Back
जालना: बदनापूर में बुलढाणा अर्बन बैंक बंद होने की अफवाह फैल, खातेदार भयभीत
NMNITESH MAHAJAN
Jan 02, 2026 02:32:16
Jalna, Maharashtra
जालना : बदनापूर मधील बुलढाणा अर्बन बँक बंद होण्याची अफवा; खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण, बँकेत मोठी गर्दी अँकर :जालन्यातील बदनापूर येथील बुलढाणा अर्बन बँक बंद होत असल्याची अफवा गेल्या दोन दिवसांपासून शहरात आणि परिसरात झपाट्याने पसरली आहे. या निराधार अफवेचा फटका थेट बँकेच्या खातेदारांना बसत असून, भीतीपोटी अनेक खातेदारांनी बँकेत एकच गर्दी केली आहे. अफवा पसरताच अनेक खातेदारांनी आपल्या बचत खात्यातील रक्कम, मुदत ठेव तसेच सोनेतारण खात्यांमधील रक्कम तातडीने काढून घेण्यास सुरुवात केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परिणामी बँकेसमोर तसेच बँकेच्या काउंटरवर मोठी गर्दी उसळली होती. दरम्यान, बँकेतील कर्मचारी आणि शाखा व्यवस्थापकांनी वेळोवेळी खातेदारांना समज देत “बँक पूर्णपणे सुरळीत असून बंद होण्याबाबतची बातमी ही केवळ अफवा आहे. कुणीही यावर विश्वास ठेवू नये,” असे स्पष्ट केले. तरीही अफवेचा वेग इतका प्रचंड आहे की समजावून सांगूनही अनेक खातेदार भीतीपोटी आपली संपूर्ण रक्कम काढून घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही अफवा आधी इतर जिल्ह्यांमध्ये पसरली होती. त्यानंतर ती बदनापूरमध्ये पोहोचली असून, सोशल मीडियावर तसेच तोंडी चर्चेमुळे ही अफवा अधिकच बळावत आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या अफवेमुळे बँकेच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला आहे. बँक प्रशासनाने खातेदारांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा. बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असून व्यवहार सुरळीत सुरू आहेत. अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबतही प्रशासन विचार करत असल्याची माहिती आहे. दरम्यान, अफवांमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे शहरात संभ्रमाचे वातावरण असून, खातेदारांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. प्रशासन आणि बँक व्यवस्थापनाने एकत्रितपणे या अफवांवर आळा घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे .
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJan 02, 2026 03:49:300
Report
MSMAYUR SHUKLA
FollowJan 02, 2026 03:49:010
Report
KRKishore Roy
FollowJan 02, 2026 03:48:530
Report
AKAMAN KAPOOR
FollowJan 02, 2026 03:48:290
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 02, 2026 03:47:520
Report
AKAshwani Kumar
FollowJan 02, 2026 03:47:140
Report
YSYatnesh Sen
FollowJan 02, 2026 03:46:400
Report
DRDamodar Raigar
FollowJan 02, 2026 03:45:540
Report
KAKapil Agarwal
FollowJan 02, 2026 03:45:460
Report
DBDEVENDRA BISHT
FollowJan 02, 2026 03:45:320
Report
0
Report
BSBIRENDRA SINHA
FollowJan 02, 2026 03:36:250
Report
AMAnkit Mittal
FollowJan 02, 2026 03:35:540
Report
0
Report