Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

ट्रॅक्टर विहिरीत पडला, चालकाचा दुर्दैवी मृत्यू: पाच तासांनी बाहेर काढला

ANIRUDHA DAWALE
Jun 29, 2025 06:06:31
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_TARCTOR सहा फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 पेरणी करतांना ट्रॅक्टर विहिरीत पडून चालकाचा दुर्दैवी मृत्यू; पाच तासाने क्रेनच्या साह्याने ट्रॅक्टर आणि मृत्यूदेह काढला बाहेर अँकर :– तालुक्यातील वऱ्हा मंडळात येणाऱ्या जावरा शेत शिवारात शेतात ट्रॅक्टरने सोयाबीनची पेरणी करत असताना ट्रॅक्टर चालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. संजय देविदास भाकरे वय 45 रा वऱ्हा असे मृतकाचे नाव आहे. माळेगाव येथील शेतकरी वाघाडे यांच्या जावरा शेत शिवारात असलेल्या चार एकराच्या शेतात मृतक संजय भाकरे हे स्वताच्या ट्रॅक्टरने पेरणी करत होते. पेरणी दरम्यान ट्रॅक्टर मागे - पुढे घेत असताना अचानक ट्रॅक्टरसह भाकरे हे विहिरीत पडले व यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत भाकरे हे घरातील कर्ते असून त्याच्या पच्छात पत्नी, एक मुलगा, मुलगी आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे. या घटनेची माहिती कुऱ्हा पोलीसांना देण्यात आली. विहिरीतून मृत्यूदेह व ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी तिवसा अग्निशमन बंबला पाचारण करण्यात आले असता शर्तीच्या प्रयत्ननंतर तब्बल पाच तासांनी ट्रॅक्टर आणि मुलताकाला बाहेर काढण्यात आले आहे. यावेळी नागरिकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अर्धवट बांधकाम असलेली ही विहिर 35 फूट खोल होती ज्यामध्ये वीस फूटपर्यंत पाणी असल्यामुळे मृत्यूदेह शोधण्यासाठी आधी पाण्याचा उपसा करण्यात आला. पाच तासाने क्रेनच्या साह्याने आधी ट्रॅक्टर व नंतर मृत्यूदेह बाहेर काढण्यात आला.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement