Back
नाशिकच्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग वाढला!
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn jayakwadi av
Feed attached
नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वरील धरणांतून गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने जायकवाडी धरणात पाण्याची आवक सध्या ६ हजार ८७४ क्युसेकने सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा ४५ टक्क्यांवर आला असून मागील वर्षाच्या तुलनेत ४० टक्के पाणीसाठा अधिक आहे. मागील वर्षी याच दिवशी जायकवाडीत ४.५४ टक्के साठा होता. जायकवाडी धरण क्षेत्रात पाऊस नसला तरीही वरील भागात पाऊस झाल्याने गोदावरीवरील अनेक छोट्या-मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठाही वाढला असून, मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातसुद्धा पाण्याची आवक दहा दिवसांपासून सुरू आहे. आवक सुरू असून धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी आतापासून नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. सध्याचा पाणीसाठा बघता मराठवाड्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून पावणेदोन लाख हेक्टर शेतीलादेखील पाणी यातून मिळेल एवढे पाणी सध्या जायकवाडीत उपलब्ध आहे. आवक सुरू असल्याने जायकवाडी पुढील दोन-तीन दिवसांत पन्नास टक्क्यांवर जाईल
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_CHIKHALDARA दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
चिखलदरा शहराला पाणीपूरवठा करणारा शक्कर तलाव कोरडा ठण; शहराला दोन दिवसाआड होतो पाणीपुरवठा
अँकर :– अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मधील चिखलदरा शहराला पाणीपूरवठा करणारा शक्कर तलाव कोरडा ठण पडला आहे त्यामुळे विदर्भाचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा शहरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई पाहायला मिळत आहे. तलाव कोरडा पडल्याने शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा होतो तलाव कोरडा पडला असल्याने यावर अवलंबून असलेला पर्यटनाचा व्यवसाय देखील ठप्प झाला असून तलावातील बोटींगही बंद करण्यात आली आहे त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
शिंपोली मेट्रो स्टेशन नामांतराला स्थानिकांचा विरोध
Anchor - बोरिवली पश्चिम येथील शिंपोली मेट्रो स्टेशनचे नाव बदलून ‘आदित्य कॉलेज शिंपोली मेट्रो स्टेशन’ करण्यात आल्याने स्थानिकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. या निर्णयाविरोधात स्थानिकांनी मेट्रो स्थानकाखाली जमाव करून घोषणाबाजी केली.
यूबीटी शिवसेना शाखाप्रमुख सागर सर्फर यांनी सांगितले की, “शिंपोली हे १५० वर्षे जुने गाव आहे. खासगी कॉलेजच्या नावामुळे गावाची ओळख पुसण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही.”
स्थानिकांनी प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, तोपर्यंत नाव न बदलल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Byte - सागर सफरे (UBT शिवसेना - शाखा प्रमुख)
0
Share
Report
Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Kolhe Gmrt
File:02
Rep: Hemant Chapude (Junnar)
*खोडद दुर्बीण भरती प्रक्रिया गैरव्यवहार संसदेत मांडणार..खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची माहिती*
Anchor:आशिया खंडातील सर्वात मोठा रेडिओ दुर्बीण प्रकल्प अशी ओळख असलेल्या खोडद ग्रामस्थांनी आज शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांची नारायणगाव येथे भेट घेत निवेदन दिलेय.."जुन्नर तालुक्याच्या विकासाला पाचर ठोकणाऱ्या 'जी एम आर टी' चा जाहीर निषेध करत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर 14 प्रश्न उपस्थित करत सध्या सुरू असणाऱ्या भरती प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारावला वाचा फोडली आहे...दोन दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी एक विशेष ग्रामसभा घेत काही सवाल सुद्धा केले होते.
आज खासदार डॉ.कोल्हे यांची भेट घेतल्यानंतर डॉ कोल्हे यांनी सुद्धा या विषयात आपण जातीने लक्ष घालणार असल्याची माहिती दिलीये..
Gmrt सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रोजेक्ट मध्ये खोडद ग्रामस्थांचं मोठं योगदान असताना कामगार भरती प्रक्रियेत स्थानिकांना पूर्णपणे डावलण्यात आलं आहे आणि एकुणच भरती प्रक्रियेत असंख त्रुटी असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.शिवाय सिलेक्ट झालेले उमेदवार स्थानिक कायम कर्मचा-यांचे नातेवाईक असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या असून ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी प्रशासनाला उत्तर द्यावे लागेल आणि हा प्रश्न आपण प्रश्न संसदेत सुद्धा मांडणार असून संबंधित मंत्र्याना सुद्धा पत्रव्यवहार करून पारदर्शक पद्धतीने भरती व्हावी या साठी प्रयत्न करणार असल्याची माहिती शिरुरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी दिलीये..
----------------
बाईट-डॉ अमोल कोल्हे, खासदार
---------------
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Share
Report
Nagpur, Maharashtra:
फोटो असाइन्मेंट नंबर वर व्हाट्सअप केला आहे
---
*एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटल येथे प्लास्टिक सर्जरीद्वारे लिंगाची पुनर्रचना*
• 9.5 तासांची यशस्वी शस्त्रक्रिया.
लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर येथे प्लास्टिक सर्जनच्या चमूने मध्यभारतात पहिल्यांदाच राजस्थानमधील एका तरुणाचे (वय 40) संपूर्ण लिंग एकाच टप्प्यात पुन्हा तयार करून एक दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. या रुग्णाला 8 वर्षांपूर्वी कर्करोगामुळे लिंग गमवावे लागले होते.
लिंगाच्या रचनेसाठी, रुग्णाच्या हाताच्या वरच्या बाजूला शाफ्ट आणि मूत्रमार्ग (मूत्रमार्गाची नळी) पुनर्बांधणी करण्यात आली आणि नंतर जघन भागात लावण्यात आले. लिंगात रक्तपुरवठा करणे, नसांमध्ये पूर्ण संवेदना प्रदान करणे आणि एक कार्यशील अवयव निर्माण करण्यासाठी सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडणे या बाबींचा समावेश या शस्त्रक्रियेमध्ये होता. ही संपूर्ण शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या चमूला पूर्ण करण्यासाठी 9.5 तास लागले.
अशा शस्त्रक्रियांना मायक्रोव्हस्क्युलर शस्त्रक्रिया म्हणतात. यासाठी आवश्यक असलेला अत्याधुनिक ऑपरेटिव्ह मायक्रोस्कोप लता मंगेशकर हॉस्पीटल येथे उपलब्ध आहे. कर्करोगाव्यतिरिक्त अशा पुनर्रचनात्मक प्रक्रिया, ट्रॉमाटिक (अपघाती) लिंग विच्छेदन आणि लिंग पुष्टीकरण शस्त्रक्रिया (लिंग बदल शस्त्रक्रिया) असलेल्या रुग्णांसाठी या सुविधा फायदेशीर ठरू शकतात.
अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी या कार्याचे कौतुक केले आणि प्लास्टिक सर्जरी विभागाच्या वैद्यकीय चमूचे अभिनंदन केले. डॉ. जितेंद्र मेहता, डॉ. समीर महाकाळकर, डॉ. अश्विनी पंडितराव, डॉ. देव पटेल, डॉ.अभिराम मुंडले, डॉ. कंवरबीर, डॉ. पल्लवी या चमूने ही कामगिरी पार पाडली. डॉ. अंजली भुरे, डॉ. मधुश्री शहा, डॉ. केतकी मारोडकर, डॉ. रचना नैताम, डॉ. गुंजन यांनी या प्रक्रियेसाठी बधिरीकरणाचे काम केले. वैद्यकीय अधिक्षक व उपअधिष्ठाता डॉ. नितीन देवस्थळे यांनी सर्व लॉजिस्टिक सपोर्ट प्रदान केला. शस्त्रक्रियेतून रुग्ण पूर्ण बरा झाला आहे.
-----
असाइन्मेंट नंबर वर व्हाट्सअप ला फोटो पाठवला आहे
तर हॉस्पिटल चा व्हिडिओ 2cला जोडला आहे
_-----**-
2c ला फोटो आणि डॉ बाईट जोडला आहे
--------
0
Share
Report
Kolhapur, Maharashtra:
Kop CPR Body
Feed:- 2C
Anc:- कोल्हापूर शहरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भर पावसात एका व्यक्तीच्या मृत्युदेहाची हेळसांड करण्यात आली आहे. एका अर्थाने मृत्यूनंतरही छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय प्रशासनाने संबंधित मृत व्यक्तीला नरक यातना दिल्याचे समोर आले आहे.. एक तासाहून अधिक काळ मृत्यदेह पावसात ठेऊन कर्मचारी गायब झाला होता.. हा प्रकार ज्या लोकांच्या नजरेस पडला त्यांनी याचे व्हिडिओ समाज माध्यमावर टाकले आहेत..
