Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

शिर्डीत भाविकांची लूट थांबवण्यासाठी दरपत्रकाची अनोखी योजना!

Kunal Jamdade
Jul 01, 2025 05:06:02
Shirdi, Maharashtra
Anc - राज्यातील धार्मिक स्थळी भाविक मोठ्या आस्थेन दर्शनासाठी येत असतात... मात्र अनेकदा प्रसाद हार फुल खरेदी करताना त्यांची आर्थिक लूट होण्याचे प्रकार देखील समोर आलेले आहेत.. मात्र आता साईंच्या शिर्डीत आता एक नवीन प्रयोग पार पडतोय... शिर्डीतील व्यावसायिकांसाठी हार, प्रसाद, फुल आणि शाल यासह अनेक वस्तूंसाठी एक दरपत्रक तयार करण्यात आले.. 15 जुलै पर्यंत व्यावसायिकांनी दरपत्रक दुकानासमोर लावण्याची नोटीसच शिर्डी नगरपालिकेने काढली असून राज्यातील हा पहिलाच प्रयोग देवस्थानच्या ठिकाणी पथदर्शी ठरेल अशी चर्चा सुरू आहे... V/O - गेल्या काही महिन्यांपासून शिर्डीत गुन्हेगारीनं डोकं वर काढलं.. याच समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांसह साईबाबा संस्थानने देखील नियमावली तयार केली... आणि आता शिर्डी नगरपालिकेच्या वतीने देखील एक अनोखा प्रयोग शिर्डी शहरात सुरू करण्यात आलाय.हार फुल प्रसाद किंवा शाल या वस्तूंना शिर्डीत मोठी मागणी आहे... मात्र यात अनेकदा भाविकांची लूट होत असल्याचे प्रकार समोर आले.त्यामुळेच शिर्डी नगरपालिकेने व्यावसायिकांची बैठक घेऊन एक नियमावली तयार केली असून एक अंतिम दरपत्रक निश्चित केले... 15 जुलैपर्यंत हे दरपत्रक आपल्या दुकानासमोर लावण्याचे आदेश नगरपालिकेने दिल्या असून हा कदाचित धार्मिक स्थळी राबवला जाणारा पहिलाच प्रयोग असेल... Byte - सतीश दिघे , मुख्याधिकारी शिर्डी नगरपालिका V/O - शिर्डीतील व्यावसायिकांनी सुद्धा या प्रयोगाचे स्वागत केलय... भक्तांची होणारी लूट थांबवण्यासाठी असा उपक्रम गरजेचा आहे असं मत व्यावसायिकांनी व्यक्त करताना काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या पाहिजेत अशी मागणी देखील केली आहे.शिर्डी बाजारपेठेत आढावा घेत व्यावसायिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी.. चौपाल कुणाल जमदाडे व्यावसायिक V/O - एखाद्या धार्मिक स्थळी दरपत्रक नियमावली करणारं शिर्डी हे शहर कदाचित राज्यातील पहिल असावं... जर हा प्रयोग यशस्वी झाला तर राज्यासाठी निश्चित पथदर्शी ठरेल व गुन्हेगारी कमी होऊन भाविकांसाठी आनंददायी प्रयोग ठरणार यात शंका नाही..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement