Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेला विलंब, १५ दिवसांची मुदतवाढ मिळणार?

VISHAL KAROLE
Jun 27, 2025 03:35:58
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn university av Feed attached पदवी परीक्षेचा निकाल रखडल्यामुळे विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याच्या तयारीत ॐ आहे. ५ जूनपासून ते २६ जूनपर्यंत १ हजार १३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात सर्वाधिक एमएसडब्ल्यूच्या प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा आहेत. त्याचबरोबर केमिस्ट्रीलाही विद्याथ्यर्थ्यांची मोठी पसंती मिळाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने विभागांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. विभागांची २ हजार १२३ प्रवेश क्षमता आहे. या विभागांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ५ ते ३० जून दरम्यान प्रवेशाची ऑनलाइन नोंदणीसाठी मुदत होती. यात २६ जूनपर्यंत १ हजार १४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पदवी परीक्षेचा निकाल लांबल्यामुळे परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात सोमवारी बैठक होणार आहे. या बैठकीत १५ दिवसांची मुदतवाढ दिली जाईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement