Back
शिराळ्यात विद्यार्थ्यांनी रोपण केले 7 हजार बियांचे, पर्यावरणासाठी एक महत्त्वाचा उपक्रम!
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - चांदोली अभयारण्यात विद्यार्थ्यांकडून सात हजार बियांचे रोपण..
अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली अभयारण्याच्या परिसरात 7 हजार बियांचा रोपण करण्यात आले आहे. शिराळयाच्या आरळा गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हा बीज रोपणाचा उपक्रम राबवला आहे. सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांकडून फणस,आंबा,जांभुळ,चिंच , हिरडा ,अशोक इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या सात हजार बीया संकलित करण्यात आल्या होत्या,या सर्व बियाचे चांदोली अभयारण्य क्षेत्रातल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या डोंगर उताऱ्यावर रोपण करत झाडे लावा,झाडे जगवा, असा संदेश देण्यात आला.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_SAJJANGAD_ROAD
सातारा - साताऱ्यातील सज्जनगड रस्त्यावर झाड पडलं आहे.
यामुळे सज्जनगडकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे त्यामुळे घाट रस्त्यावर दरड आणि झाडं पडतायत.सज्जनगड रस्त्याला झाड पडून बराच वेळ होऊन देखील अद्याप प्रशासन अद्याप त्या ठिकाणी पोहचलेले नाही त्यामुळे काही भाविक गडावर अडकून पडले आहेत .
0
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड: आष्टी तालुक्यातील चिखली गावाला 11 विद्युत रोहित्र उपलब्ध; ग्रामस्थांकडून हलगी वाजवत गावभर आनंदोत्सव
Anc:बीडच्या आष्टी तालुक्यातील चिखली गावाला 11 विद्युत रोहित्र उपलब्ध झालेत. ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा करत हलगी वाजवून गावभर मिरवणूक काढली. गेल्या अनेक वर्षांपासून चिखली गावाला विद्युत रोहित्र उपलब्ध नसल्याने पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होत नव्हता. त्यामुळे अतिरिक्त विद्युत रोहित्र उपलब्ध करण्याची मागणी ग्रामस्थांनी आमदार सुरेश धस यांच्याकडे केली होती. अखेर ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर गावाला विद्युत रोहित्र उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांचा हा आनंद पहायला मिळतोय.
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे byte pointers
On हिंदी सक्ती
सरकारने मराठी माणसांच्या भावनांचा विचार केला
विरोधकांमुळे झालं असं म्हणण्यापेक्षा सरकारने मराठी माणसांच्या भावना जाणून घेतल्या
ऑन मंत्रिमंडळ बैठक अजित पवार
हिंदी सक्तीचा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला असेल
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत असतं
मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री सुप्रीमू आहेत
मंत्रिमंडळात वेगळी मतं मांडली गेली तरी पण मुख्यमंत्री घेतील तो निर्णय
ऑन ठाकरे एकत्र
दोन बंधूंनी एकत्र याव हा राजकीय भाग
हिंदी मुद्द्याच्या निमित्ताने विधानसभेनंतर सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाली
जनभावनेचा आदर करत सरकारने हा निर्णय घेतला
याचे श्रेय कुणी घेऊ नये,
On सुनील शुक्ला
यांची नावं मुंबईतल्या वार्ड मधल्या सुद्धा लोकांना माहीत नाहीत
त्यांनी काय वक्तव्य केले याची दखल आम्ही का घ्यायची
ऑन भास्कर जाधव
भास्कर जाधव हे ठाकरे गटाचे गटनेते.. ते सहीबाबतीत स्वतः सांगतील
भास्कर जाधव यांचा स्वभाव आक्रमक
राजकारणात त्यांना जे वाटते ते स्पष्ट ते बोलतात
विरोधकांच्या बैठकीला भास्कर जाधव पोहोचले होते की नाही हे मला माहित नाही
उद्धव ठाकरे सेनेचे ते गटनेते, त्यामुळे सहीची माहिती ते स्वतः देऊ शकतील
ऑन अजित यशवंतराव
सामंत यांच्यावर विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणाहून प्रखर टीका झाली
त्यातल्या अनेक टीकाकारांना पक्षाने सोबत घेतलं
अजित यशवंतराव यांच्या टिपणीचा मी समर्थन करणार नाही
ऑन भरत गोगावले
गोगावले यांनी राणे यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबतीत मला काही बोलायचं नाही
मारामारी मर्डर खून हे शब्द माझ्यापासून शेकडो दूर आहेत
या सगळ्या शब्दप्रयोगापासून मी अनभिज्ञ आहे
या सर्व प्रकरणात मी अडाणी आहे, शब्दाच्या बाबतीमध्ये त्याबद्दल मी भाष्य करून माझं अज्ञान मी कशाला प्रकट करू
