Back
डोंबिवलीतील ११० कोटींचा रस्ता तोडफोडीच्या संकटात!
Kalyan, Maharashtra
डोंबिवली एमआयडीसीतील नवीन सीमेंट काँक्रीट रस्त्याची तोडफोड
११० कोटींच्या निधीतून झालेल्या रस्त्यांची सेवा वाहिन्या, गटारे किंवा इतर कारणांनी जागोजागी तोडफोड
करदात्यांचा पैसा वाया ...पूर्वसूचना न देता काम सुरू करत असल्याने नागरिकांत संताप.
अधिकाऱ्यांची चौकशी करत दोषींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी
Anc mmडोंबिवली एमआयडीसी फेज १ मधील श्री जी लाईफस्टाईल कंपनीसमोरच्या नव्याने बांधलेल्या सीमेंट काँक्रीट रस्त्याची अचानक तोडफोड करण्यात आल्याने स्थानिक रहिवासी आणि उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.या रस्त्यासाठी शासनाने गेल्या तीस वर्षांत पहिल्यांदाच ११० कोटींच्या निधीतून डोंबिवली एमआयडीसीत दर्जेदार रस्त्यांची कामे करण्यात आली होतीया निधीत एमआयडीसी व केडीएमसी यांचा समावेश होता. मात्र, रस्ते पूर्ण होण्याच्या अवघ्या काही महिन्यांतच सेवा वाहिन्या, गटारे किंवा इतर कारणांनी रस्त्यांची तोडफोड सुरू झाल्याने नागरिक संताप वेक्त करत आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0107ZT_CHP_TADOBA_HIKE
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूरच्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटन आणखी महागले ,सफारी दरात १ हजार रुपयांची प्रचंड वाढ , व्यवस्थापनाने ताडोबाचा कोअर भाग बंद होण्याच्या दिवशीच जाहीर केली दरवाढ, असंतोष टाळण्यासाठी केली चतुराई
अँकर:-- वाघांचे हक्काचे घर म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्प. मात्र या प्रकल्पात आता पर्यटन आणखी महागले आहे. व्याघ्र सफारीच्या दरात सरसकट १ हजार रुपयांची प्रचंड वाढ करण्यात आली आहे.
आता एका फेरीसाठी
कोअर भागात सोम ते शनि प्रति जिप्सी 8800 रु.
शनिवार आणि रविवार 12,800 रु.
तर
बफर भागात
सोम ते शनि प्रति जिप्सी 6000 रु.
शनिवार आणि रविवार 7000 रु.
असे दर असतील.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने कोअर भाग बंद होण्याच्या म्हणजेच 30 जून या दिवशीच ही दरवाढ जाहीर केली. पर्यटक- वन्यजीव प्रेमी आणि वाघ बघण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कोअर भागातील पर्यटन आता थेट 1 ऑक्टोबर रोजी घडू शकणार आहे. अशा रीतीने असंतोष होऊ नये याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. मात्र एक जुलै म्हणजे आजपासूनच बफर भागातील सहा प्रवेशद्वारातून होणारे पर्यटन नव्या दरानुसारच होणार आहे. व्यवस्थापनाने जिप्सी चालक आणि गाईड यांच्या सततच्या मागणीनुसारच ही दरवाढ तीही बैठक घेऊनच केल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे वन्यजीव प्रेमी व व्याघ्रप्रेमींनी आता ताडोबात जाऊच नये पर्यटन करूच नये अशा पद्धतीची ही दरवाढ असल्याची टीका केली आहे. ही दरवाढ करू नका, सामान्य लोकांना कमी किमतीत व्याघ्र दर्शन घडू द्या अशी मागणी ही केली जात आहे.
