Back
महापालिका आयुक्तांनी कचरा टाकणाऱ्यांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठवला!
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn maha palika av
Feed attached
दुभाजकांवर कचरा टाकणाऱ्यांकडून दंड वसूल करा, प्लास्टिक बॅग विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना महापालिका आयुक्त, प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिल्या आहेत. हा दंड १ हजार रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत आहे. शहर स्वच्छतेसाठी महापालिका 'स्वच्छता अपनाओ, बीमारी भगाओ' ही मोहीम राबवणार आहे. या राष्ट्रव्यापी स्वच्छता अभियानाची पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासकांनी दिल्या. ही मोहीम 'स्मार्ट सिटी' सोबत संयुक्तपणे राबवली जाईल. शहराच्या विविध भागात नागरिक दुभाजकावर कचरा टाकतात. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेने दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलले आहे. हा दंड १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत असेल. या मोहिमेत शहरातील सर्व व्यावसायिक आस्थापनांना त्यांच्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Beed, Maharashtra:
FEED : Cow's life saved 01,02
बीड : तहसील आवारात गायीची तडफड... तलाठ्यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी
Anc : पाटोदा तहसील कार्यालयाच्या आवारात एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. व्यायामासाठी बाहेर पडलेल्या तलाठी मित्रांनी आवारात एका गाईला अर्धमरणावस्थेत पाहिलं… आणि चालत पुढे न जाता थांबले. तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला. काही वेळातच गायीची प्रकृती सुधारली. ही केवळ मदत नव्हती, तर सामाजिक जाणीव आणि माणुसकीचं जिवंत उदाहरण होतं. आज एक गाय वाचली... आणि समाजात अजूनही माणुसकी शिल्लक आहे, हे पुन्हा सिद्ध झालं.
0
Share
Report
Buldhana, Maharashtra:
उद्धवराज एकत्रित येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष....
बुलढाण्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे होणार रवाना
अँकर - अनेक वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्रित येत असल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा जल्लोष ठिकठिकाणी पाहायला मिळतोय. ठाकरे एकत्रित यावेत हीच जनमानसाची भावना आहे असा मानस बाळगून कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करीत आहेत... दरम्यान मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत त्यांच्या भावना जाणून घेतले आहेत आमची प्रतिनिधी मयूर निकम यांनी.....
Wkt - मयूर निकम, प्रतिनिधी
कार्यकर्ते
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0407ZT_JALNA_MARHAN(1 FILE)
जालना | मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण,चंदनझिरा पोलिसांत गुन्हा दाखल,2 संशयीतांना अटक
अँकर: जालन्यात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे तिच्या वडीलाला लाठ्याकाठ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे.जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी मधील ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रिसिडेन्सी मध्ये काल ही घटना घडली असून याप्रकरणी जालन्यातील चंदनझीरा पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीसह ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक देखील केली आहे.
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn khaire byte
feed by 2 c
*ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे पॉइंटर*
- मी मातोश्रीचा सैनिक आहे. बाळासाहेबांच्या तालमीत आम्ही तयार झालोय, दोन्ही भाऊ एकत्रित यावे सर्वांचीच इच्छा आहे.
- आज महाराष्ट्रात भ्रष्टाचार सुरू आहे. महाराष्ट्रात बदल पाहिजे. दोन्ही भाऊ एकत्र येत आहे याचा आनंद आहे.
- राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंच्या नेतृत्वात मी काम केले आहे..
- ठाकरे ब्रँड राहणार आहे. तो दिसून येईल.
- राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते चिमण्यांनो परत या...
- उदय सामंत दोन्ही भावासमोर कचरा आहे, तो संभ्रम निर्माण करतो.
ऑन राणेवर गंभीर आरोप...
- भाई कोळेकर हा शिवसेनेचा कार्यकर्त्या होता, त्याची हत्या झाली. तेंव्हा संपूर्ण गावात चर्चा होती राणेंनी त्यांची हत्या केली.. त्यावेळी मी कणकवलीच्या निवडणुकीत राणेंच्या विरोधात प्रचाराला गेलो होतो....
- आम्ही कणकवलीला गेलो होतो तेव्हा राणेंचा मुलगा जो बडबड करतो त्या नितेश राणेला मी धमकावले होते... त्यावेळी तो पोलिसांची गाडी घेऊन फिरत होता....
- राणे मुख्यमंत्री असताना नारायण राणे मला काढणार होते मात्र त्यावेळी राज ठाकरे आणि बाळासाहेबांनी मला काढू दिले नाही... मातोश्री आणि ठाकरे परिवाराचे माझ्यावर उपकार आहे.म्हणून मी एकनिष्ठ आहे.
- तुम्ही आणि तुमचे पोट्टे काय म्हणतात ते पाहा... मनोहर जोशींना बाजूंना करून राणेंना केले होते...
- देवा भाऊ यांना दोन भाऊ एकत्र यावं असे वाटत नव्हते... आतून त्यांना वाटत होते दोघे भाऊ एकत्र येऊ नये...
0
Share
Report
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_SENA_MNS_WKT दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यासाठी अमरावतीत शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र; जुन्या आठवणी आठवल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते गहिवरले
अँकर :- मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू उद्या प्रथम मुंबईत एकत्र येत आहे. राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्ध केल्यानंतर ठाकरे बंधू मुंबईत विजय जल्लोष सभा करणार आहे. यासाठी अनेक शिवसैनिक आणि मन सैनिक अमरावतीतून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. त्यापूर्वी अमरावतीत शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र आले आहे. दरम्यान जुन्या आठवणी आठवल्याने शिवसेनेचे पदाधिकारी गहिवरल्याचे पाहायला मिळाले आहे. याविषयी शिवसैनिक आणि मनसैनिकांशी अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
चौपाल
0
Share
Report
Akola, Maharashtra:
Anchor : दोन्ही ठाकरे बंधू एका मंचावर तब्बल वीस वर्षा नंतर एकत्र येत सभा घेणार आहेत.. या सभेचा मराठी माणसावर काय परिणाम होणार आणि राज्यातील राजकारणावरही काय परिणाम होणार यासंदर्भात मनसे आणि युबीटी सेनेच्या कार्यकर्त्यां सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांनी..
चौपाल.....
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0407ZT_CHP_ST_TIME_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- नवीन शालेय सत्र सुरू झाल्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची बस फेऱ्यांच्या अनियमिततेमुळे अडचण, मुल तालुक्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी तासनतास बसतात खोळंबून, एकीकडे कुटुंबीयांना भेडसावणारी चिंता तर दुसरीकडे शिक्षकांचे रागावणे झेलत शिक्षण करत आहेत पूर्ण, विद्यार्थ्यांनी शासनाला तातडीने बस फेऱ्या वाढवण्याची केली मागणी
अँकर:--
या बस मध्ये गर्दी आहे येऊ नका...
मागून बस येत आहे, यात गर्दी करू नका....
ही व अशी अनेक उत्तरे चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना एसटी वाहक देत आहेत. नवे शालेय सत्र सुरू झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लगतच्या गावांमध्ये जावे लागते. शासनाने यासाठी खास विद्यार्थी बस गाड्या देखील निश्चित केल्या आहेत. मात्र मूल असो अथवा सावली या संपूर्ण भागात बस स्थानकावर - बस थांब्यावर तिष्ठत राहिलेले विद्यार्थी नजरेस पडतात. एकीकडे कुटुंबीयांना विद्यार्थी- विद्यार्थिनी सुखरूपपणे शाळेत जाऊन परत येण्याची चिंता भेडसावते. तर दुसरीकडे योग्य वेळेत बस न मिळाल्याने वर्गात पोहोचताना झालेल्या विलंबाने शिक्षकांची बोलणी खावी लागतात. अगदी रस्त्यावर एसटी बस ची वाट बघत बसलेले विद्यार्थी आपल्याला या भागात दिसू शकतात. सध्या विद्यार्थ्यांना बस पासेस मिळालेले नाहीत. अशा स्थितीत तिकीट काढून शिक्षणासाठी पदरमोड सुरू आहे. मात्र तरीही योग्य व नियमित बस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष आणि अधिक बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
बाईट १),२), ३) त्रस्त विद्यार्थी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
04072025
Slug - PPR_GORE_DARSHN
feed on 2c
--------
Anchor - ग्रामविकास मंत्री पालकमंत्री जय कुमार यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श रांगेत जाऊन साधला वारकऱ्यांची संवाद
विठोबाच्या दर्शनासाठी लाखी भाविक दर्शन रांगेत आहेत. यावर्षी मे महिन्या पासून आषाढी वारीची तयारी प्रशासन कडून सुरू आहे. त्या सुविधा आज भाविकांना अनुभवता येत आहेत. दर्शन रांगेतील स्वच्छता , मिनरल वॉटर , महा प्रसाद, स्वच्छता गृह याची व्यवस्था भाविकांसाठी उपयुक्त ठरत आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज स्वतः दर्शन रांगेत चालत वारकऱ्यां सोबत संवाद साधला. वारकऱ्यांनी उपलब्ध सुविधांवर समाधान भावना व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले
-----
byte - जयकुमार गोरे, पालकमंत्री
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Nsk_thakrepkg
Feed by live u 51 and 2ç
Anchor कधीकाळी मनसे आणि शिवसेनेचा गड राहिलेला नाशिक शहर सध्या पूर्णपणे भाजपच्या ताब्यात गेलाहे. दोन्ही पक्षांमधील बुरुज ढासळल्याने आता एकत्रित होऊ नाही हे पक्ष ताकदवर राहिलेले नाहीत. दोन्ही ठाकरेंच्या एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला नाशिक शहरातील हा आढावा
Vo 1 नाशिक.. कधीकाळी शिवसेनेची प्रत्येक निवडणुकीची सुरुवात नाशिक मधून होत असे... बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे या दोघांचाही आवडतं ठिकाण असलेलं हे शहर आता ठाकरे बंधूंच्या हातातून निसटू लागला आहे.. 2017 च्या महापालिका निवडणूक मध्ये नाशिक महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत उद्धव सेनेचे ३५ नगरसेवक निवडून आले होते. यातील ५ नगरसेवक भाजपात तर, तब्बल२२ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तीन माजी नगरसेवकांचे निधन झाले असून, आता ठाकरे गटात केवळ ५ नगरसेवक उरले आहेत. त्यामुळे उबाठा गटाचे सुपडेसाफ झालेय.
उबाठातील सध्याचे माजी नगरसेवक
केशव पोरजे सुनीता कोठुळे मंगला आढाव डी. जी. सूर्यवंशी संतोष साळवे
शिंदे गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक
अजय बोरस्ते प्रवीण तिदमे विलास शिंदे मधुकर जाधव हर्षा गायकर सूर्यकांत लवटे आर. डी. धांगडे ज्योती खोले जयश्री खर्जुल किरणगामणे-दराडे पूनम मोगरे श्याम साबळे रंजना बोराडे नयना गांगुर्डे संतोष गायकवाड सुदाम डेमसे दीपक दातीर सुवर्णा मटाले
भागवत आरोटे सीमा निगळ चंद्रकांत खाडे संगीता जाधव
या माजी नगरसेवकांचे निधन
सत्यभामा गाडेकर
कल्पना पांडे
राधा बेंडकोली
मनसेचे 2017 मधील नगरसेवक
मनसे
एकूण नगरसेवक चार
शिल्लक नगरसेवक एक
शिवसेना शिंदे गटात गेलेले नगरसेवक एक
भाजपा मध्ये गेलेले नगरसेवक दोन
Byte राजकीय विश्लेषक
GFX
महायुतीतील पक्षात जाण्याचे फायदे
विकास निधी व प्रशासकीय सहकार्य मिळण्याच
राजकीय स्थैर्य व भविष्यात उमेदवारीची शक्यता
निवडणूक काळात पक्षाकडून अर्थार्जन होण्याची शक्यता
मनसे आणि उभाठा पक्षातील नेतृत्वाबाबत नाराजी
माजी नगरसेवक म्हणून करताहेत उबाठा आणि मनसेला जय महाराष्ट्र
मनसे आणि शिवसेनेतील फूट, नेतृत्वातील गोंधळ
भाजपसोबत युती न केल्याबद्दल नाराजी
कार्यकर्त्यांशी संपर्कातील कमतरता
राजकीय भविष्याची अनिश्चितता
स्थानिक स्वार्थ आणि राजकीय संधी
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची बंदिस्त नेतृत्वशैली
शिंदे गटातील थेट संपर्क व संवादसंपन्न कार्यपद्धती
Vo 2 शहरात दोन्हीही पक्षांची ताकद पूर्णपणे संपली आहे. संपूर्ण प्रभागात किमान तीन नगरसेवक असणे आवश्यक आहे मात्र तेही राहिले नसल्यामुळे कुठलाही प्रभाग आता या दोन्ही पक्षांचा राहिलेला नाही. दोन्ही पक्ष मिळून 122 उमेदवार देणे सुद्धा अवघड ठरणार आहे
Byte मिळाले की पाठवतो
Vo 3 नाशिक सह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात जवळपास अशीच बिकट स्थिती सर्वत्र निर्माण झाली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणामुळे महापालिका निवडणुका शिंदे सेनेची मतं विभागली जाण्याची शक्यता आहे परिणामी फायदा भाजपला होणार हे मात्र निश्चित किती
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_NCP_Protest
Feed on - 2C
--------------------------
Anchor - ओबीसी चे नेते प्रध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जोडे मारो आंदोलन केले. लक्ष्मण हाके यांनी काल त्यांच्या आंदोलना दरम्यान उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्याबाबत अपशब्द वापरले होते. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळलीये. आज नांदेडमध्ये कार्यकर्त्यांनी आय टी आय चौकात एकत्र येत लक्ष्मण हाके यांच्या फोटोला जोडे मारून रोष व्यक्त केला. हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माफी मागितली नाही तर राज्यभरात रस्त्यावर उतरून बदला घेण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षानी दिला.
Byte - बालाजी रावनगावकर - रा. जिल्हाध्यक्ष.
-----------------------
0
Share
Report