मर्डर मारामारी या शब्दात मी अडाणी आहे
ऑन रायगड पालकमंत्री
मला या विषयासंदर्भात काही भाष्य करायचं नाही
पालकमंत्री पद ते माझ्यासाठी महत्वाचे नाही... त्याबाबत cm, dcm निर्णय घेतील
ज्या वेळेला तो निर्णय घेतील त्या वेळेला पालकमंत्री पदाचा निर्णय नक्की होईल
ऑन अजित पवार चहापान
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी चहापान कशासाठी असतं
अधिवेशनात काय विषयावर चर्चा होणार आहे यासाठी ते चहा पन असतं
विरोधकांमधला संवादच खुंटला जात असेल
मतमतांतर असू शकतात, टोकाचा विरोध देखील विरोधी पक्षाचा असेल
याचा अर्थ असा नाही की आपण संवाद करायचा नाही
संवाद करायला जायचं नाही त्यावेळेला वेगवेगळी कारण शोधावी लागतात
ऑन वाघ्या कुत्रा
इतिहास तज्ञ या सदर्भातील योग्य भाष्य करू शकतील
इतिहास तज्ञांच्या अनुषंगाने सरकारने काय तो निर्णय करावा
वाघ्या कुत्राबाबतीत पडळकर यांनी केलेल्या विधानावर बोलण्यासाठी तटकरे यांचा नकार
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Anc - कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात मानवी धैर्य आणि जिव्हाळ्याचा एक थरारक प्रसंग रविवारी घडला. उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने चार वर्षीय चिमुकल्यावर हल्ला चढवल्यानंतर त्याचे आजोबा धावून गेले आणि बिबट्याशी झुंज देत आपल्या नातवाचे प्राण वाचवले.ही घटना २९ जून रोजी घडली.
V/O - कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील कोल्हे वस्तीजवळील सुराळकर वस्तीवर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल अजय आहेर (वय ४) हा चिमुकला सकाळी त्याची आई कामाला निघाली असता आईच्या मागे घराबाहेर पडला. त्याच वेळी ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कुणालवर झडप घालत त्याला मानेवर चावा घेत उसाच्या शेतात ओढून नेले.नातवाचा आवाज ऐकताच आजोबा मच्छिंद्र आहेर तत्काळ उसाच्या शेतात धावले. प्रसंगावधान राखत त्यांनी बिबट्यावर झडप मारली आणि स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नातवाला त्याच्या तावडीतून सोडवले. ही घटना ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारी ठरली. जखमी अवस्थेत कुणालला तातडीने कोपरगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान , घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे.
बाईट - मच्छिंद्र आहेर -आजोबा
बाईट - निलेश रोडे -वनपरिक्षेत्र अधिकारी, कोपरगाव
कपिल विष्णू सुरळकर, ग्रामपंचायत सदस्य, येसगाव
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Feed send by TVU 51
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_student_ringan
शाळेत भरला गोल रिंगण...
शाळेतील विद्यार्थी रंगले रिंगणात....
विठ्ठलाच्या नावाने विद्यार्थी आणि शिक्षक दुगमगले.......
अँकर
आषाढी एकादशी निमित्त नाशिकच्याज नाशिकच्या फ्रवाशी टॉऊन अकॅडमी स्कूलमध्ये दिंडीचे भव्य आजोजन करण्यात आलंय... गेल्या आठ वर्षांपासून दिंडीला सुरुवात झाल्याने विध्यार्थीन सह शिक्षकांनी शाळा परिसरात एकच आनंद उत्सव साजरा केला..यावेळी जवळजवळ ४००विद्यार्थी वारकरी बनून दिंडीत सहभागी होत असून टाळ- मृदुंगाच्या तालावर नाचत तर विठुरायाच्या नावाने स्मरण करत आषाढी एकादशी साजरी केलीये.. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे विठ्ठलाचे रुक्मणीची वेशभूषा करत पालकांचे लक्ष वेधून घेतलं तर वासुदेवाच्या वेशभूषाचा पेहराव यावेळी विद्यार्थ्यांनी केला होता.....शाळेतील संचालक सह शिक्षकांनी देखील फुगडी खेळून विध्यार्थीनामध्ये सहभाग नोंदवला...यावेळी शाळा परिसरासह परिसरातील वातावरण पूर्ण भक्तीमय झालेल्या दिसून आलं.... तर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रभावामुळे शाळा परिसरात एकच व पंढरपूर भेटी च स्वरूप प्राप्त झालंय....त्याचबरोबर वारीच मुख्य आकर्षण असलेलं गोल रिंगण देखील करण्यात आलं होतं..
बाईट- रतंच लत
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia
Slug - 3006_GON_FUKE_BYTE
FILE - 1 VIDEO
दिवसभर मराठी बोलतात आणि रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी लोकांची दिशाभूल करण्याकरिता यांचं प्रेम जागृत होतो.... परिणय फुकेंचा दोन्ही ठाकरे बंधूंना टोला...
