Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

आश्रम स्कूल के शिक्षक पर अश्लील हरकतों का आरोप, पुलिस जांच शुरू

SRSHRIKANT RAUT
Sept 27, 2025 05:31:26
Yavatmal, Maharashtra
(पीडित मुलींचा विडिओ ब्लर करावा) -------------------------------- यवतमाळ च्या आर्णी तालुक्यात पाळोदी येथील शासकीय आश्रमशाळेतला शिक्षक विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, धास्तावलेल्या मुलींनी त्यांच्यावर होणाऱ्या छळाबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे तक्रार केली, शिवाय आपबीती सांगणाऱ्या मुलींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यावरून पोलिसांनी पीडित मुलीचा शोध घेऊन चौकशी केली त्यानंतर दीपक पिसे या विकृत शिक्षकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या गृहजिल्ह्यात त्यांच्याच विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत विद्यार्थिनी सुरक्षित नसल्याची बाब पुढे आल्याने संताप व्यक्त होत आहे. दुर्गम, डोंगरी भागात राहणाऱ्या गरीब आदिवासीच्या मुला मुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत निवासी आश्रमशाळा सुरु करण्यात आल्या मात्र, याठिकाणी चाललेल्या बेधुंद कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांवर शाळा सोडण्याची वेळ आली आहे. या प्रकरणातील विकृत शिक्षकांने 25 ते 30 विद्यार्थिनींची अश्लील चाळे केल्याची तक्रार असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्या गेला, त्यामुळे प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक व दोशींवर निलंबनांची कारवाई करावी अशी मागणी आदिवासी समाजाचे नेते अंकित नैताम यांनी केली आहे. बाईट : अंकित नैताम
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Sept 27, 2025 07:32:19
Baramati, Maharashtra:JAVEDMULANI SLUG 2709ZT_INDPURBHRNE BYTE 1 इंदापूर कृषिमंत्र्यांचा माढा दौरा रद्द नाही..... कृषिमंत्री दत्तात्रय भरणे माढा तालुक्यातील उंदरगाव ला जाणार.... सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील ही नुकसानीची करणार पाहणी.....इंदापूर शहरातील नुकसानीची पाहणी करण्यामुळे उशीर झाला : कृषी मंत्री भरणे यांचा खुलासा...... सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उंदरगाव मध्ये नुकसानीची पाहणी करणार : मंत्री भरणे Anchor_ कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा आजचा माढा तालुक्यातील दौरा रद्द झाला अशी चर्चा होती मात्र आता त्यावरती स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पडदा टाकला आहे. पावसाच्या पाण्यामुळे इंदापूर शहरातील काही व्यापाऱ्यांच्या दुकानांच नुकसान झाल आहे त्याची पाहणी करण्यासाठी मी इंदापूर मध्ये थांबलो होतो त्यामुळे मला उशीर झाला. इंदापूर हे माझ शहर आहे त्या ठिकाणची पाहणी करणं माझी जबाबदारी आहे. आता इंदापूरची पाहणी करून मी सोलापूर दौऱ्यावर निघालो आहे. आता मी माढा तालुक्यातील उंदरगाव या ठिकाणच्या नुकसानीचे पाहणी करणार आहे तर मोहोळ तालुक्यातील ही दोन ठिकाणी मी भेटी देणार असल्याचं भरणे यांनी स्पष्ट केल आहे...... बाईट _दत्तात्रय भरणे कृषिमंत्री
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 27, 2025 07:18:31
Jalna, Maharashtra: FEED NAME : 2709ZT_JALNA_BAILGADI(3 FILES) जालना :जालन्यात नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बैलगाडीतून प्रवास... जालना तालुक्यातल्या गोंदेगाव शिवारातील चित्र... अँकर : जालन्यात नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बैलगाडीतून प्रवास करावा लागला आहे. जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारातील हा प्रकार घडलाय. जालना तालुक्यासह जिल्हाभरात मागील आठवड्यापासून मुसळधार पाऊस बरसत आहे. यामुळे अनेक भागातील शेतीपिकं पाण्याखाली गेली असून पीक नुकसानीचे पंचनामे आता सुरू करण्यात आले आहेत. मात्र, नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी गेलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. जालन्याच्या गोंदेगाव येथे शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी सेवक, तलाठी आणि ग्रामसेवक आले असता त्यांना चिखलमय रस्ता असल्याने शेतकऱ्याच्या बैलगाडीत बसून पंचनामा करण्यासाठी जावं लागलं. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून तो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 27, 2025 07:18:17
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2709ZT_CHP_MAHOTSV_START ( single file sent on 2C)  टायटल:-- 5 दिवस चालणाऱ्या माता महाकाली महोत्सवाचा आजपासून प्रारंभ, आ. किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने आयोजित होणाऱ्या महोत्सवाचे चौथे वर्ष, देवी महाकालीची उत्सवमूर्ती वाजत-गाजत पोचली महोत्सवस्थळी, 30 सप्टेंबर रोजी चांदीच्या भव्य पालखीतुन होणार नगर भ्रमण, महाकाली महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक- धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन    अँकर:--5 दिवस चालणाऱ्या चंद्रपूरच्या माता महाकाली महोत्सवाचा आजपासून प्रारंभ झाला. चंद्रपूरचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने आयोजित होणाऱ्या महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. देवी महाकालीची उत्सवमूर्ती वाजत-गाजत महोत्सवस्थळी दाखल झाली आहे. 30 सप्टेंबर रोजी चांदीच्या भव्य पालखीतुन 5 किमी लांब चालणारे देवी मूर्तीचे नगर भ्रमण विशेष आकर्षण असेल. महाकाली महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक- धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पुरातन देवी महाकाली मंदिर परिसरात करण्यात आले असून यासाठी परिसर सर्व सुविधांनी सज्ज करण्यात आलाय. बाईट १) आ. किशोर जोरगेवार, महोत्सव संयोजक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 27, 2025 07:17:50
Vasai-Virar, Maharashtra: Date-27sep2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slug-VASAI GARBA Feed send by 2c Type-AV Slug- गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू वसई पश्चिम ओम नगर परिसरातील घटना अँकर - वसईत नवरात्री उत्सवात एक धक्कादायक घटना घडली आहे. गरबा खेळताना एका महिलेचा मृत्यू झाला आहे. वसई पश्चिमेच्या ओमनगर परिसरातील विघ्नेश्वर मंडळ येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. मृत महिलेचे नाव फाल्गुनी राजेश शहा, वय ४६ असे आहे. गरबा खेळल्यानंतर अचानक त्यांना अस्वस्थ वाटले आणि त्या कोसळल्या. तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतरही उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवरात्रीच्या उत्साहात ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माणिकपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 27, 2025 07:17:28
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... AC ::- लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा निसर्गाने तडाखा दिला आहे... लातूर तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. सोनवती गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तुफान पावसाने शेती पाण्याखाली गेली असून, सोयाबीनसारखे महत्वाचे पीक हातचे गेले आहे. जमिनी खर्डुन गेल्या आहेत तरीही तहसील यांनी या जमिनी खरडून गेल्या नाहीत असं सांगितल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. आपल्या कष्टाचे पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश व्यक्त केला आहे आता या शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. साऊंड बाईट ::- शेतकरी
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 27, 2025 07:03:04
Bhandara, Maharashtra: भंडारा जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह बरसला पाऊस......वीज पडून एकाचा मृत्यू ANCHOR :- भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला.अचानक कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली.काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचून वाहतुकीत अडथळे निर्माण झाले.मात्र,धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा पाऊस वरदान ठरला आहे.गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. या पावसामुळे शेतकऱ्यांचे धान पिकांच्या वाढीस चालना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.विजांच्या गडगडाटासह पाऊस बरसला असून भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सोदेपूर येथे शेतावर काम करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून मृतकाचे नाव रघुनाथ इसन उईके 56 असे आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 27, 2025 07:02:53
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 27, 2025 07:02:45
Nashik, Maharashtra:Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_dhind देवळालीत कोयता मिरवणाऱ्यांची धिंड अँकर शहरात गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी नाशिकच्या देवळालीत कोयता मिरवणाऱ्या संशयितांची मुख्य रस्त्यांवर धिंड काढण्यात आली....देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिलेक्शन कॉर्नर परिसरामध्ये दोन दिवसांपूर्वी कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी जाधव यास मारहाण करीत पैसे लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक देशमुख यांच्या आदेशान्वये गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले आहेत. या संशयितांनी ज्याठिकाणी गुन्हा केला. त्या परिसरातून त्यांची धिंड काढण्यात आली.. संशयितांनी कोयत्याने हल्ला करतानाचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकला होता.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 27, 2025 07:01:26
