Back
पिंपरी चिंचवड के अनधिकृत कॉल सेंटरों पर पुलिस का बड़ा छापा: अमेरिकन नागरिकों को ठगी का पर्दाफाश
KPKAILAS PURI
Nov 15, 2025 03:36:06
Pimpri-Chinchwad, Maharashtra
आय टी नगरी हिंजवडी मध्ये अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन अनधिकृत कॉल सेंटरवर छापा टाकत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलीस आणि गुन्हे शाखा २ ने पर्दाफाश केला आहे. या कॉल सेंटर मधून थेट अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची माहिती उघड झालीय. या कॉल सेंटर मधून अमेरिकन नागरिकांना अमेरिकन मेडिकल हेल्थ डिपार्टमेंट मधून बोलत असल्याचं सांगून नागरिकांकडून ते वापरत असलेल्या वेलकम पावडर आणि इतर सौंदर्यप्रसाधनांची माहिती घेऊन यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो असं सांगत तुम्हाला संबंधित कंपनीकडून जास्त मोबदला मिळवून दिला जाईल असं सांगून त्यांच्या वैयक्तिक माहिती घेतली जात असे आणि ती अमेरिकेतील लॉ फार्मला विकून त्यातून डॉलर स्वरूपात पैसे मिळवले जात असत. दुसऱ्या प्रकारात डेटाद्वारे तिथल्या नागरिकांशी संवाद साधून लोन मिळवून देण्याच्या आमिषाने त्यांची फसवणूक केली जायची. कम्युनिटी चॉईस फायनानासीयल कंपनीतून बोलत असल्याचं सांगून लोनसाठी क्रेडिट स्कोर सुधारून देण्यात येईल, अस अमिश दाखवून त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे कुपन घेऊन ते डॉलरमध्ये बदलून घेत. दुसऱ्या पद्धतीने देखील अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात होती. सायबर पोलिस आणि गुन्हे शाखा युनिट दोनने याप्रकरणी कॉल 센टर मालक आणि मॅनेजर विरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कॉल सेंटरमधून २० हार्ड डिस्क आणि तीन लपटॉप जप्त करण्यात आले आहेत. टेकला सोल्यूशन कॉल सेंटरचा मालक धंनजय साहेबराव कासार, मॅनेजर हर्षद शंकर खामकर आणि स्काय सोल्यूशनचा मालक सागर कुमार यादव, मॅनेजर आनंद पंकज सिन्हा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. चौघांना न्यायालयाने १८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
193
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
VAVINEET AGARWAL
FollowNov 15, 2025 05:36:100
Report
VSVISHAL SINGH
FollowNov 15, 2025 05:35:590
Report
TCTanya chugh
FollowNov 15, 2025 05:35:470
Report
OTOP TIWARI
FollowNov 15, 2025 05:34:060
Report
NCNITIN CHAWRE
FollowNov 15, 2025 05:33:540
Report
AKAshok Kumar1
FollowNov 15, 2025 05:33:430
Report
YMYadvendra Munnu
FollowNov 15, 2025 05:33:300
Report
RSRandhir Singh
FollowNov 15, 2025 05:33:030
Report
DVDinesh Vishwakarma
FollowNov 15, 2025 05:32:390
Report
NSNeeraj Sharma
FollowNov 15, 2025 05:32:270
Report
AKAjay Kashyap
FollowNov 15, 2025 05:32:100
Report
VAVINEET AGARWAL
FollowNov 15, 2025 05:31:570
Report
ANAnil Nagar1
FollowNov 15, 2025 05:31:430
Report
ANAnil Nagar1
FollowNov 15, 2025 05:31:340
Report
TCTanya chugh
FollowNov 15, 2025 05:31:220
Report