Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
फीड भेजे जाने की खबर ने सुर्ख़ियां बटोरी
AKAMAR KANE
Feb 01, 2026 10:39:52
Nagpur, Maharashtra
फीड पाठवले
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Feb 07, 2026 04:31:06
Nashik, Maharashtra:लाडक्या बहिणींनो चुकीचा पर्याय निवडला; ३१ मार्चपर्यंत करा दुरुस्ती अँकर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना दिलासा देण्यात आलय...अर्ज प्रक्रियेदरम्यान कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत आहे किंवा निवृत्तिवेतन घेतो का, या पर्यायात नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडलेल्या लाभार्थी महिलांना आता ऑनलाइन दुरुस्तीची अखेरची संधी देण्यात येणार आहे. ही संधी ३१ मार्चपर्यंत उपलब्ध राहणार असल्याचे महिला बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, ज्यांची केवायसीच झाली नाही अशा हजारो महिलांसाठी त्यात कोणताही उल्लेख नसल्याने प्रश्न कायम राहण्याची शक्यता आहे.विभागाने ३१ डिसेंबरपर्यंत देण्यात आलेल्या मुदतीत अनेकांना केवायसी करता आली नव्हती. सर्व्हर डाऊन, रेंज नसणे याशिवाय चुकीच्या ऑप्शनमुळे हजारो महिलांचा अर्ज भरला गेला नव्हता. याशिवाय जिल्ह्यातील सुमारे १ लाख ८० हजार बहिणींनी सरकारी नोकरीचा पर्याय निवडल्याने त्यांचा हप्ता बंद करण्यात आला होता. परिपत्रकांनुसार लाभार्थी महिलांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन ८-४७प्रक्रियेद्वारे अर्ज पूर्ण केले होते. मात्र, अनेक लाभार्थीनी माहिती भरताना संबंधित पर्याय चुकीचा निवडल्याचे निदर्शनास आले.या त्रुटीमुळे पात्र लाभार्थीवर अपात्रतेची कारवाई होऊ नये, तसेच सखोल पडताळणी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी शासनाने पुन्हा एकदा ऑनलाइन दुरुस्तीची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, फक्त चुकीचा पर्याय निवडलेल्या लाभार्थी महिलांनाच पोर्टलवर लॉगिन करून माहिती दुरुस्त करता येणार आहे...
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 07, 2026 04:20:14
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 07, 2026 04:18:36
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 07, 2026 04:16:48
Nashik, Maharashtra:कोंग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा आज नाशकात अँकर ब्रह्माव्हॅली अंजनेरी, त्र्यंबकेश्वर येथे प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील यांच्या ब्रम्हा व्हॅली महोत्सवासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आज दुपारी नाशिक येथे येत आहेत. या निमित्ताने ते दुपारी ४ वाजता स्थानिक पदाधिकाऱ्यांसह नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, उत्तर विभाग अध्यक्ष रमेश कहांडोळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत नगरपालिका महापालिका, निवडणुकीत पक्षाला आलेले अपयश लक्षात घेता नव्याने संघटना बांधणीसाठी आणि राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात विविध विषयांवर आंदोलने करण्याचा कार्यक्रम देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे, यंदाच्या पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ३० जागा लढवल्या असता त्यात केवळ तीनच जागा निवडून आल्या आहेत. हे तीनही नगरसेवक पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. ऐनवेळी काँग्रेस चिन्हावर लढले असून सुफी जीन हे त्यांच्या वैयक्तिक करिष्म्याने विजयी झाले आहेत. दरम्यान, काँग्रेसमधील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना शहराध्यक्षांवर टिकेची झोड उठविली होती. यावर सपकाळ काय भूमिका घेतातयाकडे लक्ष लागलाय...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 07, 2026 04:16:34
Nagpur, Maharashtra:नागपूर - शताब्दी वर्षानंतर संघविस्ताराचा आराखडा ठरणार...अखिल भारतीय प्रतिनिधी सभा मार्चमध्ये पानीपत मध्ये होणार, अनेक विषयांवर होणार मंथन - प.प्रांताऐवजी विभागनिहाय प्रचारक नेमण्याचा विचार संघाकडून केला जात आहेय.. - शताब्दी वर्षानंतर संघविस्ताराचा ‘पानीपत फॉर्म्युला’ ठरणार? - संघ विस्तारासाठी जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण..तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी हा नवीन फॉर्म्युला ठरवलं जाणार असल्याची चर्चा - देशभरात सध्या ४५ प्रांत प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र प्रचारक नेमण्याचा प्रस्ताव समोर येण्याची शक्यता.. - महाराष्ट्रात विदर्भ, कोकण, देवगिरी, पश्चिम महाराष्ट्र असे चार प्रांत...विदर्भात नागपूर आणि अमरावती असे दोन विभाग - प्रचारकांची संख्या वाढण्याची शक्यता...संघटनांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर - पंच परिवर्तन, शाखावाढ और जनसंपर्क मोहिमेवर सखोल मंथन पानिपत येथे होईल...भाजप और संघप्रणित संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 07, 2026 04:02:48
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 07, 2026 04:01:53
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील एका माजी सैनिकाच्या मुलीचा मानसिक छळ करून तिच्याकडे शरीरसुखाची आणि पैशांची मागणी करणाऱ्या महाराष्ट्र माजी सैनिक महामण्डळाच्या सुपरवायझरवर वाशिम शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सतीश पिंपळकर असं या सुपरवायझरचं नाव असून या घटनेमुळ महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रारदार मुलीने दिलेल्या माहिती नुसार ती माजी सैनिकाची मुलगी असून महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाकडं तिनं नोकरी साठी अर्ज केला होता. सर्व कागदपत्र आणि पात्रता असूनही वारंवार त्या कागदपत्रात त्रुटी काढून तिचा मानसिक छळ केला आणि त्रुटी पूर्ण केल्यावर ४० हजार रुपयांची मागणी केली मात्र पैसे देण्यास नकार दिल्यावर, शरीरसुखाची मागणी सुद्धा करण्यात आली, यासह पीडिते सोबत अश्लील संभाषण केले, या प्रकरणी वашिम शहर पोलिसांनी सतीश पिंपळकर आणि अन्य लोकांविरोधात विविध कलमान्वे गुन्हे दाखल करण्यात आलं असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 07, 2026 03:46:09
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज… AC ::- ਲਤੂਰ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सकाळपासूनच शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ६६१ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. प्रशासनाने केलेल्या जय्यत तयारीनंतर सकाळी ७:३० वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या ११८ गणांसाठी ही निवडणूक होत आहे. सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची रांग दिसून येत आहे. मतदान प्रक्रिया सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ७४७ मतदान केंद्रांवर मतदान होत असून, त्यासाठी ८ हजार ४१४ अधिकारी व कर्मचारी नियुक्त झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Feb 07, 2026 03:45:59
Pune, Maharashtra:Headline : मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. साडेसात वाजता पहिले मतदान करण्यासाठी मतदारांनी एकच गर्दी केली होती. मावळ तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. सकाळी मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषतः रोज कामासाठी जाणारे कर्मचारी, मजूर वर्ग मोठ्या संख्येने लवकरच मतदानाचा हक्क बजावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मावळमध्ये सकाळच्या वेळेत मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांमध्ये लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचा उत्साह दिसत असून, मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून सुरळीत मतदानासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रावरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 07, 2026 03:33:10
Chendhare, Alibag, Maharashtra:मतदान केंद्राबाहेर मतदार सहायक केंद्र ...... मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधून देण्यात होते मदत ...... रायगड जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांना आपलं मतदान केंद्र शोधण्यात त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार सहायता केंद्र उघडण्यात आलं आहे. या केंद्रांवर खास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी मतदारांना त्यांचे केंद्र, अनुक्रमांक, यादीचा भाग क्रमांक शोधून देण्यात मदत करीत आहेत. मतदार याद्यांमध्ये होणाऱ्या चुका आणि घोळामुळे अनेकदा मतदारांना त्यांचं नाव मतदार यादीत सापडत नाही अशा वेळी त्यांची गैरसोय नये यासाठी ही सुविधा करण्यात आली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top