बाईट १) डॉ. प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प
बाईट २,)३) स्थानिक वन्यजीवप्रेमी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_UTTARAKHAND
साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दहा ते बारा पर्यटक सहकुटुंब उत्तराखंड येथील चारधाम यात्रेसाठी गेले असून सध्या या ठिकाणी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणात या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक पर्यटक या भागात 28 जून पासून अडकले आहेत.अनेक नदीवरील पूलांचे नुकसान झाल्यामुळे या ठिकाणी मुख्य रस्त्याशी संपर्क तुटला आहे.. जेवण खाण्याचं साहित्य कमी असल्यामुळे स्थानिक प्रशासन लवकरच यावर मार्ग काढू असा आश्वासन देत आहे मात्र यामध्ये महाराष्ट्र सरकारने देखील लक्ष घालून आम्हाला यातून सुखरूप बाहेर काढावे अशी विनंती पर्यटक करत आहेत
byte
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn rada av
vdo attached
जास्त हॉर्न वाजवला म्हणून ज्येष्ठ नागरिकांसोबत मुलीला धक्का बुक्की केल्याचा आरोप
संताप्त जमावाने तरुणाला दिला चोप, निराला बाजार येथील घटना
अँकर: नागमोडी पद्धतीने वाहन चालवत असल्याने चार चाकी चालकाने समोरच्या वाहनाला हॉर्न दिला. यावेळी वाहन चालकाने जेष्ठ नागरिक व महिलेला धक्काबुक्की केली. संतप्त झालेल्या जमावाने ज्येष्ठ नागरिक व तरुणीला धक्काबुक्की केली म्हणून चांगलाच चोप दिला. ही घटना निराला बाजार येथे घडली. काही नागरिकांनी तरुणाला क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास क्रांती चौक पोलीस करीत आहेत.
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
PKG
Sng_tadkadtai_pkg
स्लग - आली रे आली तडकडताई.. काळा मुखवटा, हातात सूप घेऊन सांगली शहरात धावणारी तड्कडताईची अनोखे परंपरा .
अँकर - आली रे आली तड्कडताई..भुताची आई, अशी आरोळी सध्या सांगलीच्या रस्त्यांवर ऐकू येत आहे..ही तडकडताई पाहून मुलं धावत सुटतात.. काळी साडी,तोंडावर मुखवटा आणि हातात सूप घेऊन रस्त्यावर धावणाऱ्या तडकडताईच्या मागे पुढे हजारो मुलांचा गलका असतो,ज्यामध्ये या तडकडताईच्या सुपांचा प्रसाद मुलांना खावा लागतो..पाहूया काय आहे,या सांगलीच्या तडकडताईची परंपरा..
व्ही वो - सांगलीच्या रस्त्यांवर सध्या तडकडताई प्रकट झाली आहे,त्यामुळे बाल गोपाळांची पाळता भुई थोडी झाली.अंगावर काळी साडी,तोंडावर मुखवटा आणि हातात सूप,अशा रुपात प्रकट झालेली तडकडताई कोणा भुताचा अवतार नसून देवीचा अवतार म्हणून ओळखली जाते.दृष्टांचा संहार करणारी अश्या तडकडताईची ओळख आहे.
काय आहे तडकडताईची परंपरा..?
ग्राफीक्स इन
महिषासुर मर्दिनीचा अवतार म्हणून तडकताई ओळख आहे..
भावई यात्रेच्या निमित्ताने जोगण्या उत्सवाला सुरुवात होते.
जोगण्या उत्सव हा जेष्ठ अमावास्यनंतर सुरु होतो.
अमावस्येच्या दिवशी तडकडताईचा लग्न सोहळा पार पडतो.
त्यानंतर शहरातल्या गल्ली मधून तकडकड ताईचा संचार सुरू होतो.
अंगावर साडी,तोंडावर काळा मुखवटा, हातात सूप असा तडकडताईचा अवतार असतो.
देवीचा अवतार आणि दैत्यांचा संहार करणारी म्हणून तडकडताईची ओळख आहे.
ग्राफीक्स आऊट
व्ही वो - तडकडताई भुताची आई,अशी आरोळी सांगली शहरातल्या गल्ल्या- गल्ल्यांमध्ये ऐकू येते आहे,हजारो मुलांचा गलका तडकडताईच्या मागेपुढे काळे म्हणत धावताना पाहायला मिळतो,काळी साडी, मुखवटा आणि हातात सूप घेऊन धावणारी ही तडकडताई मुलांना सुपांचा मार देखील देते.
बाईट - संजय चव्हाण - नागरीक,सांगली.
व्ही वो - सांगली शहरातल्या गावभाग येथील
कुंभार कुटुंबाकडून तडकडताईची परंपरा वर्षानुवर्ष जोपासली जात आहे,जेष्ठ महिन्यात अमावस्येला भावई यात्रेत जोगण्या उत्सवाला सुरवात होते.अमावास्यच्या दिवशी तडकड ताईचा जोगत्या त्याबरोबर विवाह पार पडतो आणि त्यानंतरही तडखळता येईल शहरातल्या कल्याणमध्ये संचार करू लागते.
बाईट - पार्वती कुंभार - परंपरा जोपसणारे कुटुंब - सांगली.
व्ही वो - खोड्या करणाऱ्या बालकांना आपल्या सुपने प्रसाद देते,या सुपाचा मार बसला कि मुलांवरील इडा पिडा टळते, अशी अख्याइका आहे.अमावस्येचा हा कार्यक्रम पार पडल्यानंतर आषाढातल्या पौर्णिमेपर्यंत शहरातील ठराविक भागात जाऊन ती जोगवा मागते.तडकडताईचा दरारा हा खूप मोठा आहे.अनेक लहान मुलेच नाहीत तर मोठी मुलेही या तड्कडताई ला प्रचंड घाबरतात.
बाईट - राहुल बोळाज - नागरिक - सांगली.
व्ही वो - तडकडताईची अश्या या परंपरेला कोणी श्रद्धा म्हणो किंवा अंधश्रद्धा,मात्र संस्थान काळापासून सुरु असलेली हि परंपरा आज २१ व्या शतकातही सांगलीकर मोठ्या उत्साहात जोपासता आहेत.
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Deadbody
Feed on - 2C
-------------------------
Anchor - नांदेड शहरातील मुख्य रस्त्यावरील नालित एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे दोन दिवसापासून हा मृतदेह नालीत पडून असल्याचा अंदाज आहे. पण दोन दिवसापासून या मृतदेहाकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. नवीन मोंढा रस्त्यावरील नालित हा मृतदेह दुपारी आढळून आला. अंदाजे 30 ते 35 वर्षीय व्यक्तीचा हा मृतदेह आहे. या मृतदेहाच्या हातात प्लास्टिकचे हातमोजे आहेत. त्यामुळे बायो मेडिकल कचरा उचलणारा सफाई कर्मचारी असल्याचा अंदाज आहे. पण अजून मृतादेहाची ओळख पटली नसून पोलीस तपास करताहेत.
------------
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथे शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवित, जमिनीच्या अधिग्रहणासाठी मोजणीकरिता आलेल्या महसूल आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना विरोध दर्शवित माघारी पाठवले, शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन देणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे आज मराठवाड्याच्या विविध आंदोलने ही करण्यात आले आहे...
0
Share
Report
Akola, Maharashtra:
5 फाईल्स आहेत..AVBB
Anchor : हिंदी सक्ती करावी हा मसनेकर समितेचा अहवाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी स्वीकारला होता तर त्यांच्या स्वाक्षरीने हिंदी पहिला वर्गापासून बारावीपर्यंत सक्तीची करावी याला मान्यता उद्धव ठाकरे यांनी दिली होती तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकरिता मराठी माणसाची सहानुभूती मिळवण्यासाठी राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या आंदोलनात उद्धव ठाकरे यांनी उडी घेतली असल्याची खोचक टीका केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहेय..आपल्या अकोला दौरा दरम्यान ते माध्यमांशी बोलत होते..तर दोन्ही ठाकरे बंधू आगामी निवडणुकीत सोबत येतील नाही येतील हा त्यांचा प्रश्न असून महायुती ही निवडणूक जिंकणार असल्याचं ते म्हणाले..ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग करिता शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्गाकरिता शेतकरी स्वतः जमीन देतील आणि राज्य सरकारही या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला..
