Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याण की शिवजयंती पर एपस्टीन फाइल्स संदर्भित चित्ररथ पर ठाकरे गट का विवाद

ABATISH BHOIR
Mar 06, 2026 12:31:12
Kalyan, Maharashtra
कल्याणच्या शिवजयंती मिरवणुकीत ‘एपस्टीन फाईल्स’वर ठाकरे गटाचा वादग्रस्त चित्ररथ पोलिस हस्तक्षेपानंतरही कारवाईच्या मागणीवर शिवसैनिक ठाम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे कल्याणमध्ये दरवर्षी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवजयंती मिरवणुकांमध्ये विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररथ हे विशेष आकर्षण असते.यंदा कल्याण पश्चिमेतील रामबाग शाखेकडून ‘एपस्टीन फाईल्स’ संदर्भातील देखावा साकारण्यात आला आहे. शिवसेनेचे उपनेते विजय साळवी त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून हा देखावा तयार करण्यात आला आहे. अमेरिकेच्या United States Department of Justice कडून जाहीर झालेल्या कथित एपस्टीन फाईल्समध्ये काही भारतीय व्यक्तींचा उल्लेख असल्याचा मुद्दा या देखाव्यात मांडण्यात आला आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून या प्रकरणात भारतातील मंत्री, नेते, उद्योजक, कलाकार आणि खेळाडू यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवलेल्या स्त्री सन्मानाच्या संस्कृतीचा संदेशही या देखाव्यातून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा छत्रपतींनी मातेसमान सन्मान केल्याचा प्रसंगही चित्ररथात दाखवण्यात आला आहे. दरम्यान, चित्ररथावर काही शासकीय आणि संविधानिक पदांवरील व्यक्तींची नावे दाखवण्यात आल्याने पोलिसांनी आयोजकांना ती काढण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांच्या सूचनेनंतर काही नावे चित्ररथातून हटवण्यात आली असली तरी संबंधितांवर चौकशी व कारवाईची मागणी कायम ठेवण्यात येणार असल्याची भूमिका ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Mar 06, 2026 16:45:26
Kalyan, Maharashtra:छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आणि शिवसेना शिंदे आज भव्य असे मिरवणूक करण्यात आली या मिरवणूक मध्ये हजारो शिवभक्त सामील झाले होते कल्याणच्या सिंधी गेट येथून दोन्ही मिरवणुका काढण्यात आल्या होत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मिरवणूक संध्याकाळी चार वाजता सुरू झाली तर शिवसेना शिंदे गटाकडून सहा वाजता मिरवणूक करण्यात आली या मिरवणूक मध्ये तारपा नृत्य, लेझीम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती देखावे तसेच घोड्यावरती स्वार असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांची सेना मोठ्ठया आयटीत मिरवणुकीत दिसून आली. त्याच प्रमाणे उद्धव ठाकरे सेनेने एपस्टीन फाईल मधील देखावा मिरवणुकीत चर्चेचा विषय ठराला
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 06, 2026 14:47:51
Shirur, Maharashtra:शिरूर पुणे... शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गामध्ये चक्क सात विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या उपस्थितीतीत अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडल्याने पालक आक्रमक होऊन पालकांनी शिक्षकाच्या बदलीची मागणी केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गातील अल्पवयीन सात युवकांना वर्गातीलच एका विद्यार्थ्याने निर्दयीपणे बेदम मारहाण केल्याची घटना घडल्याने आज संतप्त पालकांनी ग्रामस्थ, पदाधिकारी व शिक्षकांच्या उपस्थितीत शाळेमध्ये बैठक घेतली, दरम्यान ग्रामस्थांच्या उपस्थितीत काही ग्रामस्थांनी सातवीच्या वर्गाची झडती घेतली असता वर्गामध्ये चक्क शितपेय, अल्कोहोल युक्त पेय, तंबाकू यांसह आदी पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने खळबळ उडाली आणि सातवीच्या वर्गातून अधिकारी घडवायचे कि गुन्हेगार असा सवाल उपस्थित ओळखून शिक्षकांना केला, दरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या तक्रारीचा पाढाच कथन केला, तर वर्गामध्ये एका विद्यार्थ्याची मोठी दहशत असून त्या विद्यार्थ्याला शिक्षक पाठीशी घालत असल्याचे समोर आले मात्र सदर विद्यार्थी व त्याचे पालक गैरहजर असल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली,
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 06, 2026 14:33:16
Nanded, Maharashtra:होमिओपॅथीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या युवतीने आत्महत्या केली. नांदेड शहराच्या हडको भागात ही घटना घडली. 25 वर्षीय आकांक्षा गायकवाड हडको येथील पद्मश्री शायमराव कदम बी एच एम एस कॉलेजमध्ये शिकत होती. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पदाधिकारी असलेले जीवन घोगरे पाटील यांच्या निवासस्थानी इतर मुलींसोबत कॉट बेसिसवर ती राहत होती. आकांक्षाने आपल्या रुममधील पंख्याला ओढणी बांधून दुपारी गळफास घेतल्याचे उघड झाले. ग्रामीण पोलीसांनी तात्काळ धाव घेत पंचनामा केला. आकांक्षाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. दरम्यान आकांक्षाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करून गळफास दिल्याचा आरोप आकांक्षाच्या वडिलांनी केला. आकांžाच्या नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलीस करताहेत.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 06, 2026 13:49:49
Washim, Maharashtra:वाशिम: कारंजा शहरातील खाटीकपुरा परिसरात राहणाऱ्या दुर्गेश सुभाष माहोरे या ३२ वर्षीय युवकाचा मृतदेह शहरालगतच्या विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुर्गेश माहोरे हा गुरुवारपासून घरून निघून गेला होता. त्यानंतर शोधाशोध केली असता आढळून आले नाही. त्यांचा शोध सुरू असताना आज दुपारी ड्रीमलँड सिटी परिसरातील विहिरीत त्यांचा मृतदेह एका व्यक्तीला आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 06, 2026 13:36:46
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर महानगरपालिकेत स्थायी समिती सदस्य यादीत केवळ वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समाविष्ट केल्याप्रकरणी गटनेते राजेश अड्डूर यांना प्रदेशाध्यक्षांनी जारी केली कारणे दाखवा नोटीस, तीन दिवसात याबाबत खुलासा करण्याचे निर्देश, पक्षशिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याचा इशारा। अँकर: चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप आणि उबाठा शिवसेना यांचा महापौर व उपमहापौर झाल्यानंतर स्थायी समिती गठीत होणे आवश्यक होते. परंतु ती सुमारे महिनाभरानंतर विशेष सभेत गठित झाली. सभेत काँग्रेस गटनेते राजेश अड्डूर यांनी महापौरांना बंद लिफाफ्यात नावे दिली. ही सातही नावे केवळ वडेट्टीवार गटाचीच होती. मात्र खा. धानोरकर गटाच्या एकाही नगरसेवकाचा यात समावेश नव्हता. यावरून विशेष सभेत काँग्रेसच्या नाराज नगरसेवकांनी आपल्याच गटनेत्याचा निषेध करत सभात्याग केला. वेगळी पत्र परिषद घेत राजेश अडडूर यांची हकालपट्टी करत प्रसंगी पक्षातूनही निष्कासन करण्याची मागणी खा. धानोरकर समर्थकांनी केली. रीतसर तक्रार झाल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राजे अडडूर यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. तीन दिवसात खुलासा न केल्यास पक्षशिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याचा इशाराही पत्रात देण्यात आला आहे. आधीच काँग्रेसच्या दोन गटांमध्ये मोठा संघर्ष पेटल्याने चंद्रपूर मनपा काँग्रेसच्या हातून गेली आहे. त्यातच आता स्थायी समिती सदस्य निवडीवरूनही काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. आवडेट्टीवर गट यावर आता कोणती राजकीय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 06, 2026 12:45:32
Ambernath, Maharashtra:बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई सोनोग्राफी सेंटरमध्ये काम करणारी सोनल गरेवाल पाठवायची महिलांचे व्हिडिओ कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण नसताना हाताळायची सोनोग्राफी मशीन सोनोग्राफी सेंटरचा परवाना रद्द, सेंटर सील Anchor - बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर येतीय. या प्रकरणात उल्हासनगरतून अटक करण्यात आलेली सोनल गरेवार ही महिला प्रशिक्षण नसताना सोनोग्राफी मशीन हाताळायची. तसंच टोळीला महिलांचे 30 सेकंदाचे व्हिडिओ बनवून पाठवायची अशी माहिती पोलीस तपासात समोर आलीय. उल्हासनगर मधील एका सोनोग्राफी सेंटरमधून सोनल गरेवाल हिला पोलिसांनी अटक करण्यात आली होती. संबंधित सेंटरचा परवाना रद्द करण्यात आलाय तसंच हे सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आलय. उल्हासनगर आरोग्य अधिकाऱ्यांनी या सोनोग्राफी सेंटरमध्ये पाहाणी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केलीय. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आलीय.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 06, 2026 12:05:24
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरातील अनिता माळगे यांनी " यशस्विनी " च्या माध्यमातून उभा केल्या thousand महिलया उद्योजक ( महिला दिन विशेष ) अनिता माळगे... खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिता माळगे यांच्या प्रेरणादायी यशोगाथेची माहिती घेत त्यांना शाब्बासकीची थाप दिलीय. अनिता माळगे यांनी सोलापुर जिल्ह्यात 2015 साली केवळ महिलांच्या विकासासाठी यशस्विनी ऍग्रो प्रोड्यूसर नावाची कंपनी स्थापन केली. यशस्विनी ऍग्रो ही राज्यातील पहिली शेतकरी उत्पादन महिला कंपन्या असून मागील दहा वर्षात अडीच हजारांपेक्षा जास्त यशस्वी महिला उद्योजक घडवल्या आहे। यशस्विनी ऍग्रोच्या सर्वेसर्वा अनिता माळगे यांच्या आज पर्यंतच्या वेगवेगळ्या कार्याची दखल अनेक संस्था आणि संघटनांनी घेतलीय. आपला पंचक्रोशीतील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनिता माळगे यांनी महिलांना ट्रॅक्टरचे प्रशिक्षण देणे, कुक्कुटपालन, रिक्षा चालवणे, आठवडी बाजार भरवणे असे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. अनिता माळगे यांची सोलापूर जिल्ह्यात मिलेट वुमन म्हणून देखील ओळख आहे. जी ट्वेंटी परिषदेमध्ये अनिता माळगे यांनी एक महिला उद्योजक म्हणून आपला सहभाग नोंदविला होता. शासनाच्या विविध योजनांचे महिला शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे प्रसंगी आवाज उठवण्याचे देखील काम अनिता माळगे यांनी केले आहे. यशस्विनी उद्योगसमूहाला पुढे: ग्रामीण भागामध्ये महिलांनी घराबाहेर कामाला जायचं नाही अशी पद्धत आज देखील बघण्यासाठी. मात्र यशस्वीनी ऍग्रो कंपनीच्या माध्यमातून अनिता माळगे यांनी ग्रामीण भागातील महिलांवरच विशेष काम केले आहे. खेडोपाड्यातील महिलांना विविध उद्योगांच्या माध्यमातून चांगला रोजगार उपलब्ध करून दिलाय. यामुळे अनेक महिलांचा संसाराचा गाडा सुरळीत होण्यास मदत झालीय. कॉलेज महिलांनी आपला अनुभव झी - 24तासशी बोलताना सांगितले आहेत. यशस्विनी उद्योगसमूहाला पुढे: भविष्यात राज्यात विविध ठिकाणी महिलांसाठी मॉलची उभारणी देखील करण्यात येणार आहे यामध्ये केवळ शेतीशी निगडित वस्तूंची विक्री करण्यात येणार आहे. यात सोबत सोलापूर जिल्ह्यात विविध प्रकारचे बेकरी प्रॉडक्ट बनवणे, विविध फळांपासून, पालेभाज्यांपासून पावडर निर्मिती करणे अशा पद्धतीचे प्रोजेक्टची उभारणी युद्ध पातळीवर सुरू आहे. म्हणूनच अनिता माळगे आणि यशस्वीिनी उद्योगसमूहाला अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खुप सार्‍या शुभेच्छा.... अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 06, 2026 11:31:51
Kolhapur, Maharashtra:धक्कादायक! पोषण आहाराच्या पाकिटात आढळली मेलेली बेडकी; गगनबावडा तालुक्यातील संतापजनक प्रकार. Anc:- गर्भवती माता आणि लहान मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या 'पोषण आहारा'बाबत एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. गगनबावडा तालुक्यातील शेणवडे पैकी चौगुलेवाडी येथे अंगणवाडीतून वाटप करण्यात आलेल्या पोषण आहाराच्या पाकिटात चक्क मेलेली बेडकी मृतावस्थेत आढळून आल्याने पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागांतर्गत (ICDS) गर्भवती माता आणि सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना सकस आहार दिला जातो. यामध्ये डाळ, तांदूळ, तिखट, मीठ आणि 'सुकडी'च्या पाकिटांचा समावेश असतो. चौगुलेवाडी येथील अंगणवाडीतून लाभार्थ्यांना या आहाराचे वाटप करण्यात आले होते. मात्र, एका लाभार्थ्याने जेव्हा 'सुकडी'चे पाकीट उघडले, तेव्हा त्यात मेलेली बेडकी मृतावस्थेत आढळली. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. सरकारी योजनेतून मिळणाऱ्या अन्नातच जर अशा प्रकारे घाण आणि मृत प्राणी आढळत असतील, तर मुलांच्या आणि मातांच्या आरोग्याचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यामध्ये या पोषण आहाराचा पुरवठा एकाच ठेकेदाराकडून केला जातो. त्यामुळे पॅकेजिंगच्या वेळी ही बेडकी पाकिटात गेली कशी? उत्पादनाच्या ठिकाणी स्वच्छतेचे निकष पाळले जातात का? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी आता पालकवर्गातून जोर धरू लागली आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 06, 2026 11:18:04
Latur, Maharashtra:लातूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात खाजगी इंग्लिश माध्यमाच्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आपल्या मुलांनी इंग्लिश माध्यमात शिक्षण घ्यावे अशी पालकांची इच्छा वाढली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची क्षमता, सुरक्षितता आणि नियमांचे पालन होते का, याकडे मात्र कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. याचाच फायदा घेत काही खाजगी शाळांकडून विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक केली जात असल्याचा प्रकार निलंगा येथे समोर आला आहे. सात प्रवाशांची क्षमता असलेल्या कट ऑटोमध्ये तब्बल 19 ते 20 विद्यार्थ्यांना कोंबून ने-आण केली जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. संतप्त पालकांनी या ऑटोचा व्हिडिओ काढत चालकाला जाब विचारला असून, वारंवार सूचना देऊनही शाळा प्रशासन, आरटीओ आणि पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया याच संदर्भातील ZEE 24 TAAS चार स्पेशल रिपोर्टमधून… दरम्यान, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. वारंवार सूचना देऊनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षााबाबत कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या वाहनांची आरटीओकडून नियमित तपासणी होते का? जर तपासणी होत असेल, तर क्षमतेपेक्षा तिप्पट विद्यार्थी घेणारी अशी वाहने रस्त्यावर कशी चालतात? शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी असलेली जागा मानली जाते. मात्र क्षमतेपेक्षा तिप्पट विद्यार्थ्यांना कोंबून, तांत्रिक बिघाड असलेल्या वाहनातून ने-आण केली जात असेल तर हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळच ठरतो. आता या गंभीर प्रकारावर प्रशासन काय कारवाई करते, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा आणि वाहन चालकांवर कारवाई होते का आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या जातात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top