Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412106

लोणावळ्यात पर्यटकांची स्टंटबाजी, पोलिसांची त्वरित कारवाई!

CHAITRALI RAJAPURKAR
Jul 01, 2025 03:02:43
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 0107ZT_MAVAL_LON_STUNT Total files : 03 Headline - लोणावळ्यात स्टंटबाजी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची कारवाई Anchor: लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या काही पर्यटकांकडून स्टंटबाजीचे प्रकार वाढले असून यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. अशाच प्रकारचा धोकादायक स्टंट करताना तिघांवर लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. हे तीन युवक कारच्या मागील दरवाजाच्या खिडकीतून बाहेर बसून स्टंट करत होते. हा प्रकार शहरातील मुख्य रस्त्यावर घडला. नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर वाहतूक पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून संबंधितांवर कारवाई केली. पोलिसांनी यापुढे असे प्रकार पुन्हा आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे. लोणावळा शहर पोलिसांकडून पर्यटकांना सुरक्षिततेचं भान ठेवण्याचं आणि स्टंटबाजी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement