Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422303

नांदूर मधमेश्वर धरणात ऐतिहासिक 13.16 टीएमसी पाण्याचा विसर्ग!

Sudarshan Khillare
Jul 01, 2025 07:33:26
Niphad, Maharashtra
अँकर :- नाशिकच्या निफाड तालुक्यात ब्रिटिश कालीन 1916 मध्ये बांधलेल्या नांदूर मधमेश्वर धरणाच्या इतिहासात प्रथमच जून महिन्यात 13.16 टीएमसी पूर पाण्याचा जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदीतून विसर्ग करण्यात आला आहे या अगोदर कधीही जून महिन्याच्या सुरुवातीपासून पाण्याचा विसर्ग झालेला नाही यावर्षी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, नाशिक आणि निफाड तालुक्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी व मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच तडाका दिला त्यात जून महिन्यात मान्सूनच्या पावसाने चांगली हजेरी लगावल्याने दारणा, गंगापूर, कडवा आणि पालखेड धरणाची पाणीपातळी 60 टक्क्यांच्या वर गेल्यामुळे या धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नांदूर मधमेश्वर च्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे त्यामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून जून महिन्यात आज सकाळपर्यंत 13.16 टीएमसी पूर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे असाच नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यात पाऊस होत राहिला तर जायकवाडी धरण भरण्यासाठी मदत होत लवकरच 100 टक्के भरेल गेल्या दोन दिवसात नाशिक जिल्ह्यात पावसाने उघडीप जरी दिली असेल तरी नांदूर मधमेश्वर धरणातून पूर पाण्याचा आज 5 हजार 377 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement