Back
अजित पवार के विमान हादसे में कट की आशंका; रोहित पवार ने सीबीआई जांच मांगी
JJJAYESH JAGAD
Feb 18, 2026 10:52:34
Akola, Maharashtra
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर काही दिवसांनी या प्रकरणाला नव्या वादाची किनार मिळाली आहे. अपघातामागे कटकारस्थान असण्याची शक्यता व्यक्त करत आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. सुमित कपूर यांना आमिष दाखवून “सुसाईड बॉम्बर” म्हणून पाठवण्यात आले असावे, तसेच विमानाच्या टॉयलेटजवळ अतिरिक्त इंधन साठवून स्फोट घडवण्यात आला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येसारखा कट येथेही रचला गेला असावा, असा दावाही करण्यात आला आहे.रोहित पवार यांनी VSR कंपनीवर कोणाचे वरदहस्त आहे का, तसेच कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. आर्थिक व्यवहारांसह सर्व शक्यतांचा तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, या संदर्भात काल शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली. उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीवर आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली. “ही मागणी रास्त असून मी आठ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्र दिले होते, मात्र त्यावर अद्याप उत्तर मिळाले नाही,” असे मिटकरी यांनी सांगितले. तसही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य शासनाने केंद्र सरकारसोबत समन्वय साधून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच सर्व आमदारांनीही चौकशीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मिटकरी यांनी केले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 18, 2026 12:33:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 18, 2026 12:16:250
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 18, 2026 11:52:590
Report
AKAMAR KANE
FollowFeb 18, 2026 11:52:420
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 18, 2026 11:50:410
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 18, 2026 11:45:250
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 18, 2026 11:32:080
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 18, 2026 11:30:260
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 18, 2026 11:21:210
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 18, 2026 11:17:330
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 18, 2026 10:32:240
Report
UPUmesh Parab
FollowFeb 18, 2026 10:04:190
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 18, 2026 10:01:240
Report
UPUmesh Parab
FollowFeb 18, 2026 09:51:150
Report