Back
लातूर: निजी स्कूल के ऑटो में 19 विद्यार्थी, क्षमता से अधिक यात्रा—पालक चिंतित
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 06, 2026 11:18:04
Latur, Maharashtra
लातूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात खाजगी इंग्लिश माध्यमाच्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आपल्या मुलांनी इंग्लिश माध्यमात शिक्षण घ्यावे अशी पालकांची इच्छा वाढली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची क्षमता, सुरक्षितता आणि नियमांचे पालन होते का, याकडे मात्र कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. याचाच फायदा घेत काही खाजगी शाळांकडून विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक केली जात असल्याचा प्रकार निलंगा येथे समोर आला आहे. सात प्रवाशांची क्षमता असलेल्या कट ऑटोमध्ये तब्बल 19 ते 20 विद्यार्थ्यांना कोंबून ने-आण केली जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. संतप्त पालकांनी या ऑटोचा व्हिडिओ काढत चालकाला जाब विचारला असून, वारंवार सूचना देऊनही शाळा प्रशासन, आरटीओ आणि पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया याच संदर्भातील ZEE 24 TAAS चार स्पेशल रिपोर्टमधून… दरम्यान, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. वारंवार सूचना देऊनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षााबाबत कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या वाहनांची आरटीओकडून नियमित तपासणी होते का? जर तपासणी होत असेल, तर क्षमतेपेक्षा तिप्पट विद्यार्थी घेणारी अशी वाहने रस्त्यावर कशी चालतात? शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी असलेली जागा मानली जाते. मात्र क्षमतेपेक्षा तिप्पट विद्यार्थ्यांना कोंबून, तांत्रिक बिघाड असलेल्या वाहनातून ने-आण केली जात असेल तर हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळच ठरतो. आता या गंभीर प्रकारावर प्रशासन काय कारवाई करते, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा आणि वाहन चालकांवर कारवाई होते का आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या जातात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 06, 2026 17:18:46Navi Mumbai, Maharashtra:नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त मनसेतर्फे भव्य आतिषबाजी करत शिवरायांना वंदन करण्यात आले. यावेळी भव्य आतिशबाजी पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
0
Report
SNSWATI NAIK
FollowMar 06, 2026 17:01:570
Report
ABATISH BHOIR
FollowMar 06, 2026 16:45:260
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 06, 2026 14:47:510
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 06, 2026 14:33:160
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 06, 2026 13:49:490
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 06, 2026 13:36:590
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 06, 2026 13:36:460
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 06, 2026 13:00:200
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 06, 2026 12:45:320
Report
ABATISH BHOIR
FollowMar 06, 2026 12:31:120
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 06, 2026 12:05:240
Report
KJKunal Jamdade
FollowMar 06, 2026 11:51:170
Report
PNPratap Naik1
FollowMar 06, 2026 11:31:510
Report