Back
वाशीमच्या जलतारा उपक्रमाने भूजल पुनर्भरणात केला नवा विश्वविक्रम!
Washim, Maharashtra
वाशिम:
File2:0207ZT_WSM_JALTARA_AWARD
WSM_JALTARA_AWARD_BT
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशीम जिल्ह्यातील सातत्याने खालावत चाललेली भूजल पातळी ही चिंता वाढवणारी बाब ठरत असताना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या पुढाकारातून ‘जलतारा’ उपक्रमाची संकल्पना समोर आली. ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून ओळखला जाणारा हा उपक्रम अवघ्या ४० दिवसांत ४० हजार जलतारे अर्थात खड्डे तयार करून यशस्वीपणे पूर्ण झाला आहे.या उल्लेखनीय कामगिरीची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स-लंडन’ मध्ये नोंद करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, जलतारा उपक्रमामुळे अनेक भागांतील भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली असून पहिल्याच पावसात नैसर्गिक जलस्त्रोत जलमय झाले आहेत.आकांक्षित जिल्हा असलेल्या वाशीमसाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरत असल्याचे शेतकरी आशावादाने व्यक्त करीत आहेत.
व्हिओ:उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणी साठी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली 'वत्सगुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा २०२५' हे विशेष अभियान जिल्ह्यात राबविण्यात आले. यामध्ये ग्रामपातळीवर लोकसहभाग वाढवत पाणलोट क्षेत्र विकास, जलसंधारण आणि भूजल पुनर्भरण यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले.या स्पर्धेत मंगरुळपीर तालुक्यातील जनुना खुर्द गावाने आपल्या लक्ष्याच्या तब्बल १६८ टक्के काम पूर्ण करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.तर मंगरुळपीर तालुक्यातील नागी गावात तब्बल ३५० जलतारे खोदून तालुकास्तरावर अव्वल ठरले.
व्हिओ: जिल्हा प्रशासन,अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे 'जलतारा' अभियानाचे रूपांतर भूजल पुनर्भरणाच्या एका जनआंदोलनात झाले. शेतकऱ्यांनी देखील या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. परिणामी, वाशीम जिल्ह्याचा हा अनुकरणीय उपक्रम ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंदवला गेला. राज्याचे कृषी मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या यशाबद्दल जिल्हा प्रशासनाचे व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
एन्ड व्हिओ: दरम्यान, वाशीम जिल्ह्याला Aspirational मधून Inspiration जिल्हा बनवण्यासाठी जलतारा हा प्रकल्प दिशा दर्शक ठरेल अशा शब्दात भावना व्यक्त करीत वाशीमच्या जिल्हा धिकारी भुवनेश्वरी एस यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी शेतकरी बांधवांचे आभार व्यक्त केले आहेत.
बाईट:अरिफ शाहा,जिल्हा कृषी अधीक्षक वाशीम
बाईट:गजानन बाजड,शेतकरी
बाईट:बुवनेश्वरी एस.जिल्हाधिकारी वाशिम
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement