Back
जालना: मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण!
Jalna, Maharashtra
FEED NAME | 0407ZT_JALNA_MARHAN(1 FILE)
जालना | मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण,चंदनझिरा पोलिसांत गुन्हा दाखल,2 संशयीतांना अटक
अँकर: जालन्यात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे तिच्या वडीलाला लाठ्याकाठ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे.जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी मधील ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रिसिडेन्सी मध्ये काल ही घटना घडली असून याप्रकरणी जालन्यातील चंदनझीरा पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीसह ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक देखील केली आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Pandharpur, Maharashtra:
04072025
Slug - PPR_GOLD_DRESS
feed on 2c
file 03
-----
Anchor - आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलास सुवर्ण नक्षीकाम असलेला पोशाख होणार परिधान
सोलापूरच्या तिवारी कुटुंबाने 9 तोळे सोने नक्षीकाम असलेला सुंदर पोशाख विठोबाला भेट दिला आहे. हाच सुवर्ण पोशाख आषाढी एकादशी दिवशी परिधान केला जाणार आहे.
देवाचा अंगरखा देवाचा शेला यावर सुंदर नक्षीकाम केले आहे. रुक्मिणी मातेसाठी सुवर्ण ठुशी , बाजूबंद सुद्धा दिले आहेत.पहिल्यांदाच असा पोशाख एकादशीच्या मुहूर्तावर एका भाविकाने देवाला भेट म्हणून दिला आहे.
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- मनसे ऑन एकनाथ शिंदे
फीड 2C
अँकर:- पुण्यातील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात असा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात उल्लेखावरून विरोधकांनी शिंदेंवर प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी जय गुजरात चा उल्लेख केला आहे. यावर अहिल्यानगर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाप्रमुख अनिता दिघे यांनी टीका केली असून तुम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणवता शिवसेनेचे चिन्ह देखील तुम्ही घेतला आहे मग तुमच्या जय गुजरात चा नेमका अर्थ काय?, तुमच्यावर नेमका कोणाचा दबाव आहे असा सवाल उपस्थित केला आहे.
बाईट:- अनिता दिघे, महिला जिल्हाप्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग – सांडपाणी वाहिनी फुटल्याने शेतात केमीकलयुक्त पाणी ........ शेतजमीन नापिक झाल्याने शेतकरयांवर संकट .........
अँकर - रोहा तालुक्यातील खारगाव येथील शेतकऱ्याच्या शेतजमिनीत एमआयडीसी दूषित पाणी शिरल्याने शेती नापीक झाले असून आता पिकवायचं काय आणि खायचं काय हा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे
धाटाव एमआयडीसीतील दूषित सांडपाण्याची वाहिनी खारगाव येथील भारती मळेकर आणि पंकज मळेकर यांच्या शेतातून जाते यंदा शेतीची मशागत करून लावणीच्या कामाची लगबग सुरू असताना त्यांच्या शेतात दूषित पाण्याची पाईपलाईन फुटून केमिकलयुक्त पाणी शेतात पसरल्याने शेतजमीन नापिक झाली आहे. दरवर्षी हा प्रकार सुरू असून संबंधित शेतकरी यांनी वारंवार एमआयडीसी अधिकारी यांच्याशी संपर्क साधत शेतीचे नुकसान होत असल्याची पूर्वकल्पना दिली होती परंतु अधिकारी नेहमीच दुर्लक्ष करत असल्याची त्यांची तक्रार आहे. आपबिती सांगताना शेतकरी मुलांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
बाईट - शेतकरी
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_RAJE_PAWAR
सातारा – माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या चिरंजीवाच्या लग्न समारंभात भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची अनौपचारिक भेट झाली. यावेळी छ. उदयनराजेंनी शरद पवार यांचे स्वागत केले. कार्यक्रमात उपस्थित काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबतही उदयनराजेंची दिलखुलास चर्चा व हास्यविनोद पाहायला मिळाले.
0
Share
Report
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 0407ZT_MAVAL_SUNIL_SHELKE
Total files : 02
Headline -मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड
एसआयटी नेमणार असल्याची गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत घोषणा
Anchor:
पिंपरी-चिंचवडमध्ये एका भयानक कटाचा पर्दाफाश झाला असून मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या संभाव्य हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. यासंदर्भात आमदार शेळके यांनी महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या या सूचनेला उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्याचा निर्णय सात दिवसांत घेण्याची माहिती दिली..
Vo-
सात सराईत गुन्हेगार, नऊ पिस्तूल, ४२ जिवंत काडतुसे... २६ जुलै २०२३ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दरोडाविरोधी पथकाने गुप्त माहितीनुसार तळेगाव दाभाडे परिसरात मोठी कारवाई केली होती. यामध्ये सुरुवातीला दोन गुन्हेगार पकडण्यात आले. त्यानंतर तपासाचा विस्तार करत एकूण सात सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली, ज्यांच्याकडून नऊ पिस्तूल, ४२ जिवंत काडतुसे, कोयते अशा प्राणघातक शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला. या गुन्हेगारांवर आधीच खून, खुनाचा प्रयत्न, जाळपोळ, खंडणी, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, लूट, तोडफोड असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
VO-
आमदार सुनील शेळके यांची हत्या करण्याचाच उद्देश तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली. या गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांचा वापर आमदार सुनील शेळके यांची हत्या करण्यासाठीच होणार होता, असा खुलासा त्यांच्याकडून जबाबामध्ये झाला आहे. हे आरोपी मध्यप्रदेश, जालना, वडगाव, काळेवाडी परिसरातले असून आमदार शेळके यांचे कोणतेही वैयक्तिक वैर त्यांच्याशी नव्हते. त्यामुळे या गुन्हेगारांच्या पाठीमागे कोणी शक्तिशाली सूत्रधार असल्याचा संशय शेळके यांनी विधानसभेत व्यक्त केला.
साऊंड बाईट : सुनील शेळके, आमदार ,मावळ (file no.01)
*"कोण करतंय लाखो रुपयांची गुंतवणूक?" – आमदार शेळके यांचा सवाल*
VO-
शेळके यांनी असे नमूद केले की, ही टोळी गरीब आणि सामान्य कुटुंबातील असूनही त्यांच्याकडे नऊ पिस्तूल, कोयते खरेदी करण्यासाठी लाखोंचा खर्च झाला. एवढेच नव्हे तर, ज्या नामांकित वकिलांनी आरोपींची बाजू घेतली त्यांच्या फीही लाखोंच्या घरात होती. मग या सगळ्यांमागे "हे पैसे कोण पुरवतंय?", आणि "माझ्या हत्या कटामागचा सूत्रधार कोण?", असा थेट सवाल शेळके यांनी उपस्थित केला.
*तडीपार असूनही जिल्ह्यात वावर*
VO-
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तरात सांगितले की, पकडलेले गुन्हेगार दीड वर्ष तुरुंगात होते. नंतर बेल मिळाल्यावर त्यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. मात्र, तडीपार असूनही हे गुन्हेगार पुणे जिल्ह्यात लपून येतात, असा आरोपही आमदार शेळके यांनी केला.
*"सखोल तपास होणार, गरज पडल्यास एसआयटी" – योगेश कदम*
या गंभीर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन योगेश कदम यांनी विधानसभेत उत्तर देताना SIT नेमण्याचा निर्णय पुढील सात दिवसांत घेण्यात येईल, अशी घोषणा केली. या सात गुन्हेगारांपैकी काहींना शस्त्र पुरवणारा "देवराज" नावाचा मध्यप्रदेशातील व्यक्ती असून त्याची माहितीही संबंधित राज्य सरकारला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणात "कोण पैसे पुरवतं?", "मूळ सूत्रधार कोण?", याचा सखोल छडा लावण्याचे आश्वासन गृह राज्यमंत्री कदम यांनी दिले. ही घटना केवळ एका लोकप्रतिनिधीवर जीवघेणा हल्ला करण्याच्या कटापर्यंत मर्यादित न राहता, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही चिंतेची बाब ठरत आहे. आता सर्वांचे लक्ष गृहविभागाच्या एसआयटी नेमणुकीकडे लागले आहे..
साऊंड बाईट : योगेश कदम, गृह राज्यमंत्री (file no.02)
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम :
File:0407ZT_WSM_RAIN_4JULY
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड,मानोरा व मंगरूळपीर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना फटका बसू लागला असून, शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.गेल्या आठ दिवसांपासून काही भागांत सतत आणि जिल्ह्यातील काही भागांत जोरदार सरी कोसळत आहेत.पेरण्या पूर्ण होऊन पिके उगवून आली आहेत.मात्र,पावसामुळं पिकांच्या वाढीस अडथळा ठरत आहे.काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे बी-बियाण्यांचे नुकसान होण्याची शक्यता असून,मूळव्यवस्था सडण्याचा धोका निर्माण झाला आहे.पावसामुळे शेती कामांनाही खंड पडला आहे.
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
Anchor - महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षांची समन्वय समितीची बैठक संपन्न झालेली आहे, या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीच्या नेतृत्वात लढवण्याचा निर्णय झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. धुळे येथे त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळेस माध्यमांशी बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुका महायुतीत लढण्यासंदर्भात कार्यकर्त्यांची मत जाणून घेण्यासाठी मेळावे घेत असल्याचे सांगितले. महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांची निवडणूक महायुतीच्या नेतृत्वात लढण्याबाबत एकमत झालेला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना व नेत्यांनाही त्याबाबत समजून घेत त्यांची मत जाणून घेण्यासाठी आपण आले असून समन्वय साधण्यासाठी राज्य दौरा करत असून उत्तर महाराष्ट्र पासून या दौऱ्याची सुरुवात झालेली आहे. या दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची भूमिका ही तटकरे यांनी मांडली. पक्षांमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नवीन कार्यकर्ते आणि जुने कार्यकर्ते यांच्यातही समन्वय साधण्यासाठी हा दौरा असल्याचा त्यांनी सांगितलं.
Byte - खासदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - रूपाली चाकणकरांच्यावर आरोप केल्याप्रकरणी तृप्ती देसाईसह पीडित महिलेवर गुन्हा दाखल..
अँकर - राज्य महिला आयोगाच्या
अध्यक्षा रूपाली चाकण यांच्यावर आर्थिक आरोप प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या व भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या विरोधात सांगलीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तृप्ती देसाईसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. राज्य महिला आयोगाच्या सचिव डॉक्टर पद्मश्री बनाडे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.सांगलीच्या कडेगाव येथील तत्कालीन पोलीस निरीक्षकाने केलेल्या एका बलात्कार प्रकरणी भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पीडित महिलेसह सांगलीत पत्रकार परिषद घेऊन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप केला होता.
दरम्यान गुडा दाखल झाल्या प्रकरणी तृप्ती देसाई यांनी रूपाली चाकणकरांच्यावर टीका केली करत महिलांच्यावरील अत्याचाराबाबत आवाज उठवल्यावर पीडित महिलेला न्याय मिळायला हवा होता पण महिला आयोगाकडून पीडित महिलेसह माझ्यावरच गुन्हा दाखल केला जातोय,हे निषेधार्य असल्याचं तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
बाईट - सुधीर भालेराव - पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे -सांगली.
बाईट - तृप्ती देसाई - अध्यक्ष -भूमाता ब्रिगेड.
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
Anchor - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदे दरम्यान पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. धुळे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुने कार्यकर्ते प्रमोद साळुंखे यांनी भर पत्रकार परिषदेत आपल्याला विश्वासात घेतल जातं नसल्याची खंत माडळी. त्यामुळे काही काळ पत्रकार परिषदेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सुनील तटकरे यांनी प्रसंग अवधान राखत जुन्या आणि नवीन कार्यकर्ते यांच्यामध्ये समन्वय साधला जाईल असं सांगत, विषय आवरता घेतला. पक्षाचे अंतर्गत विषय हे पक्षाच्या व्यासपीठावर मांडायचे असतात पत्रकार परिषदेत नाही असे तटकरे यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर अन्य कार्यकर्त्यांनी तक्रार करणारे कार्यकर्त्याला बाजूला नेत समजूत घातली.
byte - खा, सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, एनसीपी
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
Anchor - विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणी प्रमुख विरोधक आहे, असं दिसून येत नाही, अअसा उपरोधित टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी लावला आहे. धुळे येथे माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हा खोचक टोला काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाला लावला. विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने जो कौल दिलेला आहे, त्यावरून जनमानस लक्षात येत. त्यामुळे प्रमुख विरोधक कोणी नसला, तरी महायुती सर्व ताकदीनिशी आणि गाफील न राहता निवडणुका लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केला आहे.
बाईट - खासदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report