Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

विवाहित महिलेची आत्महत्या: सोशल मीडियावर व्हिडीओंची धमकी!

GANESH MOHALE
Jul 05, 2025 08:32:10
Washim, Maharashtra
वाशिम: File:0507ZT_WSM_WOMAN_SUICIDE रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशिम च्या कारंजा शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेने सोशल मीडियावर तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यानंतर आत्महत्या केली.या प्रकरणी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून कारंजा पोलिसांनी एक आरोपी अटक केला असून, दुसरा आरोपी सध्या फरार आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित महिलेचा कथित प्रियकर शेख मोबीन शेख वाजीद रा.दाईपुरा, कारंजा याने तिच्याशी ओळख वाढवून विश्वासात घेतले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले.या संबंधाचे व्हिडीओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली.तसेच, जर तिने पोलिसांत तक्रार दिली, तर तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.या मानसिक आणि सामाजिक त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या पतीने तक्रारीत केला आहे.या प्रकरणी कारंजा शहर पोलीस ठाण्यात शेख मोबीन शेख वाजीद आणि त्याचा भाऊ शेख अमीन शेख वाजीद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी शेख अमीन शेख वाजीद यास अमरावती येथून अटक केली असून, दुसरा आरोपी मोबीन सध्या फरार आहे.पोलीस त्याचा शोध घेत असून, पुढील तपास सुरू असल्याची माहित पोलीसांनी दिली आहे. बाईट:वसंता ठाकरे,पोलीस उपनिरीक्षक 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement