Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

बिबट्या पाण्याच्या पाईपमध्ये अडकला, गावकऱ्यांनी केली तात्काळ मदत!

PRAVIN TANDEKAR
Jun 28, 2025 03:05:40
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara Slug - 2806_BHA_LEOPARD FILE - 1 VIDEO 1 IMAGE पाण्याच्या पाईपमध्ये अडकून आढळला बिबट Anchor- लाखनी तालुक्यातील डोंगरगाव ते रामपूरी पांदन रोडावरील पाण्याच्या पाईपमध्ये बिबट्या अडकून बसल्याची घटना घडली. दरम्यान, याबाबतची माहिती गावकऱ्यांनी वनरक्षकांना दिली. ही माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी, लाखनी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून बिबट्याच्या बचावासाठी भंडारा वनविभागाच्या वन्यप्राणी बचाव दलाला (शिघ्र कृती दल) पाचारण करण्यात आले. बचाव दलाने घटनास्थळाची पाहणी करून पाईपाच्या एका बाजूस पिंजरा लावून बिबट्याला यशस्वीपणे जेरबंद केले. बिबट्याची शारीरिक तपासणी करून तो सुदृढ असल्याचा अहवाल दिल्याने त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement