Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422211

नाशिकच्या ग्रामस्थांचा संताप: अंत्यसंस्कारासाठी प्लास्टिक कागदाचा वापर!

Sudarshan Khillare
Jul 06, 2025 04:31:20
Surgana, Maharashtra
अँकर :- स्मशानभूमी निवारा शेडअभावी अक्षरश: भर पावसात उघड्यावर प्लास्टिक कागदाचा आधार घेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नाशिकच्या आदिवासी बहुल सुरगाणा तालुक्यातील रोघांणे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जांभूळपाडा येथील ग्रामस्थावर आल्याने मरणानंतर मृतदेहाची हेळसांड होत आहे.एवढेच नाही तर रस्ता नसल्याने ओढे नाले व चिखल तुडवत मृतदेह घेऊन जाण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.वारंवार मागणी करूनही लोकप्रतिनिधी व प्रशासन लक्ष देत नसल्याने सरण ही थकले मरण पाहुणी. अशी म्हणण्याची वेळ आली आहे.मरणानंतरही नरक यातना भोगाव्या असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.लवकरात लवकर स्मशानभूमी शेड व रस्त्याचे काम सुरू न केल्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement