Back
अंबरनाथमध्ये मनसैनिकांनी छापले ठाकरे बंधूंचे टी-शर्ट!
Ambernath, Maharashtra
अंबरनाथमध्ये मनसैनिकांनी छापले ठाकरे बंधूंच्या फोटोंचे टी-शर्ट!
टी-शर्ट वर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो
तर श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो
Amb mns
Anchor : अंबरनाथमध्ये मनसैनिकांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो असलेले टी-शर्ट छापले आहेत. ५ जुलै रोजीच्या मोर्चात मनसैनिक हे टी-शर्ट घालून सहभागी होणार होते, मात्र आता दोन्ही पक्षांच्या विजय मेळाव्यात मनसैनिक हे टी-शर्ट घालून सहभागी होणार आहेत.
Vo : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात या दोघांचेही पक्ष एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नव्हे, तर आता ५ जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंचं नाव असलेली निमंत्रण पत्रिका देखील समोर आली असून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रितपणे मेळाव्याच्या तयारीची बुधवारी सकाळी पाहणी देखील केली आहे. याच पार्श्वभूमीवर अंबरनाथमधील मनसैनिकांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो असलेले टी-शर्ट छापले आहेत. हे टी-शर्ट मनसैनिक ५ जुलै रोजी च्या मोर्चामध्ये घालणार होते, मात्र मोर्चा रद्द झाल्यामुळे आता विजयी मेळाव्यात हे टी-शर्ट घालून मनसैनिक सहभागी होणार आहेत. पक्षाच्या बैठकीसाठी अंबरनाथमध्ये आलेले मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासमोर मनसैनिकांनी हे टी-शर्ट परिधान केले. यावेळी अविनाश जाधव यांनी देखील ५ तारखेला दोन्ही ठाकरे बंधू नक्की एकत्र येतील आणि महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल, असं म्हणत या मनसैनिकांचं कौतुक केलं.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement