Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांनी वाढवले अपघातांचे प्रमाण!

PRAFULLA PAWAR
Jun 28, 2025 02:01:50
Raigad, Maharashtra
स्लग - मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा हाच का दर्जा ? ...... निगडे येथील पुलावर काँक्रिटला खड्डे ..... काँक्रिटला पडलेल्या खड्ड्यातून शिगा बाहेर पडल्या ....... मोटार सायकल साठी अपघाताला निमंत्रण ....... अँकर - एकीकडे 14 वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग नेहमीच चर्चेत राहिलाय. आता महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुना समोर आलाय. पेण जवळच्या निगडे येथील पुलावरील काँक्रिटला तडे जाऊन मोठा खड्डा पडलाय. आणि त्यातून लोखंडी शिगा बाहेर पडल्या आहेत. पुलावर दोन ते तीन ठिकाणी हा प्रकार पहायला मिळतोय. या मार्गावरून जाणारी वाहने या खड्ड्यात आपटतात. या खड्ड्यांमध्ये आदळून मोटार सायकलला अपघात होण्याची दाट शक्यता आहे. वाहनांचे टायर फुटण्याची भीती आहे. कामानंतर वर्षभरातच पडलेल्या खड्ड्यांमुळे महामार्गाच्या कामाचा दर्जा काय असेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement