Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

ब्लैक बॉक्स जलना कैसे संभव है? महाराष्ट्र सरकार पर सवाल

UPUmesh Parab
Feb 18, 2026 10:04:19
Oros, Maharashtra
विमान अपघात आणि ब्लॅक बॉक्सवर शंका- जगामध्ये अनेक वेळा विमान अपघात झालेले आहेत. विमान अपघात म्हणजे स्फोट आलाच, विमान जळणं आलंच, तरीसुद्धा आजपर्यंत ब्लॅक बॉक्स जळून खाक झाल्याचं कधी ऐकलेलं नाही. अहमदाबादची दुर्घटना तर कितीतरी मोठी होती, पण त्यातला ब्लॅक बॉक्स सापडला आणि डेटा काही खराब झालेला नव्हता. मग हाच का? इथं संशय जास्त आहे आणि रोहित पवारांनी जो काही संशय व्यक्त केलाय, तो खरा वाटतो. तेव्हा याच्यावर DGCA ने प्रकाश टाकला पाहिजे आणि सरकारनेही प्रकाश टाकला पाहिजे, नेमका ब्लॅक बॉक्स जळालाच कसा? एवढंच! आणि हे विचारायचा अधिकार आहे, कारण राज्याचा उपमुख्यमंत्री त्याच्यामध्ये दगावलेला असेल, तर हे विचारायचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहेच. ऑन- अल्पसंख्याक शाळांच्या मंजुरीबाबत-अजित दादांनीच हा निर्णय घेतलाय असा बनाव करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या लेव्हलला काही भ्रष्ट मार्गानं या मान्यता दिलेल्या आहेत का हे तपासणं गरजेचं आहे. खरं खरं ज्या अल्पसंख्याक संस्था काम करतात, अल्पसंख्याकांसाठीच काम करतात आणि काही राजकीय हेतूने त्या अडवलेल्या होत्या आतापर्यंत, असं असेल आणि मान्यता दिली असेल तर आमची काही हरकत नाही. पण बोगस अल्पसंख्याक संस्था असतील, तर त्याची निश्चितच चौकशी झाली पाहिजे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Feb 18, 2026 11:52:59
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग - नाशकात जीर्ण भिंत कोसळून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू प्रशासनाच्या दुर्लक्ष; चिमुकल्यांचा बळी? धोकादायक इमारतीचा घेतला जीव खेळता खेळता काळाचा घाला; सातपूर परिसरात शोककळा नाशिक शहरातील सातपूर कॉलनी परिसरात अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. सातपूर कॉलनीतील कामगार कल्याण मंडळाच्या जवळच असलेल्या एका जुन्या आणि जीर्ण अवस्थेतील घराची भिंत अचानक कोसळल्याने एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उजेर खान असे या मृत चिमुकल्याचे नाव असून ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. परिसरातील मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घर अनेक दिवसांपासून धोकादायक अवस्थेत होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे....काल सायंकाळी परिसरात खेळत असताना अचानक ही भिंत कोसळली आणि जवळच असलेल्या उजेर खान याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी अवस्थेतील चिमुकल्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेमुळे सातपूर कॉलनी परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जीर्ण व धोकादायक इमारतींकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे का, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. नाशिक शहरात वाढत्या शहरीकरणा सोबत सुरक्षिततेचे प्रश्नही गंभीर होत चालले आहेत.प्रशासन याकडे वेळीच लक्ष देणार का? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे....
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 18, 2026 11:52:42
Nagpur, Maharashtra:नागपूर:- नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराज्यीय मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय . 10 आरोपींना अटक केलीय . पोलिसांनी आरोपींकडून ४० मोबाईल फोन जप्त केले आहेत, ज्यांची किंमत अंदाजे १२ लाख रुपये आहे.पोलिसांना माहिती मिळाली की काही संशयित शहरात मोबाईल चोरी करणारी टोळीतील काही सदस्य भाड्याच्या घरात रहात आहेत. माहितीच्या आधारे, पोलिस पथकाने संबंधित घरात सापळा रचला आणि सर्व आरोपींना ताब्यात घेतले.सर्व आरोपी झारखंडचे रहिवासी आहेत आणि नागपूर शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत गर्दीच्या ठिकाणी जाऊन मोबाईल चोरी करत होते. चोरीनंतर त्यांनी चोरीचे फोन इतर राज्यात विक्री करत होते पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे आणि टोळीने इतर कोणत्या ठिकाणी गुन्हे केले आहेत याचीही तपास करत आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 18, 2026 11:50:41
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तयार होणा-या फेडएक्स टर्मिनल हब मुळे मालवाहतूकच्या क्षेत्रात एकूणच गुणवत्ता उंचावणार आहे. फेडएक्स जगभरातील 650 विमानतळावर कार्यरत आहे ज्यामध्ये 700 मालवाहतूक विमाने वापरली जातात. या नव्या विमानतळावरील फेडएक्सच्या सुविधेमुळे महाराष्ट्रातील मालवाहतुकीला अधिक चालना मिळेल. विशेष करून देशाची आर्थिक, व्यापारी, तसेच मनोरंजन राजधानी असणा-या मुंबईत एमएमआर क्षेत्रात हे विमानतळ असल्यामुळे हे भारताचे भविष्य आहे. 2047 पर्यंत हा भाग 5 ट्रिलीयन अर्थव्यवस्था होणारा असणार आहे ज्यामध्ये फेडएक्सचे सर्वात जास्त योगदान असणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबईत केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडएक्स च्या पूर्णपणे स्वयंचलित हवाई मालवाहतूक (एअर कार्गो) हबचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अदानी उद्योग समूहाचे जीत अदानी, वरिष्ठ अधिकारी, सिडकोचे उपाध्यक्षा विजय सिंघल, वने मंत्री गणेश नाईक आमदार मंदा म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते. हे हब पश्चिम भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापार कॉरिडॉर मजबूत करण्यासाठी एनएमएआयच्या बहुआयामी पायाभूत सुविधांचा वापर करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, लॉजिस्टिक्स च्या इतिहासात भारतासाठीच नव्हे महाराष्ट्र, मुंबईसाठी आजचं हे भूमिपूजन महत्वाचं आहे. व्यापाराच्या क्षेत्रात खूप मोठे बदल होत आहेत. जुनी आव्हानं बदलून नवीन आव्हानं तयार होत आहेत आणि पुरवठा साखळीवर त्याचा बदल दिसून येत आहे. या संघर्षाच्या काळात मुंबईत फेडएक्स सारख्या कंपनीने गुंतवणूक करण्याचं ठरवलं हे भारताच्या शक्तीचं प्रतीक आहे. तसंच व्यापाराचा संबंध येतो तेव्हा भारत, मुंबईचं महत्व किती आहे हे दाखवते. त्यामुळे या कंपनीला मी सांगू इच्छितो की तुम्ही योग्य वेळी निर्णय घेतला आहे. कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रवासी आणि मालवाहतूकीसाठी भारताचे मोठे आणि व्यस्त विमानतळ असणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. फेडएक्स 2,50,000 कोटींपेक्षा जास्त दीर्घकालीन गुंतवणुकीसह एनएमआयएमध्ये 3,00,000 चौरस फूट पूर्णपणे स्वयंचलित एअर कार्गो हब विकसित करेल. ही सुविधा भारताला आग्नेय आशिया, पश्चिम आशिया, युरोप आणि युनायटेड स्टेट्सशी जोडणारे प्रादेशिक केंद्र म्हणून काम करेल. हे हब लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, वाहतूक आणि संबंधित सेवांमध्ये 6,000 हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करेल.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 18, 2026 11:45:25
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... लातूर शहरात विद्यार्थ्यांच्या हत्या प्रकरणातील चारही आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. शिवाजीनगर पोलीस ठाणे येथून शहराच्या मुख्य चौकातून आरोपींना थेट घटना घडलेल्या ठिकाणी नेण्यात आले. औसा रोडवरील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या दोन गटांत झालेल्या वादातून चाकू हल्ला झाला होता. यात एकाचा मृत्यू झाला होता तीन जण जखमी झाले होते. या घटनेनंतर दहशत निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही कडक कारवाई केली. धिंडीदरम्यान मुख्य रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलिसांच्या या कारवाईची जोरदार चर्चा होत असून, यामुळे गुन्हेगारांना धडा मिळेल का याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे. अभिषेक शिंदे ( पोलीस अधीकारी)
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 18, 2026 11:32:08
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 18, 2026 11:30:26
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या रेमंड युको डेनिम कंपनीत कामगारांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यासाठी कामगारांनी आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे. मार्च 2024 मध्ये रेमंड कामगारांचा वेतन वाढीचा करार संपला, त्यानंतर नव्याने करार करून वेतनात वाढ होणे अपेक्षित होते, मात्र अद्याप पर्यंत करार झालेला नाही. पाच हजार रुपयांची वेतन वाढ करावी असा प्रस्ताव मान्यता प्राप्त संघटनेने दिला आहे. याआधी झालेल्या आंदोलनात निलंबित केलेल्या संपूर्ण कामगारांना विनाअट रुजू करून घ्यावे, संप काळातील संपूर्ण पगार द्यावा, ७२५० रुपये वेतनात वाढ करावी, कंपनीतील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना काढून टाकावे अशा मागण्या मान्यता प्राप्त संघटनेने केल्या आहे. आंदोलनामुळे पुन्हा रेमंड कंपनी, जिल्हा प्रशासन आणि कामगारांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 18, 2026 11:21:21
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील दहीहंडा येथे दरवर्षी मोठ्या भक्तिभावात रूपनाथ महाराजांची यात्रा भरवली जाते. यंदाही यात्रा मोठ्या भक्ती भावाने पार पडली. विदर्भातील प्रसिद्ध यात्रांपैकी ही एक मानली जाते. हजारो भाविक या यात्रेसाठी अकोला, बुलढाणा, अमरावती तसेच मध्यप्रदेशातूनही मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. रूपनाथ महाराज हे स्थानिक संत परंपरेतील पूजनीय संत मानले जातात. त्यांच्या समाधीस्थळावर मंदिर उभारण्यात आले असून हे भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या कीर्तन, प्रवचन आणि सामाजिक कार्यामुळे परिसरात त्यांना मोठा मान आहे. यात्रा दरम्यान रोज काकड आरती , कीर्तन व भजन कार्यक्रम, महाप्रसाद, धार्मिक प्रवचने आजोयीत करण्यात येते. असे विविध कार्यक्रम पार पडतात. भक्तांची मोठी श्रद्धा रूपनाथ महाराजांवर आहे. रूपनाथ महाराजांच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक कुटुंबे पिढ्यानपिढ्या या यात्रेत सहभागी होत आहेत.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 18, 2026 11:17:33
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील दहीहंडा येथे दरवर्षी मोठ्या भक्तिभावात रूपराव महाराजांची यात्रा भरवली जाते. यंदाही यात्रा मोठ्या भक्ती भावाने पार पडली. विदर्भातील प्रसिद्ध यात्रांपैकी ही एक मानली जाते. हजारो भाविक या यात्रेसाठी अकोला, बुलढाणा, अमरावती तसेच मध्यप्रदेशातूनही मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. रूपराव महाराज हे स्थानिक संत परंपरेतील पूजनीय संत मानले जातात. त्यांच्या समाधीस्थळावर मंदिर उभारण्यात आले असून हे भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या कीर्तन, प्रवचन आणि सामाजिक कार्यामुळे परिसरात त्यांना मोठा मान आहे. यात्रे दरम्यान रोज काकड आरarti , कीर्तन व भजन कार्यक्रम,महाप्रसाद, धार्मिक प्रवचने आजोयीत करण्यात येते.असे विविध कार्यक्रम पार पडतात. भक्तांची मोठी श्रद्धा रूपराव महाराजांवर आहे. रूपराव महाराजांच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक कुटुंबे पिढ्यानपिढ्या या यात्रेत सहभागी होत आहेत.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 18, 2026 10:52:34
Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर काही दिवसांनी या प्रकरणाला नव्या वादाची किनार मिळाली आहे. अपघातामागे कटकारस्थान असण्याची शक्यता व्यक्त करत आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. सुमित कपूर यांना आमिष दाखवून “सुसाईड बॉम्बर” म्हणून पाठवण्यात आले असावे, तसेच विमानाच्या टॉयलेटजवळ अतिरिक्त इंधन साठवून स्फोट घडवण्यात आला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येसारखा कट येथेही रचला गेला असावा, असा दावाही करण्यात आला आहे.रोहित पवार यांनी VSR कंपनीवर कोणाचे वरदहस्त आहे का, तसेच कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. आर्थिक व्यवहारांसह सर्व शक्यतांचा तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, या संदर्भात काल शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली. उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीवर आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली. “ही मागणी रास्त असून मी आठ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्र दिले होते, मात्र त्यावर अद्याप उत्तर मिळाले नाही,” असे मिटकरी यांनी सांगितले. तसही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य शासनाने केंद्र सरकारसोबत समन्वय साधून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच सर्व आमदारांनीही चौकशीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मिटकरी यांनी केले आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 18, 2026 10:32:24
Chandrapur, Maharashtra:भिगवण येथील मुलीच्या अपहरण प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची चंद्रपुरात प्रतिक्रिया. मला माहिती मिळताच मी पुणे पोलीस अधीक्षक आणि तपास अधिकारी यांच्यासोबत बोलले, घडलेली घटना जर अशा प्रकारे घडली असेल तर हा सुरक्षिततेचा प्रश्न आहे, पोलिसांनी सात तपास पथक यासाठी तयार केली आहेत, घटनास्थळापासूनचे 185 किलोमीटरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत, पण त्यामध्ये घेऊन जाताना ट्रेस होत नाहीये, पोलिसांना तातडीने याचा तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे, जर काही माहिती असेल तर ती पोलिसांना दिली पाहिजे, या परिस्थितीत मुलीचा शोध लागणं फार गरजेचे आहे।
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 18, 2026 10:01:24
Satara, Maharashtra:सातारा -सातारा नगरपरिषदेच्या वतीने उद्या होणाऱ्या शिवजयंती कार्यक्रमात ‘अघोरी नृत्य’ या सादरीकरणाचा समावेश असल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने तीव्र आक्षेप घेतला आहे. विज्ञानवादी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणदिनानिमित्त अशा प्रकारचा कार्यक्रम घेणे योग्य नसून तो तातडीने रद्द करावा, अशी मागणी अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली आहे. निवेदनात आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनीही नगरपरिषदेला तत्काळ सूचना देऊन हस्तक्षेप करावा, असे म्हटले आहे. अंनिसने नमूद केले की, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्यातून उभ्या राहिलेल्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यातील अघोरी आणि अमानुष प्रथा विरोधी कायद्याच्या अस्तित्वात अशा कार्यक्रमाचे आयोजन लांछनास्पद आहे. या मागणीपत्रावर उदय चव्हाण, दीपक माने, वंदना माने, भगवान रणदिवे आणि शंकर कणसे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 18, 2026 09:51:15
Oros, Maharashtra:तळकोकणातील आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने बेजार झालेल्याशेतकऱ्यांनी əlगार मेळाव्याचे आयोजन केले. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ह्यावर्षी कोकणात बदलत्या वातावरणाचा फटका आंबा पिकाला बसलाय सुरवातीला चांगला आलेला मोहोर काळा पडल्याने ह्यावर्षी आंबा पीक कमी येणार ह्यामुळे बागायतदार धास्तावलेत. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी येत्या अधिवेशनात आंबा बागायतदारांसाठी सरकारने पॅकेज जाहीर करावं. कर्ज माफी करावी आणि ज्यांची कर्ज नाहीत त्यांना ND_RF च्या निकषांनुसार चार पट नुकसान भरपाई मिळावी अशा मागण्या या मेळाव्यात सर्वानुमते ठरविण्यात आल्यात शासन दरबारी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास 12 मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. त्यानंतरही शासन सुशेगात राहिल्यास पुढील काळात सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यासह सांगली सातारा येथील शेतकरी बांधवाना घेऊन मुंबई गोवा महामार्ग रोखणार असल्याचा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिलाय.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 18, 2026 09:49:13
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 18, 2026 09:48:44
Washim, Maharashtra:वाशीम: जिल्ह्यातील टो येथील मैनागिरी महाराज महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर १६ फेब्रुवारी रोजी बारावीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरणी शिक्षण विभागाने ५८१ विद्यार्थ्यांवर कारवाई केल्यानंतर पालक संतप्त झाले असून मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय ससाणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दोषी धरून अन्यायकारक कारवाई केली. कॉपी करणाऱ्यांवर कारवाईला विरोध नाही, मात्र निरपराध विद्यार्थ्यांना दोषी ठरवू नये, अशी मागणी त्यांनी केली. पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दोषी विद्यार्थ्यांची स्वतंत्र चौकशी करून निरपराधांना न्याय देण्याची मागणी केली आहे. बाईट:सुनीता राऊत,पालक बाईट:पवन पतंगे,पालक
0
comment0
Report
Advertisement
Back to top