Back
मुंबईतील पर्यटकाची धबधब्यात बुडून मृत्यूची धक्कादायक कहाणी!
Raigad, Maharashtra
फीड मध्ये बुडालेल्या तरुणाचा फोटो सुद्धा आहे.
स्लग - ती उडी त्याच्या आयुष्यातील शेवटची उडी ठरली ...... मुंबईतील पर्यटकाचा चन्नाट धबधब्यात बुडून मृत्यू ....... धबधब्यातील शेवटच्या उडीचा व्हिडिओ समोर ...... मृतदेह बाहेर काढणे होते आव्हान ...... पावसाळी पर्यटन करताना भान राखा .......
अँकर - माणगाव जवळच्या चन्नाट येथील धबधब्यात बुडून मुंबईतील ऋषी पाथीपका या 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाने धबधब्याच्या पाण्यात मारलेल्या शेवटच्या उडीचा व्हिडिओ आता समोर आलाय. ऋषी आपल्या मित्रांसह या धबधब्यावर आला. तो उडी मारत असताना त्याचे मित्र त्याला पुढच्या बाजूला उडी मार असं ओरडून सांगत होते. मात्र ही उडी त्याच्या आयुष्यातील शेवटची उडी ठरली. त्यानंतर तो बाहेर आलाच नाही. त्याचा शोध घेणं मोठं आव्हान होतं. कोलाड आणि माणगाव इथल्या बचाव पथकांनी महत्प्रयासाने त्याचा मृतदेह शोधून बाहेर काढला. पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. पावसाळी पर्यटन करताना भान राखा असं आवाहन पर्यावरण प्रेमींनी केलं आहे.
बाईट - सागर दहिंबेकर, बचाव पथक प्रमुख
बाईट - शंतनु कुवेसकर, पर्यावरण प्रेमी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement