Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531
लातूर में रेड अलर्ट: मध्यरात्रि से मुसलाधार बारिश शुरू
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 27, 2025 05:03:06
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- लातूर जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी... जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात.... AC ::- लातूर जिल्ह्यात आज हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असून, अनेक ठिकाणी नदी-नाले वाहू लागले आहेत. एक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुफान पावसाने जिल्ह्याला झोडपायला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागासह शहरातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: पूरग्रस्त भागातील स्थितीवर जिल्हा प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Sept 27, 2025 06:45:41
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2709ZT_CHP_FIR_REGD ( single file sent on 2C)  टायटल:-- 23 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यात रस्ता रोको केल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह साडेतीनशे शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या खांबाडा येथे चंद्रपूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कर्जमाफी ,ओला दुष्काळ आणि शेत पिकांना हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन केले होते. तब्बल चार तास रास्ता रोको झाल्यानंतर अखेर महसूल प्रशासनाला दखल देत थेट आंदोलन स्थळी पोचून शेतकऱ्यांशी चर्चा करावी लागली होती. काही शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची कुजबूज असल्याने पोलिसांनी सावध भूमिका घेतली. आता मात्र बच्चू कडू , स्थानिक नेते किशोर डुकरे यांच्यासह साडेतीनशे पेक्षा अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे खळबळ उडाली असून आंदोलकांनी कारवाईचा निषेध केला आहे.  आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 27, 2025 06:34:36
Jalna, Maharashtra: FEED NAME : 2709ZT_JALNA_BORHADE(2 FILES) जालना : पंकजा मुंडे यांचं शिष्टमंडळ आज घेणार धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांची भेट मागण्यांबाबत करणार चर्चा गिरीष महाजन,अर्जुन खोतकर देखील शिष्टमंडळात असणार मि माझ्या मागण्यांवर ठाम,शिष्टमंडळ येणार हा आमच्या मोर्चाचा परिणाम-बोऱ्हाडे अँकर :पंकजा मुंडे यांचं शिष्टमंडळ आज घेणार धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांची जालन्यात जाऊन भेट घेणार आहे.या शिष्टमंडळात मंत्री गिरीष महाजन ,आमदार अर्जुन खोतकर यांचा देखील समावेश असणार आहे.बोऱ्हाडे यांच्या मागण्यांबाबत हे शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करणार आहे.आज दुपारी 4 वाजता हे शिष्टमंडळ बोऱ्हाडे यांची भेट घेऊन धनगर समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा करेल.धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे ही बोऱ्हाडे यांची प्रमुख मागणी आहे.दरम्यान मि माझ्या मागण्यांवर ठाम असून शिष्टमंडळ येणार हा आमच्या मोर्चाचा परिणाम असल्याचं बोऱ्हाडे यांनी म्हटलं आहे. बाईट दीपक बोऱ्हाडे, धनगर आंदोलक
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 27, 2025 06:34:11
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2709ZT_CHP_ATTEMPT ( single file sent on 2C)  टायटल:--  फेरफार करण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्याचा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न अँकर:-- फेरफार करण्यास टाळाटाळ करत असल्याने एका शेतकऱ्याने तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसील कार्यालयातील काल संध्याकाळची ही धक्कादायक घटना असून परमेश्वर मेश्राम असं 55 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकऱ्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भद्रावती तालुक्यातील कुरोडा येथे परमेश्वर मेश्राम यांची वडिलोपार्जित 8.5 एकर जमीन असून या जमिनी बाबत कोर्टात केस सुरू होती. मात्र या केसचा निकाल मेश्राम यांच्या बाजूने लागून देखील गेल्या 2 वर्षांपासून तहसील कार्यालयातून त्यांच्या नावे फेरफार करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे त्रस्त झालेल्या परमेश्वर मेश्राम यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. बाईट १)  वंदना मेश्राम, पीडित शेतकऱ्याची पत्नी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 27, 2025 06:21:09
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:Sng_paus_update स्लग - परतीच्या संततधार पावसाने सांगलीची उडाली दैना,अनके घरात शिरले पाऊसाचे पाणी,तर शाळांना सुट्टी.. अँकर - सांगली शहरामध्ये परतीच्या पावसाचा कहर पाहायला मिळत आहे.काल रात्रीपासून संततधार पाऊस पडत आहे.या पावसामुळे शहरातल्या सखल भागाची दैना उडाली असून अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचून राहिलेला आहे,तर अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरलेले आहे.शहरातल्या शिवाजी मंडई पाणी खाली गेली आहे,याठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहिलेलं आहे.आज दिवसभर संततधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घ्यावी,असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलाय तर संततधार पडणाऱ्या पावसामुळे महापालिका क्षेत्रातल्या सर्व शाळांना पालिका प्रशासनाकडून सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 27, 2025 06:21:00
Parbhani, Maharashtra:अँकर- पूर्ण वाचणे.... wkt शेती नुकसानिवर आहे, अँकरमध्ये जिल्ह्यातील अपडेटस आहेत... अँकर- हवामान विभागाने दिलेल्या अलर्ट लरमाणे परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय,यामुळे जिल्ह्यातील गोदावरी, दुधना,पूर्णा,गळाटी, नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, गोदावरीत सोडलेल्या पाण्याचा पूर नुकताच ओसरत असतांना आज पुन्हा जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटलाय, गंगाखेड सोनपेठ तालुक्यातील अनेक ओढ्या नाल्यांना पूर येऊन काही गावांचा संपर्क तुटलाय. गंगाखेड तालुक्यातील जवळा रूमना मंदिरावर वीज कोसळल्याने मंदिरावरील सहा मूर्ती खाली कोसळल्या आहेत.पालम तालुक्यातील धानोडा,सुनेगाव पुलावरून पाणी वाहत आहे,गळाटी लेंढि नदीला पूर आला असल्याने येथील मार्ग बंद पडलाय,लोहा ते पालम मार्ग बंद पडलाय,बनवस गावात पाणी शिरलय,गंगाखेड तालुक्यातील इसाद परिसरातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे. मैराळ सावंगी - गौंडगाव येथे पूरपरिस्थिती निर्माण झालीय, पुरामुळे राणी सावरगाव रस्ता बंद पडलाय,येथे अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे या भागातील मार्ग बंद पडले आहेत. यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे,काही तासात शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे,शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी... wkt गजानन देशमुख
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 27, 2025 06:16:56
Mumbai, Maharashtra:अँकर -- विजयीदशमी म्हणजेच दसरा दोन ऑक्टोबर गुरुवारी आहे दसऱ्या निमित्त  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा होणार आहे यानिमित्त शिवसेनेच्या वतीने दुसरा टिझर लॉन्च करण्यात आला आहे. यात परंपरा महाराष्ट्राची मैदान शिवतीर्थाच आवाज शिवसेनेचा नेतृत्व ठाकरेंचं  हुंकार शिवसैनिकांचा या आशयाखाली दसरा मेळाव्याचा दुसरा टिजर प्रकाशित करण्यात आला आहे.यावर्षी ह्या दसरा मेळाव्यात पावसाच सावट आहे.शिवतीर्थ येथे वाढलेलं गावात कापण्याच काम पालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. शिवसेनेकडून भव्य शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे.याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी  Wkt मनोज कुळकर्णी  Feed send TVU ८१ Slug -- Shivaji park wkt 
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 27, 2025 06:16:38
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 27, 2025 06:16:05
Navi Mumbai, Maharashtra:story slug - अनैतिक संबंधाच्या संशयावरुन सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून खून navi mumbai crime story brother murder ftp slug - panvel murder crime story, shots- reporter- swati naik navi mumbai anchor: अनैतिक संबंधाच्या संशयावरून सख्ख्या भावानेच भावाचा निर्दयीपणे दगडाने ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र घटनास्थळी पोहोचलेल्या बिट मार्शल पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून या घटनेतील आरोपीला अवघ्या एका तासात जेरबंद केले आहे. पोलिसांच्या तातडीच्या व कार्यक्षम कारवाईचे कौतुक होत आहे.   या घटनेतील आरोपीचे नाव नागेश वाल्या कोळी (32) असे असून त्याने हत्या केलेल्या त्याच्या सख्या भावाचे नाव दत्तु वाल्या काळे (47) असे आहे. हे दोघेही करंजाडे येथे राहण्यास होते. गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास करंजाडे सेक्टर-7 मधील रस्त्यावर एका 45 वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची माहिती डायल 112 वरुन पोलिसांना माहिती मिळाली. कॉल मिळताच पनवेल शहर पोलिस ठाण्यातील बिट मार्शल पोलिस हवालदार विलास कारंडे आणि राजेंद्र केणी हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना घटनास्थळी दत्तु वाल्या काळे या व्यक्तीची दगडाने ठेचुन हत्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले.   यावेळी पोलिसांनी उपस्थित नागरिकांकडून माहिती घेतली असता, हत्या करणारा आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे त्याना समजले. त्यामुळे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत आरोपी नागेश वाल्या काळे याचे घर गाठून त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. बाईट- प्रशांत मोहिते- झोन तीन
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 27, 2025 06:04:30
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 27, 2025 06:03:37
Beed, Maharashtra:बीड : माजलगाव धरणाचे 11 तर मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले धरणातून नदीपात्रा पाण्याचा विसर्ग, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Anc : धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पाण्याची आवक पाहता माजलगाव आणि मांजरा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गेल्या दोन दिवसापासून हा विसर्ग बंद करण्यात आला होता.मात्र आता पुन्हा एकदा आता माजलगाव धरणातून सिंदफणा नदी पात्रात धरणाचे 11 दरवाजे उघडत 42000 क्यूसेक ने विसर्ग केला जात आहे. तर केज मधील धनेगाव येथील मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडत नदीपात्रात 27166 क्युसेक ने विसर्ग केला जात आहे. यामुळे सिंदफणा आणि मांजरा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top