Back
लोणावळ्यात हिट अँड रन: एकाचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी!
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 0107ZT_MAVAL_HIT_RUN
Total files : 04
Headline : लोणावळ्यात हिट अँड रनमुळे एकाच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
Anchor:
लोणावळ्यातील हॉटेल मिस्टी मेडोजकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका भरधाव स्कॉर्पिओने रस्त्याच्या कडेला कट्ट्यावर बसलेल्या दोघांना जोरात धडक दिली. या हिट अँड रनमुळे एका तरुण मुलाला आपला जीव गमवावा लागला, तर दुसरा त्याचा मित्र गंभीर असून त्याची प्रकृती गंभीर आहे.. हा अपघात उत्तरप्रदेश येथील पर्यटकाच्या गाडी चालकाने मधप्राशन करून बेदकारपणे गाडी चालवत एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलाय.. स्थानिकांनी ही अपघातग्रस्त गाडी रागाच्या भरात पेटवूनन दिली. या आगीत गाडी जळून खाक झाली. मयत कार्तिक उल्हास चिंचणकर, व गंभीर जखमी मित्र आयान मोहम्मद शेख हे रस्त्याच्या कडेला कट्ट्यावर बसले असताना, स्कार्पिओ - क्र. UP 80 DC 9000 या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. मोटार चालक हा दारुच्या नशेत असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. तर या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी स्कार्पिओ कारचा चालक तुलसीराम रामपाल यादव, रा. सध्या मुंबई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अपघात झाल्यावर या स्कॉर्पिओ गाडीत दारूच्या बाटल्या आढळून आल्यात..पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहे.
बाईट : स्थानिक (file.no.03)
फोटो : मयत कार्तिक (file.no.04)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement