Back
सांगलीमध्ये तडकडताईचा भुताचा उत्सव, लहान मुलांमध्ये दहशत!
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
Sng_tadkadtai
स्लग - सांगली शहरात अवतरली भुताची आई,तड्कडताई....
अँकर - सांगलीमध्ये आता तडकडताईचा उत्सव सुरू झाला आहे.अंगावर काळी साडी, तोंडावर काळा मुखवटा,हातात सूप घेऊन धावणारया तड्कडताईचा शहरातील गल्लोगल्लीत संचार पाहायला मिळत आहे. लहान मुलांमध्ये तडकडताईची प्रचंड दहशत असते तर तडकड ताई,भुताची आई,असा करत लहान मुले तडकडताईचे स्वागत करतात,यावेळी तडकडताईकडून मुलांना सुपाचा मार देखील देण्यात येतो,जेष्ठ महिन्यात आषाढीच्या अमावास्येला दैत्याचा संहार करण्यासाठी म्हैशासुर मार्दीनी तड्कड ताईचा वेश घेऊन शहराची रखवाली करण्यासाठी फिरत असते,अशी आख्यायिका असून शेकडो वर्षांपासून सांगली शहरातले कुंभार कुटुंब हे परंपरा जोपासत आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ जिल्हा परिषद व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या सभागृहात कृषी दिन साजरा करण्यात आला.
शेतकऱ्यांनी शेती करत असतांना कमी खर्चाची व अधिक उत्पन्न देणारी शेती करावी. बाजारामध्ये ज्या पिकाची अधिक मागणी आहे त्याची लागवड करावी तसेच शेतीला जोडधंदा आणि नैसर्गिक शेतीची जोड द्यावी, असे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमांमध्ये सन 2023-24 व 2024-25 या दोन्ही वर्षांमध्ये सोयाबीन तूर, हरभरा, गहू या पिकामध्ये उच्च उत्पादन घेतलेल्या 32 शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
बदलापूर रेल्वे स्थानका जोडणाऱ्या स्कायवॉकच्या पायऱ्या धोकादायक
पावसाळयात पाय घसरून पडण्याची भीती,
bdl sky walk
Anchor बदलापूर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकच्या पायऱ्यांची अतिशय दुरावस्था झाली असून त्या अतिशय धोकादायक बनल्या आहेत ,त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. या स्कायवॉकच्या अनेक पायऱ्यांवरील लाद्या तुटलेल्या आहेत. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचत असल्याने प्रवाशांना पायऱ्यांचा अंदाज येत नसल्याने पाय घसरून अपघात होत आहेत .त्यामुळे नगरपालिकेने लवकरात लवकर या पायऱ्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे
चंद्रशेखर भुयार ( बदलापुर )
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- मुख्याध्यापकाची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलन
फीड 2C
अँकर:- अहिल्यानगर येथील मुख्याध्यापकाची झालेली बदली तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन सुरू केला आहे रयत शिक्षण संस्थेची नगर शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या शाळेत शिवाजी लंके हे मुख्याध्यापक आहेत त्यांची बदली संस्थेतील दुसऱ्या शाळेवर झाली आहे मात्र या बदलीला विद्यार्थी आणि पालकांनी विरोध करत रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केल आहे शिवाजी लंके यांची बदली झाल्यामुळे शाळा पूर्णतः बंद झाली असून एकही विद्यार्थी शाळेमध्ये गेला नाही आमचे लाडके सर परत द्या लंके सरांची बदली रद्द करा असे फलक घेऊन विद्यार्थी आणि पालक रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयात आंदोलन करत आहे जोपर्यंत बदली रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं विद्यार्थ्यांनी सांगितलं
बाईट:- रुद्र गुंजाळ, विद्यार्थी
बाईट:- स्नेहल सानप, पालक
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
Anchor - महागाड्या बुलेट चोरणाऱ्या बुलेट राजाला त्याच्या साथीदारासोबत धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. हशवर्धन जगदाळे वय 22 व किरण कोळी या दोघांनी नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्हा येथून चोरी केलेल्या 14 बुलेट पोलिसांनी जप्त केले आहेत. हर्शवर्धन हा स्वताला बुलेट राजा म्हणून गावात मिरवत होता. वेगवेगळ्या बुलेट त्यांच्याकडे असल्याने त्याच्यावर धुळे एलसीबी पथकाला संशय आला. हर्शवर्धन जगदाळे याला ताब्यात घेतले असता, त्याने त्याचा साथीदार किरण कोळी सोबत 14 बुलेट चोरी केल्याची कबुली दिली असून, लपवून ठेवलेल्या 14 बुलेट पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यां दोघांनी अजून कुठे अन्य गिन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत.
Byte :- श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- आज परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. पण परभणी तालुक्यातील पोखरणी फाटा येथिल चक्काजाम आंदोलन मात्र पावसा मध्येही सुरूच होते. भर पावसात शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लाऊन धरली होती. तब्बल दोन तास परभणी गंगाखेड महामार्ग आंदोलकांनी आडवला होता. यावेळी दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
0
Share
Report
Niphad, Maharashtra:
अँकर:-अवकाळी पावसाने कांदा उत्पादकांचे कंबरडे मोडले असून नाशिक जिल्ह्यातला 60 टक्के कांदा खराब झाला आहे महाराष्ट्रात कांदा मोठ्या प्रमाणावर घेतला जात असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून कोणताही दिलासा मिळाला नाही याउलट कमी उत्पादन होत असलेल्या गुजरातमध्ये तेथील शेतकऱ्यांना दोनशे रुपयांचे प्रतिक्विंटल अनुदान जाहीर केले आहे गुजरात ने केले महाराष्ट्र केव्हा करणार असा सवाल कांदा उत्पादक संघटनेने उपस्थित केला असून महाराष्ट्र सरकारने तात्काळ पाचशे रुपयांचे अनुदान जाहीर करावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
ब्रेक
*भांडुप मधील महिंद्रा स्प्लेंडर या इमारतीमधील १५ वर्षीय मुलीच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा*
मित्राने मुलीला 21व्या माळ्यावरून ढकलल्याचं पोलीस चौकशीमध्ये उघड
अल्पवयीन मुलाविरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल
दोघांमध्ये झालेल्या वादातून मुलाने मैत्रिणीला इमारतीवरून ढकलले
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME| 0107ZT_JALNA_ANDOLAN(2 FILES)
जालना | अतिवृष्टी अनुदान घोटाळयातील दोषी अधिकारी,कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुहिक बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु
अँकर | जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळयातील दोषी अधिकारी,कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सामूहिक बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे.या आंदोलनात जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील शेतकरी सहभागी झाले आहेत.जिल्ह्यातील 63 हजार शेतकऱ्यांना रखडलेलं 2024 चं अतिवृष्टी अनुदान वाटप करण्यात यावं. शेतकऱ्यांना व्हिके नंबर देण्यात यावा अशीही मागणी आंदोलकांनी केलीय.जोपर्यंत प्रशासन या मागण्यांची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय.
बाईट : गजानन उगले शेतकरी
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0107ZT_WSM_BAD_PANDAN_ROAD
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम तालुक्यातील देपुळ-आसेगाव शेत पांदण रस्ता पावसामुळे जल व चिखलमय झाला आहे.या मार्गावरून रोज शेकडो शेतकरी शेतकामासाठी ये-जा करत असून, महिलांसह वृद्ध व लहान मुलांनाही चिखमय रस्त्यावरून जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.पावसाचे प्रमाण वाढल्यास काही शेतकऱ्यांना शेतातच थांबावे लागते, तर काहींना पाण्यातून वाट काढावी लागते त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0107ZT_CHP_TADOBA_HIKE
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूरच्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटन आणखी महागले ,सफारी दरात १ हजार रुपयांची प्रचंड वाढ , व्यवस्थापनाने ताडोबाचा कोअर भाग बंद होण्याच्या दिवशीच जाहीर केली दरवाढ, असंतोष टाळण्यासाठी केली चतुराई
अँकर:-- वाघांचे हक्काचे घर म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्प. मात्र या प्रकल्पात आता पर्यटन आणखी महागले आहे. व्याघ्र सफारीच्या दरात सरसकट १ हजार रुपयांची प्रचंड वाढ करण्यात आली आहे.
आता एका फेरीसाठी
कोअर भागात सोम ते शनि प्रति जिप्सी 8800 रु.
शनिवार आणि रविवार 12,800 रु.
तर
बफर भागात
सोम ते शनि प्रति जिप्सी 6000 रु.
शनिवार आणि रविवार 7000 रु.
असे दर असतील.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने कोअर भाग बंद होण्याच्या म्हणजेच 30 जून या दिवशीच ही दरवाढ जाहीर केली. पर्यटक- वन्यजीव प्रेमी आणि वाघ बघण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कोअर भागातील पर्यटन आता थेट 1 ऑक्टोबर रोजी घडू शकणार आहे. अशा रीतीने असंतोष होऊ नये याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. मात्र एक जुलै म्हणजे आजपासूनच बफर भागातील सहा प्रवेशद्वारातून होणारे पर्यटन नव्या दरानुसारच होणार आहे. व्यवस्थापनाने जिप्सी चालक आणि गाईड यांच्या सततच्या मागणीनुसारच ही दरवाढ तीही बैठक घेऊनच केल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे वन्यजीव प्रेमी व व्याघ्रप्रेमींनी आता ताडोबात जाऊच नये पर्यटन करूच नये अशा पद्धतीची ही दरवाढ असल्याची टीका केली आहे. ही दरवाढ करू नका, सामान्य लोकांना कमी किमतीत व्याघ्र दर्शन घडू द्या अशी मागणी ही केली जात आहे.
बाईट १) डॉ. प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प
बाईट २,)३) स्थानिक वन्यजीवप्रेमी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report