Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

मुख्याध्यापकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण: पालकांचा संताप!

PRAVIN TANDEKAR
Jul 06, 2025 04:03:28
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara Slug - 0607_BHA_STUDENT FILE - 4 VIDEO मुख्याध्यापकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण.... प्रशांत विद्यालय माटोरा येथील प्रकार.... कारधा पोलिसात मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल Anchor : शाळेतील भींत पाडल्याच्या कारणावरून शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केले. सदर प्रकार भंडारा तालुक्यातील माटोरा येथील प्रशांत विद्यालयात घडला. यामुळे संतप्त पालक शाळेत धडकले. पालकांच्या तक्रारीवरुन कारधा पोलिसात मुख्याध्यापक प्रदीप गेडाम यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कुलदीप नामदेव डोमळे (१४) रा. माटोरा, असे मारहाण केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. Vo :- भंडारा तालुक्यातील माटोरा येथील प्रशांत विद्यालयातील कुलदीप डोमळे नामक विद्यार्थ्याने शाळेतील विटांची भींत लाथ मारून तोडले. या कारणावरुन शाळेतील मुख्याध्यापक प्रदीप गेडाम याने विद्यार्थ्याला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत कुलदीप या विद्यार्थ्याला दुखापत झाली. याची माहिती गावात होताच या प्रकरणी गावकरी शाळेंत धडकले व मुख्याध्यापक याला जाब विचारले. नंतर पालक कारधा पोलिस स्टेशनला पोहचत मुख्याध्यापकाविरुद तक्रार देण्यात आली. तक्रारीवरुन कारधा पोलिसात मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement