Back
सोलापूर: पावसात तापमान वाढ! जानें क्यों है यह अनोखा मौसम?
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात पाऊस पडून देखील तापमानात दोन अंशांनी वाढ
- शहरात सोमवारी दुपारनंतर पाऊस पडून देखील तापमानात दोन अंशांनी वाढ
- सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 1.9 मिलिमीटर पावसाची हजेरी
- सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते मात्र दुपारनंतर पावसाची हजेरी
- पुढील चार दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Road
Feed on - 2C
-------------------------
Anchor - आठ दिवसापूर्वी झालेला डांबर रस्ता ग्रामस्थानी चक्क हाताने उखडून दाखवत कामाच्या दर्जाचे पितळ उघडे पाडले. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील हा प्रकार आहे. अनेक वर्षानंतर बाभुळगाव ते टाकळगाव दारम्यानचा रस्ता डांबर रस्ता झाला. आठ दिवसांपूर्वीच ह्या रस्त्याचे डांबरीकरण झाले. पण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. ग्रामस्थानी डांबर रस्ता चक्क हातानी उखडून दाखवला. हाताने रस्ता उखडून दाखवत गावाक-र्यांनी रोष व्यक्त केलाय. आताच जर रस्ता हाताने उखडून निघत असेल पावसात हा रस्ता टिकेल का असा प्रश्न निर्माण झालाय. ग्रामीण भागातील रस्ते का खराब होतात याचा प्रत्यत या व्हिडीओतून दिसून येतोय.
----------------
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवासी वसंतराव नाईक यांचा स्मृतिदिन. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या गहुली येथील वसंतराव नाईक यांच्या दुर्लक्षित व दयनीय अवस्था झालेल्या स्मारका शेजारी त्यांची जयंती साजरी करून, शासनाप्रती रोष व्यक्त केला. वसंतराव नाईक यांच्या स्मृती जिवंत राहाव्या यासाठी शासनाने 100 कोटीं रुपयाचा निधी त्यांच्या जन्मशताब्दीला घोषित केला होता. त्यापैकी 10 कोटी रु. चा निधी हा त्यांच्या पुसद तालुक्यातील गहुली या जन्मगावी स्मारक आणि संग्रहालयासाठी खर्च झाला, हे स्मारक आणि संग्रहालय आठ वर्षांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. या वास्तूची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या वास्तूच्या खिडक्यांची तोडफोड करण्यात आली असून येथील बरेचसे साहित्य लंपास करण्यात आले आहे. ही एक प्रकारे स्व. वसंतराव नाईक यांची विटंबना आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शरद मैंद यांनी केल, या वास्तू चे लोकार्पण लवकरात लवकर करून सामान्य नागरिकांसाठी खुले करून द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
बाईट : शरद मैंद, प्रदेश सरचिटणीस राकॉ sp
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढले
फीड 2C
अँकर:- मान्सूनपूर्वीच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्दी खोकला आणि घशाचे आजार अश्या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढला आहे खाजगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य आजाराचे रुग्ण पाहायला मिळत आहेत संसर्गजन्य आजाराच्या वाढलेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथील आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे शासकीय रुग्णालयात औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे दूषित पाणी पिल्याने आणि संसर्ग असलेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने हे आजार वाढत असून पावसाळा सुरू झाल्यानंतर जून जुलै महिन्यात अशा रुग्णांची संख्या वाढते नागरिकांनी स्वच्छ पाणी प्यावं आणि गर्दीच्या ठिकाणी जाण टाळावं असा सल्ला जिल्हा शल्यचिकित्सक संजय घोगरे यांनी दिला आहे
बाईट:- डॉ संजय घोगरे, जिल्हा शल्यचिकित्सक
0
Share
Report
Vasai-Virar, Maharashtra:
Date-1july2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI RAID
Feed send by 2c
Type-Av
Slug- वसई विरार मध्ये ईडी ची १६ ठिकाणी छापेमारी
वाय एस रेड्डी प्रकरणात ईडीच्या धाडी
रेड्डी यांच्याशी संबंधित आर्किटेक्ट, बांधकामाच्या फाईल मंजूर करून घेणारे एजंट च्या घरी छापे
वसई:- वसई विरार महापालिकेच्या नगर रचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यावर पडलेल्या ईडी छाप्यानंतर आज ईडीकडून वसई विरारमध्ये 16 ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
रेड्डी यांच्याशी संबंधित आर्किटेक्ट, बांधकामाच्या फाईल मंजूर करून घेणारे एजंट यांच्या घरावर ही छापमारी सुरू असल्याची माहिती आहे
वसई पश्चिम 100 फुटी रोड वरील पद्माराज या इमारतीच्या समोर दोन भारत सरकार चा बोर्ड असणाऱ्या दोन इनोव्हा गाड्या उभ्या असून, याच गाड्यातून ईडी अधिकारी सकाळी सात वाजता वसईत आल्याचे सांगण्यात आले आहे.
या इमारती मध्ये नेमके कुणाच्या घरी ईडी ची छापमारी सुरू आहे याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही..
0
Share
Report
Baramati, Maharashtra:
JAVEDMUALNI
SLUG 0107ZT_INDAPURRIVER
BYTE 3
चौदा वर्षीय युवक निरा बंधाऱ्यावरून पाण्यात वाहून गेला..... इंदापूरच्या सराटी येथील नीरा नदीच्या बंधाऱ्यावरील घटना.....गोविंद कल्याण फोके अस तरुणाचं नाव... वृद्ध आजीसोबत गोविंद चालत होता तुकोबांची वारी.... नीरा नदीच्या बंधारावरील अकलूज बाजू कडून पाण्यात बुडाल्याची माहिती.....
Anchor_ जगद्गुरु तुकोबारायांच्या नीरा स्नानाच्या अगोदर नीरा नदीकाठी अकलूज हद्दीत एक दुर्घटना घडली आहे.इंदापूरच्या सराटी आणि अकलूज ला जोडणाऱ्या नीरा नदीवरील बंधाऱ्यातून सकाळी सव्वा सहाच्या सुमारास वारीत सहभागी असलेला गोविंद कल्याण फोके हा तरुण पाण्यात वाहून गेलाय. गोविंद फोके हा पंधरा वर्षाचा असून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावचा रहिवासी आहे.तो आपल्या आजी परेगा प्रभाकर खराबे यांच्या सोबत तुकोबांच्या वारीत चालत होता.
बाईट _ अभिजीत कणसे पोलीस उपनिरीक्षक
बाईट _ परेगा प्रभाकर खराबे
दरम्यान बारामती होमगार्ड दलात कार्यरत असणारे राहुल अशोक ठोंबरे या कर्मचाऱ्यांने त्याला पुरेपूर वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ते यात अपयशी ठरले आहेत.
बाईट :राहुल अशोक ठोंबरे होमगार्ड...
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- शनी बनावट ॲप; उपोषण
फीड 2C
अँकर:- अहिल्यानगरच्या शनिशिंगणापुर देवस्थानतील बनावट ॲप, बनावट देणगी पावत्या आणि बनावट QR कोडच्या माध्यमातुन करोडो रूपयांची लुट केल्याचा आरोप करत संबंधित दोषींवर ठोस करवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी कामगार विभाग अध्यक्ष संभाजीराजे माळवदे यांनी शनिशिंगणापूर येथे आमरण उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी शनी मंदिराचे बनावट ॲप तयार करून भाविकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याच समोर आलं होत या विरोधात शनी मंदिर प्रशासनाने पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेत तक्रार देखील दिली आहे मात्र संबंधित ॲप तयार करणाऱ्यांच्या विरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे माळवदे यांनी शनी मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर या आंदोलनाला सुरुवात केली आहे. अपहार झालेल्या निधी देवस्थानच्या खात्यावर आला पाहिजे अशी मागणी माळवदे यांनी केली आहे. जोपर्यंत चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचा इशारा माळवदे यांनी दिला आहे.
बाईट:- संभाजी माळवदे, अध्यक्ष, प्रदेश काँग्रेस कमिटी कामगार विभाग
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर - शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांमधून सर्वत्र जोरदार विरोध होऊ लागलाय,हिंगोलीसह परभणी जिल्ह्यात ही शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन केले, परभणी तालुक्यातील पिंगळी येथे नांदेड परभणी महामार्ग दोन तास अडविण्यात आला,तर परभणीच्याच पोखर्णी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तर पूर्णा तालुक्यातील सुरवाडी आणि सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथे शेतकऱ्यांनी शेती मोजणी करण्यास अधिकाऱ्यांना विरोध दर्शवित अधिकार्यांना माघारी पाठवले...
बाईट- किशोर ढगे- शेतकरी नेते
बाईट- शिवलिंग बोधने- शेतकरी नेते
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज
AC ::- शक्तिपीठ मार्गाला समर्थन करण्यासाठी पोहोचला तरूण... शक्तीपीठ मार्गाचे समर्थन करताच विरोध करणारे शेतकरी झाले आक्रमक.... समर्थन करण्यासाठी आलेल्या युवकाला शेतकऱ्यांनी केला विरोध .... प्रशासनाचा हस्तक म्हणत विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी घातला गोंधळ ... काहीवेळ तनावाची परिस्थिती...मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांचा गोंधळ...पोलिसांच्या मध्यस्थी नंतर वाद निवळला...
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Anc - आज राज्यात कृषी दीन साजरा केला जात असताना कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील बळीराजा खरच सुखी झालाय का हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.. कर्जमाफी, हमीभाव यासाठी विरोधात असणारे नेते कायमच आंदोलन करतात..काही दिवसांपूर्वी केलेले बच्चू कडू यांचे उपोषण असेल.किंवा आज रोहित पवार यांनी गजनी म्हणत सरकारवर केलेली टीका...मात्र आंदोलन करून दिलेले आश्वासन पूर्ण होत का..? याच मागणीसाठी आठ वर्षांपूर्वी पुणतांबा गावाने ऐतिहासिक शेतकरी संप देखील केला.. आज आठ वर्षांनंतर खरच बळीराजा सुखी झालाय का ..? पुणतांबा गावातील शेतकरी म्हणताहेत कर्जमाफी ही तर तात्पुरती मलमपट्टी आहे.. शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव दिला जावा , विज पाणी दिलं तर शेतकऱ्यांना सरकारपुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही.अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केलीय...
Bite - शेतकरी
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
Anchor- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात वर्धमान कंपनीत अज्ञात चोरट्यांनी तीन लाख 91 हजार 600 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली होती, या संदर्भात शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी आपले तपासचक्र फिरवत तब्बल तीन तासातच गुन्हा उघडकीस आणत तीन लाख 91 हजार 600 रुपये रोकड सह आरोपी गगन चंद्रप्रकाश शर्मा याला अटक करण्यात आले आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report