Back
8 अक्टूबर को नवी मुंबई का ग्रीनफील्ड एयरपोर्ट खुलने वाला है
SNSWATI NAIK
Sept 26, 2025 07:18:43
Navi Mumbai, Maharashtra
story slug -नवी मुंबईतून विमानोड्डाणाचा मुहूर्त अखेर ठरला ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतून विमानोड्डाणाचे संकेत
navi mumbai airport opening 8 October ?
FTP slug - nm airport opening
shots- airport work
reporter- swati naik
navi mumbai
Anchor: नवी मुंबईतून विमानोड्डाणाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतून विमानोड्डाण करण्यासाठी सिडकोसोबत एनएमआयएएलची लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे विमानतळाच्या उद्घाटनाची नवी मुंबईकरांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.
Vo1- पंतप्रधानांच्या या दौऱ्याची आखणी अंतिम टफ्फ्यात असून सिडकोसह एमएमआरडीए व्यवस्थापन आपआपल्या प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या तयारीला लागले आहेत. त्याकरिता बैठकांचे सत्र गुरुवारपासून सुरु झाले आहे.
विशेष म्हणजे एअर इंडिया समुहाने नवी मुंबई विमानतळावरुन एअर इंडिया एक्सप्रेसची २० उड्डाणे होणार असल्याचे नुकतीच जाहीर केले आहे. देशातील १५ शहरांना या विमानतसेवेद्वारे जोडले जाणार आहे. भविष्यात एअर इंडिया समूहाचा या विमानतळावरुन ५५ ते ६० उड्डाणे करण्याचा मानस आहे.
दरम्यान, नवी मुंबईतून विमानोड्डाणाच्या मुहूर्ताची गत ९ महिन्यांपासून तारीख पे तारीख पडत होती. नवी मुंबई विमानतळ टर्मिनल-१चे काम वॉर फुटींगवर सुरू असून तब्बल १३ हजार कामगार विमानतळ प्रकल्पस्थळी काम करत आहेत. त्यामुळे फक्त देशांतर्गत (डोमेस्टिक) विमान उडवण्याऐवजी परदेशांतर्गत (इंटरनॅशनल) विमानसेवा देखील एकाच वेळेस सुरू करण्याचा मानस अदानी सुमूह व केंद्र सरकारच्या स्तरावर घेतला गेल्याचे बोलले जाते.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हा नवी मुंबई आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी वाहतूक आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. सदर विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि व्यापार वाढीच्या नव्या संधी महाराष्ट्रासाठी व या देशासाठी निर्माण होणार आहेत.
देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ म्हणून नावारुपास येणार आहे. यासाठी ३७मेगा वॅट ग्रीन एनर्जीचा वापर केला जाणार आहे. तसेच चारी बाजूने या विमानतळाला कनेक्टिव्हीटी प्राफ्त असून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळापेक्षा या विमानतळाची जास्त क्षमता आहे. विमानतळाच्या २ रनवेचे काम पूर्ण झाल्यानंतर वर्षाकाठी २ कोटी प्रवासी येथून ये-जा करु शकणार आहेत.
gf
Vo2 - दरम्यान, येत्या ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथून पहिल्या विमानोड्डाणाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सदर विमानतळ परिसर सीआयएसएफ च्या ताब्यात दिला जाणार आहे. त्यानंतर तब्बल ४५ दिवस विमानतळ आणि परिसराचे स्कॅनिंग करून सदर परिसर सीआयएसएफद्वारा सुरक्षित केला जाणार आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवी मुंबईतून कमर्शियल फ्लाईटसच्या उड्डाणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowSept 26, 2025 09:50:220
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 09:50:010
Report
UPUmesh Parab
FollowSept 26, 2025 09:49:423
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 26, 2025 09:49:33Ratnagiri, Maharashtra:अत्यंत बेशरम पणाचा कळस
जिल्हाधिकारी गरब्यात नाचतात हेच महाराष्ट्राचे दुर्दैव - विनायक राऊत
0
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 26, 2025 09:46:380
Report
PNPratap Naik1
FollowSept 26, 2025 09:34:470
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 26, 2025 09:32:380
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 26, 2025 09:32:260
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 26, 2025 09:32:200
Report
KJKunal Jamdade
FollowSept 26, 2025 09:31:360
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 26, 2025 09:30:300
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 26, 2025 09:01:020
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 26, 2025 09:00:480
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 26, 2025 09:00:330
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 26, 2025 08:35:550
Report