Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

Washim पुलिस ने 22 गौवंश बचाए, 18 लाख का माल जब्त

GMGANESH MOHALE
Sept 27, 2025 03:50:38
Washim, Maharashtra
वाशिम: File:2709ZT_WSM_ILLEGALCATTLE_TRANSPORT रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:नागपूरहून हैदराबादला कत्तलीसाठी गुरांची अवैध वाहतूक सुरू असतानाच वाशिम पोलिसांनी मोठी कारवाई करत २२ गुरांना जीवनदान दिले आहे.वाशिम-हिंगोली मार्गावरील तोंडगाव नाक्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली असता संशयित वाहन थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र चालकाने वाहनाचा वेग वाढवत पळ काढला. पोलिसांनी तब्बल १० किलोमीटरपर्यंत पाठलाग करून अखेर वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत १४ लाखांचे वाहन आणि ४ लाख २५ हजारांची गुरे असा मिळून १८ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाचविण्यात आलेल्या गुरांना शिरपूर येथील गोशाळेत हलविण्यात आले असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिकचा तपास वाशिम ग्रामीणचे पोलीस करीत आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Sept 27, 2025 05:48:52
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 27, 2025 05:48:45
Parbhani, Maharashtra:अँकर- हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री पासून जोरदार पाऊस सुरू आहे, कळमनुरी वसमत तालुक्यातील अनेक मंडळात तर ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, वसमत तालुक्यातील मधुमती नदीला पूर आला असून नदीच्या पुराचे पाणी कुरुंदा गावातील अनेक भागात शिरले आहे,तर दांडेगाव,पांघरा शिंदे,कळमनुरी तालुक्यातील तुप्पा भागातील ओढ्यांना पूर आल्याने येथील संपर्क तुटला,हिंगोली ते समगा मार्गावरील लहान पुलावरून पाणी वाहात असल्याने समगा रस्ता बंद झाला आहे. तर हिंगोली ते पुसद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे गावात पाणी शिरले आहे. कयाधु नदी दुथडी भरून वाहत असल्याने कोंढुर गावाचा संपर्क तुटलाय, याव्यतिरिक्त चौंढी बहिरोबा, बिबथर या गावांचा संपर्क तुटलाय, ईसापूर धरणातून पैनगंगेत केला जाणार विसर्ग वाढवण्यात आला असून धरणाच्या 13 गेट मधून 22 हजार 62 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पैनगंगा नदीवरील सिउरच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने माळेगाव शेंबाळपिंपरी पुसद मार्ग वाहतुकीसाठी बंद पडून विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटलाय, जिल्ह्यात होत असलेल्या पावसाच्या धर्तीवर शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी जिल्हातील शाळांना सुट्टी जाहीर केलीय. शासकीय रेखाकला परिक्षा सुरू असून आजचा रेखाकलेचा पेपर रद्द करण्यात आलाय. बाईट- प्रशांत दिग्रसकर- शिक्षणाधिकारी,हिंगोली
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 27, 2025 05:47:30
Mumbai, Maharashtra:संजय राऊत ऑन मुख्यमंत्री भाजप च्या अंगलट एखादी गोष्ट आली कीं ते विषय बदलतात कोरोना काळात इतर राज्यात आराजकता माजली होती प्रेत गंगेत व्हायली, हे फोटो फडणवीस तुम्ही पाहा ३-४ वर्षांपूवीचा काढू नका, ते मुख्यमंत्री असतील महाराष्ट्रतून हजारो कोटी रुपये हे पी एम केअर फंड कडे आहेत ज्याची मदत शेतकऱ्यांना पाहिजे १९४०-५० चा काय काढताय तुम्ही काय करताय? आधी राज्य करायला शिका... रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान मध्ये ट्रेनिंग नीट घ्या नाहीतर आम्ही माणसे पाठवतो तुम्ही शेण खाताय पंजाब कडे बघा तिथे मदत केली जातीये कोरोना मध्ये काय झालं हे सांगू नका... तुम्ही काय करताय ते सांगा पंतप्रधान यांनी पैसे द्यावे मराठवड्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी... विरोधी पक्ष नेते असताना जी कॅसेट फडणवीस यांनी लावली होती ती परत लावा मुंबईत मोदी येतात त्यांनी मराठवड्ड्यात जावं बघावं.. उद्धव ठाकरे १ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत... उद्या नरेंद्र मोदी येताय अमित शाह येताय मराठवड्यात कोण जाणार त्यांच्या प्रतिनिधी शी कोण बोलणार? त्यांच्या अनैसर्गिक युतीचा प्रश्न आहे मुंबईत त्यांना गिळायची आहे... एकनाथ शिंदे हे शिवसेना संपव्याची हत्यार आहे जसे अजित पवार हत्यार आहेत एकनाथ शिंदे यांना १०० जागा सुद्धा निवफणुकीला मिळणार नाही अमित शाह ची बेनामी कंपनी ही एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे आम्ही मूळ शिवसेना जागा द्यायचो... किती लढायच्या ऑन दसरा मेळावा पावसाचा प्रश्न आहे... काही पर्यायी जगाचा विचार झाला... पण सगळ्यांचा म्हणणं आहे कीं शिवतीर्थ वरची परंपरा मोडायची नाही मराठवाड्याचा शेतकरी चिखलात आहेत त्यामुळे २-३ तासाचा कार्यक्रम दसरा मेळाव्याचा असणार आहे त्यामुळे पाऊस किती पडला तरी दसरा मेळावा शिवतीर्थवारचं होणार ऑन देवेंद्र फडणवीस २०३० पर्यत जर ते महाराष्ट्र मध्ये थांबणार असतील तर २०२९ मध्ये केंद्रात राहुल गांधी यांचा सरकार येताय त्यांना महाराष्ट्र मध्ये विरोधी पक्षनेते म्हणून राहतील आत्ताच त्यांना केंद्रात बहुमत नाही आत्ताच सरकार राहुल गांधी यांचा आले असते.. पण मत चोरीचे प्रकरण समोर येत आहेत
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 27, 2025 05:45:51
Washim, Maharashtra:वाशिम: File:2709ZT_WSM_ADAN_DAM_GATE_OPEN रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात मागिल कालपासून पडतं असलेल्या मुसळधार पावसामुळे कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाच्या पाणलोट पातळीत मोठी वाढ झाली.त्यामुळे अडाण प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी 382.50 मीटर असून, प्रत्यक्ष पातळी 382.46 मीटरवर पोहोचली आहे.सध्या प्रकल्पात 99.39 टक्के जलसाठा झाला आहे. पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाची पाचही गेट प्रत्येकी 30 सेंटीमीटरने उघडण्यात आली आहेत.या गेटमधून प्रति सेकंद180.70 घन मीटर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 27, 2025 05:32:31
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- नुकसान पंचनामे समस्या फीड 2C Anc:- मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गावे बाधित झाली असून जवळपास तब्बल 3 लाख हेक्टर शेती पिकांचे नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. तलाठी, कृषी सहाय्यक अधिकारी आणि महसूल सेवक हे पंचनामे करत आहे मात्र पंचनामा करताना शासनाने ठरवलेले काही निकष बंधनकारक करण्यात आल्याने शेतकऱ्यांना अडचणीच ठरत आहे. यामध्ये ई-पीक पाहणी नोंदणी, फार्मर आयडी, 8 अ उतारा ही कागदपत्रे अनिवार्य करण्यात आली आहेत. पंचनामे करताना कागदपत्रे आणि नोंदी नसल्या तर पंचनामे करता येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये मदत मिळणार नाही अशी स्थिती आहे अशाच नुकसान झालेल्या आणि नोंदी नसलेल्या शेतकऱ्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी Chpl:- नुकसान ग्रस्त शेतकरी
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 27, 2025 05:31:26
Yavatmal, Maharashtra:(पीडित मुलींचा विडिओ ब्लर करावा) -------------------------------- यवतमाळ च्या आर्णी तालुक्यात पाळोदी येथील शासकीय आश्रमशाळेतला शिक्षक विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, धास्तावलेल्या मुलींनी त्यांच्यावर होणाऱ्या छळाबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे तक्रार केली, शिवाय आपबीती सांगणाऱ्या मुलींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यावरून पोलिसांनी पीडित मुलीचा शोध घेऊन चौकशी केली त्यानंतर दीपक पिसे या विकृत शिक्षकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या गृहजिल्ह्यात त्यांच्याच विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत विद्यार्थिनी सुरक्षित नसल्याची बाब पुढे आल्याने संताप व्यक्त होत आहे. दुर्गम, डोंगरी भागात राहणाऱ्या गरीब आदिवासीच्या मुला मुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत निवासी आश्रमशाळा सुरु करण्यात आल्या मात्र, याठिकाणी चाललेल्या बेधुंद कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांवर शाळा सोडण्याची वेळ आली आहे. या प्रकरणातील विकृत शिक्षकांने 25 ते 30 विद्यार्थिनींची अश्लील चाळे केल्याची तक्रार असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्या गेला, त्यामुळे प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक व दोशींवर निलंबनांची कारवाई करावी अशी मागणी आदिवासी समाजाचे नेते अंकित नैताम यांनी केली आहे. बाईट : अंकित नैताम
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 27, 2025 05:31:06
Sangli Miraj Kupwad, Maharashtra: Sng_rain स्लग - सांगली जिल्हात दहा तासापासून संततधार पाऊस कायम.. अँकर - सांगली शहरासह जिल्ह्याला काल रात्रीपासून परतीच्या पावसाने झोडपुन काढले आहे.अनेक भागामध्ये काल रात्रीपासून संततधार पाऊस पडत आहे.गेल्या दहा तासाहून अधिक काळापासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.त्याचबरोबर ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत,तासगाव तालुक्यातील मणेराजुरी या ठिकाणी ओढ्याला पूर आला असून पुलावरून पाणी वाहू लागल्याने पुलावरील वाहतूक बंद झाली आहे. संततधार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनकडुन खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 27, 2025 05:16:03
Washim, Maharashtra:वाशिम: File:2709ZT_WSM_ZP रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:राज्य निवडणूक आयोगाने वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.या निवडणुकीसाठी विधानसभा निवडणुकीतील मतदार यादीचाच आधार घेतला जाणार असून, त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे.निवडणूक कार्यक्रमानुसार, १ जुलै २०२५रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीच्या आधारे विभाग आणि निर्वाचक गणनिहाय यादी तयार केली जाईल.त्यानंतर,८ ऑक्टोबर २०२५रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाईल. नागरिकांना या यादीतील हरकती व सूचना८ ते १४ ऑक्टोबर २०२५दरम्यान सादर करण्याची संधी मिळणार आहे.अंतिम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर,२७ ऑक्टोबर २०२५रोजी अंतिम आणि अधिप्रमाणित मतदार यादी जाहीर केली जाईल.या दिवशीच मतदान केंद्रनिहाय मतदार यादीसुद्धा उपलब्ध होणार आहेत.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 27, 2025 05:03:06
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- लातूर जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी... जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात.... AC ::- लातूर जिल्ह्यात आज हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असून, अनेक ठिकाणी नदी-नाले वाहू लागले आहेत. एक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुफान पावसाने जिल्ह्याला झोडपायला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागासह शहरातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: पूरग्रस्त भागातील स्थितीवर जिल्हा प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 27, 2025 05:02:06
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 27, 2025 05:00:46
Yavatmal, Maharashtra:प्रतिकूल हवामान आणि पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस भिजून काळवंडला आहे. बहुतांश भागात हिरवी बोंड सडत असून, काही फुटलेल्या बोंडातला कापूस वेचून साठवण्याची धडपड करताना शेतकरी दिसत आहे. आर्णी तालुक्यातील पाभळ चे शेतकरी रामसिंग जाधव हे हतबल शेतकरी देखील जो मिळेल तो कापूस वाचवण्या साठी धडपडताना दिसत आहेत. सुरुवातीपासूनच पावसामुळे जमिनी चिबडल्याने कापूस उत्पादन घटण्याची स्थिती आहे. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून कपाशीच्या पिकाला पावसाचे ग्रहण लागले असून, पीक वाढीच्या अवस्थेतही सारखा पाऊस सुरू असल्याने वाढीवर परिणाम झाला. जो कापूस बोंडातून बाहेर आला, तो पावसामुळे भिजला आहे. बोंडअळीचाही प्रादुर्भाव वाढला आहे. पावसामुळे कपाशीची प्रत खराब होऊन नुकसान होत आहे. बाईट: रामसिंग जाधव : शेतकरी
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 27, 2025 04:30:58
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 27, 2025 04:19:31
Washim, Maharashtra:वाशिम: File:2709ZT_WSM_PAVANKHIND_DEKHAVA रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशीम शहरातील श्री नंदीकिशोर दुर्गोत्सव मंडळाने यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील पावन खिंडीची भव्य देखावा सकारून नागरिकांसमोर शौर्यगाथा उभी केली आहे.मंडपात प्रवेश करताच गुहेतून जाण्याचा आणि डोंगर-दऱ्यांमधून प्रवास करण्याचा अनुभव मिळत असून, ऐतिहासिक लढाईचे थरारक चित्रण पाहायला मिळत आहे.या देखाव्यामुळे मंडपात ऐतिहासिक वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांना अभिमान, थरार आणि प्रेरणा मिळत आहे.तरुण पिढीला इतिहासाचे स्मरण करून देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या शौर्यगाथेचा देखावा पाहण्यासाठी लहान मुलांपासून ते आबाल वृद्धापर्यंत गर्दी करीत आहेत.
1
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top