Anchor : हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी विरोध सुरू केला असून 5 तारखेला मोर्चा देखील काढण्यात येणार आहे... यावर परिणय फुके यांना विचारले असता म मराठीचा की महानगरपालिकेचा असा सवाल त्यांनी ठाकरे बंधूंना विचारला... तर जेव्हा निवडणूक येतात तेव्हा यांचा मराठी प्रेम जागृत होतो अशी टीका केली आणि दोन्ही ठाकरे बंधूंची मुलं कोणत्या माध्यमातून शिकले आहेत असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला... तर पुढे बोलताना दिवसभर इंग्रजी बोलतात आणि रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी लोकांची दिशाभूल करतात असाही टोला यावेळी परिणय फुकेंनी लगावला...
BYTE : परिणय फुके, ऑन ठाकरे बंधू
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
30062025
slug -PPR_BLACK_SPOT
feed on 2c
file 02
-----
Anchor - आषाढी एकादशी काळात लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे. चौफाळा ते महाद्वार घाट आणि 65 एकर परिसर या परिसरात 13 ब्लॅक स्पॉट शोधले आहेत. त्या ठिकाणी पोलिसांच विशेष लक्ष असणार आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील संत नामदेव पायरी, महाद्वार, चौफाळा , महाद्वार घाट ,प्रदक्षिणा मार्ग क्रॉसिंग ,जुना दगडी पुल, 65 एकर असे १३ ठिकाणे आहेत इथे चेंगरा चेंगरी होण्याची अधिक शक्यता असते.
पोलिसांनी एकादशीच्या गर्दी काळात महाद्वार चौक ते पश्चिम द्वार परिसरात एकेरी चालत जाण्याचा मार्ग केला आहे. त्यामुळे वारकरी समोरासमोर येऊन गोंधळ उडणार नाही. असाच पद्धतीने प्रत्येक ठिकाणी गर्दी होऊन गोंधळ उडणार नाही याची खबरदारी घेतली आहे.
Wkt
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_DHIND
अँकर:पुणे-बेंगळुरु महामार्गावर कराड शहराजवळ ट्रकवर दगडफेक करत वाहतूक रोखत काचा फोडत काही तरुणांनी गोंधळ निर्माण केला होता. शहरात दहशत माजवणाऱ्या तीन तरुणांना अवघ्या काही तासात कराड शहर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कोल्हापूरातून ताब्यात घेतले. शहरात दहशत माजवणाऱ्यांवर जरब बसावी यासाठी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या युवकांना शहरातून पायी चालतच नेले.
संशयित आरोपींची नांवे :-
इब्राहीम सय्यद, अमन सय्यद, उमर सय्यद सर्व संशयित युवक 22 वर्षाची आहेत.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
ठाणे खंडणी विरोधी पथकाची कल्याण मध्ये मोठी कारवाई
फळविक्रेत्याच्या वेषात गुन्हेगारीचा डाव रचणाऱ्या सराईत आरोपी सचिन शिंदेला कल्याणच्या बंदरपाडा परिसरातून ठोकल्या बेड्या
दोन गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस देखील केले जप्त
Anc.. ठाणे शहराच्या खंडणी विरोधी पथकाने कल्याणच्या बंदरपाडा परिसरात मोठी कारवाई करत दोन गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूसासह एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे तो व्यवसायाने फळविक्रेता आहे. मात्र फळविक्रीच्या आडून तो गंभीर गुन्ह्यांची आखणी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर खंडणी पथकाने छापा मारून त्याला ताब्यात घेत सचिन शिंदेवर बेकायदा शस्त्र बाळगणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
1
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn shivsena beaten av
Feed attached
मारहाण करताना शॉट्स आहेत, महिलेचा चेहरा दिसतोय तो दाखवता येणार नाही, ब्लर करावा
मुकुंदवाडी परिसरात दोन ठिकाणी सुरू
असलेल्या कुंटणखान्यांत पीडिता, गिऱ्हाइकांत वाद झाल्यानंतर नागरिकांचा क्षोभ उफाळला. शिंदेसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दोन्ही कुंटणखान्यांची तोडफोड करीत तीन पीडितांना पोलिसांच्या ताब्यात दिले. रविवारी रात्री १० ते ११ दरम्यान मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात हा प्रकार घडला.यावेळी तिथं उपास्थित काही ग्राहकांना ही चांगलाच चोप देण्यात आला... मुकुंदवाडीत अवैध दारू विक्री, जुगारांच्या अड्ड्यांसह रेल्वेस्थानक परिसरात दोन लॉजवर देहविक्री सुरू होती. रविवारी रात्री याठिकाणी गोंधळ उडाला. ही बाब शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकारी यांना मिळताच त्यांनी कार्यकर्त्यासह धाव घेतली. स्थानिकांनी दोन्ही कुंटणखान्यांची तोडफोड केली. यातला एक कुंटणखाना शाळेसमोर सुरू होता. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या दोन कुंटणखान्यांविषयी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील काही विशिष्ट कर्मचाऱ्यांना कल्पना होती. नागरिकांनी तोडफोड केल्यानंतर पोलिसांना तेथे जावे लागले.
0
Share
Report