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 27, 2025 07:00:52
Kolhapur, Maharashtra:Kop Lalit Panchami Feed :- Live U ( सोहळा सुरू झाल्यानंतर Output देतो) ANC:- आई अंबाबाई आणि टेंबलाई देवीचा जयघोष करत आज कोल्हापुरातील टेबलाई टेकडीवर असणाऱ्या त्रंबोली देवीच्या मंदिरात ललिता पंचमीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्त आई अंबाबाई आणि टेंबलाई देवीच्या भेटीचा सोहळा भक्तांना अनुभवता येतो. या भेटीच्या सोहळ्यानिमित्त राक्षस रुपी कोहळा फोडण्याचा विधी देखील पार पडला. करवीर चे छत्रपती याच्या हस्ते कुमारिकेच्या हाती त्रिशूल दिले जाते. त्यानंतर कोहळा फोडण्याचा विधी संपन्न होतो. फोडलेल्या कोहळ्याचा एक तुकडा मिळवण्यासाठी कोल्हापूरकर कोहळ्यावर अक्षरशा तुटून पडलेले पाहायला मिळतात.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 27, 2025 07:00:44
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 27, 2025 06:48:38
Kolhapur, Maharashtra:Kop Hassan Mushrif PC Feed:- Live U "हसन मुश्रीफ बाईट मुद्दे* *पूरग्रस्त मदत* मराठवाडा सोलापूर मराठवाडा भागात जास्तीत जास्त मदत करण्याची गरज आहे राष्ट्रवादीच्या वतीने आम्ही दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन मदतीचा आवाहन केलं होत.. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आज पूरग्रस्तांसाठी संसार उपयोगी साहित्य आणि अन्य मदत घेऊन आम्ही 25 ट्रक मराठवाडा आणि सोलापूर कडे पाठवतोय गोकुळला देखील पूरग्रस्त भागात पशुखाद्य पाठवण्याबाबत सूचना करणार आहे.. अजित पवारांनी प्रत्येक जिल्ह्यातून अशी मदत करण्याबाबत आवाहन केल आहे.. सूचना दिल्या आहेत *ऑन उध्दव ठाकरे* उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते.. एक दोन दिवसात पंचनामे पूर्ण होत नसतात पंचनामे पूर्ण होऊन नक्की नुकसानीचा आकडा तरी कळायला पाहिजे, तर मदत करता येईल. हेच जर यांना कळणार नसेल तर हे विरोधासाठी विरोध करत राहणार. विरोधक या आपत्तीच्या काळातही राजकारण करत आहेत पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी ड्रोनद्वारे पंचनामे किंवा शेतकऱ्यांकडून फोटो मागून देखील पंचनामे होत आहेत पी एम केअर च्या नावाखाली देखील मुद्दामहून राजकारण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहे *ऑन महायुती स्वबळ* ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तेथे आम्ही महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रित लढवणार आहोत मात्र जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील मैत्रीपूर्ण लढतीवेळी एकमेकांवर टीका करायची नाही हे महायुती मध्ये ठरल आहे *ऑन छगन भुजबळ ओबीसी मेळावा* महापुराच्या संकटातून बाहेर काढण्याचे काम आपण करतोय आता कोणता मेळावा आणि काय? या परिस्थितीत ओबीसी मेळावा घ्यावा की नाही तो त्यांचा प्रश्न मात्र आपण आत्ता कोणत्या परिस्थितीतून जातोय याचं भान ठेवलं पाहिजे *ऑन शरद पवार मंत्री दौरा बंद करा* शरद पवार यांच्या मताशी मी सहमत आहे आता मंत्र्यांनी पूरग्रस्त भागात पाहणी दौरे करू नयेत.. मंत्री दौऱ्यावर गेल्यावर यंत्रणा वेठीस धरली जाते लोक त्यांना घेराव घालतात नुकसान किती झालं ते लक्षात आलंय, आता मदत कशी पोहोचेल याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे सर्वांनी खिशात हात घातला पाहिजे *ऑन महविकास आघाडी आरोप* राज्यात कोणतेही सरकार, कोणीही मुख्यमंत्री असले तरी अशी संकट येत असतात अशा संकटकाळात बोलत राहणं ही विरोधकांची फॅशन झाली आहे विरोधक म्हणून टीका करा तो तुमचा अधिकार पण सकाळी महापूर आला आणि संध्याकाळी मदत करा, कर्जमाफी करा म्हणणं योग्य आहे का?? आम्ही योग्य वेळी मदत करणारच आहोत
3
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 27, 2025 06:45:41
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2709ZT_CHP_FIR_REGD ( single file sent on 2C)  टायटल:-- 23 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यात रस्ता रोको केल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह साडेतीनशे शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या खांबाडा येथे चंद्रपूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कर्जमाफी ,ओला दुष्काळ आणि शेत पिकांना हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन केले होते. तब्बल चार तास रास्ता रोको झाल्यानंतर अखेर महसूल प्रशासनाला दखल देत थेट आंदोलन स्थळी पोचून शेतकऱ्यांशी चर्चा करावी लागली होती. काही शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची कुजबूज असल्याने पोलिसांनी सावध भूमिका घेतली. आता मात्र बच्चू कडू , स्थानिक नेते किशोर डुकरे यांच्यासह साडेतीनशे पेक्षा अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे खळबळ उडाली असून आंदोलकांनी कारवाईचा निषेध केला आहे.  आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top