Back
परभणी नगरपालिका चुनाव: प्रत्याशी बंडखोरी के बावजूद दलों ने रणनीति तेज़ कर दी
GDGAJANAN DESHMUKH
Jan 02, 2026 03:30:17
Parbhani, Maharashtra
अँकर- परभणी मनपा निवडणुकीत सर्वच पक्षांना बंडोबाना थंड करण्याची डोकेदुखी वाढलीय. काही पक्षांना कमी तर काहींना यावर जास्त काम करावे लागणार आहे. गुरुवारी दिवसभर बंडखोरांचा बंड शमवण्याचा खेळ सुरू होता. तरीही त्यात अनेकांना यश आले नाही. काही ठिकाणी मात्र त्यात यश आल्याचे दिसत आहे. कुणी पक्षाचा पदाधिकारी आहे तर कुणी माजी नगरसेवक आहे. काहींनी स्वतः बंडखोरी न करता कुटुंबातील कोणाला तरी पुढे केले आहे. यापैकी किती जणांचे बंड शमविण्यात पक्षाला यश येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. या बंडखोरांपैकी ज्यांचे उपद्रवमूल्य जास्त आहे. अशांना मात्र पक्षाकडून नक्कीच गळ घालण्याचा प्रयत्न होणार आहे. निदान उमेदारा तरी त्यांची मनधरणी करण्यासाठी पुढाकार घेईल असे चित्र आहे. प्रभाग २ अ मध्ये राष्ट्रवादीच्या वाहिदाबेगम इकबाल पाशा कुरेशी, प्रभाग ३ अ मध्ये काँग्रेसचे रवींद्र सोनकांबळे, प्रभाग ४ क मध्ये भाजपचे लक्ष्मीकांत क्षीरसागर, प्रभाग ५ ड मध्ये भाजपचे मनोज पोरवाल, प्रभाग ६ अ मध्ये राष्ट्रवादीचे सचिन पांडुरंग पाचपुंजे, उद्धवसेनेचे अमोल गायकवाड, ६ ड मध्ये राष्ट्रवादीचे विजय धरणे, प्रभाग ९ ब मध्ये उद्धवसेनेचे गोविंद इक्कर, ९ क मध्ये काँग्रेसचे गोविंद जमदाडे, भाजपच्या भारती सुशील शर्मा, ९ ड मध्ये शिंदेसेनेचे गजानन प्रकाश फरकंडकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने बंडखोरीचे चित्र दिसत आहे. प्रभाग १० ड मध्ये माजी उपनगराध्यक्ष तथा भाजपचे विश्वास कन्हाळे यांनी बंड केले. १३ ब मध्ये काँग्रेस माजी नगरसेवक साबेरमुल्ला यांनी शेख अकबरीबेगम यांचा अर्ज भरला. प्रभाग १५ ब मध्ये भाजपच्या अॅड. चंचल पवन निकम, उद्धवसेनेच्या अंजली गोविंद माने, १५ ड मध्ये भाजपच्या संध्या देशपांडे, काँग्रेस माजी नगरसेविका अपर्णा देशमुख, १५ ई मध्ये भाजपचे दिनेश नरवाडकर यांनी बंडाचा झेंडा हाती घेतलाय. आता बंडोबाची समजूत काढण्यात येत आहे,पण याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
RKRohit Kumar
FollowJan 02, 2026 05:05:090
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJan 02, 2026 05:04:530
Report
KJKamran Jalili
FollowJan 02, 2026 05:04:010
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJan 02, 2026 05:03:530
Report
KSKULWANT SINGH
FollowJan 02, 2026 05:02:450
Report
PKPradeep Kumar
FollowJan 02, 2026 05:02:110
Report
TSTushar Srivastava
FollowJan 02, 2026 05:02:000
Report
Rasulpur Gaharwali, Uttar Pradesh:रायबरेली :तेज रफ्तार डम्पर ने ऑटो में मारी जोरदार टक्कर
हादसे में ऑटो के उड़े परखच्चे
ऑटो चालक गम्भीर रूप से हुआ घायल
घायल ऑटो चालक की हालत नाजुक, जिला अस्पताल रेफर
बछरावां थाना क्षेत्र के नंदाखेड़ा गांव के पास की घटना
0
Report
SHSAYED HUSSAIN AKHTAR
FollowJan 02, 2026 05:01:450
Report