARDESHI
Dec 16, 2025 03:19:38
Dhule, Maharashtra
अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत खडकापाणी अंतर्गत डोटकीपाडा येथे पंचायत समितीमार्फत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट व मानकबाह्य पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत युवक क्रांती नंदूरबारच्या वतीने पंचायत समिती अक्कलकुवा येथे निवेदन देण्यात आले. सदर रस्त्याचे काम सुमारे चार महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र त्या वेळी केवळ खडी टाकून काम अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले होते. यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. या संदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार दाखल केली होती. अलीकडेच अत्यंत खराब व असमतल अवस्थेत असलेल्या रस्त्यावर कोणतीही योग्य तांत्रिक प्रक्रिया न करता थेट सिमेंट काँक्रिट टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रत्यक्ष पाहणीत आवश्यक लेव्हेलिंग, कंपॅक्शन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मानकांनुसार प्रक्रिया न पाळता काम सुरू असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप युवक क्रांतीने केला आहे. त्यामुळे सदर रस्ता अल्पावधीतच खराब होण्याची शक्यता असून शासकीय निधीचा अपव्यय होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तात्काळ तांत्रिक चौकशी करून कामाची मोजणी व गुणवत्ता तपासणी करावी, तसेच दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून सदर रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी युवक क्रांती नंदूरबारच्या वतीने करण्यात आली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 10, 2026 10:35:560
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJan 09, 2026 17:17:360
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 16:00:320
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 14:17:250
Report
SNSWATI NAIK
FollowJan 09, 2026 11:08:250
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 10:59:080
Report
SGSagar Gaikwad
FollowJan 09, 2026 09:33:550
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 09:20:000
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 09:13:210
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 07:52:140
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 07:49:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 07:33:140
Report
AKAMAR KANE
FollowJan 09, 2026 06:50:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 06:49:160
Report