Byte : प्रतापराव जाधव, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री..
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
01072025
Slug - PPR_65_HECTOR
feed on 2c
file 03
------
Anchor - आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांच्या मुक्कामासाठी जिल्हा प्रशासन आणि नगरपालिकेने चंद्रभागेच्या पूर्व किनाऱ्यावर विकसित केला भक्ती सागर परिसर, तीन ते साडेतीन लाख वारकऱ्यांच्या मुक्काम सोयी साठी झटत आहेत सर्व कर्मचारी.
आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी यंदा 18 ते 22 लक्ष वारकरी दाखल होतील. असा प्रशासनाचा अंदाज आहे या सर्वांचीच राहण्याची सोय दिंड्या मठ अशा ठिकाणी होत नाही. त्यांच्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन आणि नगरपालिकेने नदीच्या पूर्व किनाऱ्यावर भक्ती सागर परिसर विकसित केला आहे. या ठिकाणी जवळपास तीन ते साडेतीन लाख वारकरी राहू शकतात. अशी सुसज्ज व्यवस्था नगरपालिका प्रशासन करत आहे.
याठिकाणी स्वच्छ बाटली बंद पिण्याचे पाणी, वापरण्यासाठी पाणी, कायमस्वरूपी आणि तात्पुरती शौचालये , महिलांसाठी स्वतंत्र स्नान गृहे केली आहेत. तसेच ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र केले आहे. त्यातही भाविकांना सुविधा मिळणार आहेत.
------
Byte - महेश रोकडे, मुख्याधिकारी नगरपरिषद पंढरपूर
0
Share
Report
Nagpur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडले आहे
------
नागपुर
* नागपुर रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला एका युवतीचा जीव
* फ्लॅटफॉर्म नंबर ४ वरून नागपूर ते पुणे जाण्यासाठी निघालेल्या चालत्या ट्रेनमध्ये तरुणीने चढण्याचा प्रयत्न केला दरम्यान तिचा संतुलन बिघडून ती खाली पडली..
* तिथे उपस्थित आरपीएफ पोलिसांचे जवान धीरज दलाल यांनी सतर्कता दाखवत युवतीला ओढून घेतले त्यामुळे तिचे प्राण वाचले..
* रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार २८ जून सायंकाळी सहा वाजेची ही घटना आहे..
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Road
Feed on - 2C
-------------------------
Anchor - आठ दिवसापूर्वी झालेला डांबर रस्ता ग्रामस्थानी चक्क हाताने उखडून दाखवत कामाच्या दर्जाचे पितळ उघडे पाडले. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील हा प्रकार आहे. अनेक वर्षानंतर बाभुळगाव ते टाकळगाव दारम्यानचा रस्ता डांबर रस्ता झाला. आठ दिवसांपूर्वीच ह्या रस्त्याचे डांबरीकरण झाले. पण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. ग्रामस्थानी डांबर रस्ता चक्क हातानी उखडून दाखवला. हाताने रस्ता उखडून दाखवत गावाक-र्यांनी रोष व्यक्त केलाय. आताच जर रस्ता हाताने उखडून निघत असेल पावसात हा रस्ता टिकेल का असा प्रश्न निर्माण झालाय. ग्रामीण भागातील रस्ते का खराब होतात याचा प्रत्यत या व्हिडीओतून दिसून येतोय.
----------------
0
Share
Report