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
बदलापूर जवळील भोज धरणावर पर्यटकाची मस्ती अंगाशी
पाण्याचा प्रवाहात अडकलेल्या व्यक्तीची केली सुटका
Bdl kondeshvar
Anchor बदलापूर जवळील भोज धरणाच्या बंधाऱ्यातुन निघणाऱ्या पाण्याशी मस्ती करणे एका पर्यटकाला चांगलंच अंगाशी आलं, या पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या या व्यक्तीला त्याच्या सोबतच्या साथीदार आणि इतर पर्यटकांच्या मदतीने वाचवण्यात आलं , या व्यक्तीला इतर पर्यटकांच्या मदतीने काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, बदलापूर जवळील कोंडेश्वर हे पर्यटन स्थळ असून या पर्यटन स्थळाच्या बाजूला भोज धरण आहे . या भोज धरणाच्या बंधाऱ्यावरुन पडणाऱ्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येत असतात, मात्र पाण्याचा अंदाज नसतानाही काही पर्यटक या बंधाऱ्यावर मस्ती करतात मात्र अशी मस्ती ही पर्यटकांच्या जीवावर बेतते , पर्यटकांच्या अशाच वागण्यामुळे अनेक पर्यटन स्थळांवर शासनाकडून बंदी घालण्यात येते
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0307ZT_WSM_HEALTH_CENTER_CLOSED
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम च्या मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील नव्याने बांधण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्रावर गेल्या सात वर्षांपासून बंद स्थितीत असून,मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आणि आवश्यक आरोग्य सुविधा नसल्यामुळे हे केंद्र कार्यान्वित होऊ शकलेले नाही. परिणामी गावातील रुग्णांना उपचारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागत असून,यामुळे त्यांना आर्थिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांनी वेळोवेळी आरोग्य विभागाकडे उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.मात्र संबंधित प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा नव्याने बांधण्यात आलेल्या इमरतिची दुरावस्था होतं असून
आरोग्य सेवा मिळावी ही नागरिकांची मूलभूत गरज असताना,तीच न मिळाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे.गावात नव्याने इमारत बांधून तयार असतानाही ते आरोग्य उपकेंद्र सुरु करण्यात यावे,ही आमची मागणी असून,प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाने याची तातडीने दखल घेऊन कोळगाव उपकेंद्र सुरु करावे,अशी जोरदार मागणी सध्या गावकऱ्यांकडून होत आहे.
बाईट:विजय शेंडगे,स्थानिक नागरिक,कोळगाव
0
Share
Report
Kolhapur, Maharashtra:
Kop Sanjay Powar Byte
feed:- 2C
संजय पवार बाईट मुद्दे
उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरही संजय पवार यांची नाराजी कायम
संजय पवार उपनेते पदाच्या राजीनाम्यावर ठाम
रविकिरण इंगवले यांची जिल्हाप्रमुख पदावरील नियुक्ती रद्द न करण्याचेच संजय पवार यांना उद्धव ठाकरेंकडून संकेत
कोल्हापूर ते मातोश्री लां जोडणाऱ्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करा
संजय पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली मागणी
कोल्हापुरातून चुकीची माहिती मातोश्री पर्यंत पोहोचते का याची एकदा चौकशी करा
नेत्यांसमोरच संजय पवार यांनी उद्धव ठाकरे यांना केली विनंती
संजय पवार यांचा विनायक राऊत यांच्यासह संपर्कप्रमुख आणि मुंबईतील वरिष्ठ नेत्यांवर आक्षेप
उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यामुळे मी नाराज झालोय
सध्या तरी मी कोणत्याही अन्य पक्षांचा विचार केलेला नाही
अशीच वागणूक मिळणार असेल तर दुसरा पर्याय तरी काय?
उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर संजय पवार यांनी व्यक्त केली उद्विग्नता
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
Date-3july2025
Rep-prathamesh tawade
Loc-mira bhayander
Slug-MIRAROAD PROTEST
Feed send by 2c
Type -PKG
Slug- मिरा भाईंदर मध्ये अमराठी व्यापाऱ्याला मनसे मारहाण प्रकरण
आज मीरा भाईंदर मध्ये व्यापाऱ्यांची बंदची हाक
एकत्र येऊन निषेध केला व्यक्त.
अँकर - मिरारोड मध्ये मारवाडी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मराठी बोलण्यावरून चोप दिला होता , त्यानंतर आज मनसे विरोधात मीरा-भाईंदर मध्ये जैन , मारवाडी , गुजरात व्यापारी संघटनेने मिरा भाईंदर मध्ये बंदची हाक दिली आहे... शेकडो व्यापारी व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले..
मिरा रोड पूर्वेच्या हिरवी हॉलमध्ये या सर्व नागरिकांनी जमल्यानंतर हाताला काळया फीती बांधून घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत आंदोलण केले. ..मोर्चा काढण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती अशी माहिती समोर येत आहे... अखेर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत अशी समजूत काढून वातावरण शांत केले...
बाईट- प्रकाश गायकवाड, डीसीपी.
बाईtu-आंदोलनकर्ते , व्यापारी .
0
Share
Report
Pune, Maharashtra:
pimpri bhondu baba
kailas puri, Pune, 3-7-25
feed by 2c
बावधन मधील भोंदू बाबाच्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट मध्ये काय दडलय.. पोलिसांचा शोध सुरू...!हजारो अश्लील व्हिडिओ असण्याची शक्यता...
121 सुनील कुराडे,ACP
Anchor जी साधकांच्या मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करत त्यांचे खाजगी क्षण पाहणाऱ्या भोंदू बाबा प्रसाद तामदार याची पोलीस कोठडी संपत असतानाच पोलिसांनी या भोंदू बाबाच्या गळ्याभोवती फास आवळायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी भोंदू बाबाच्या आश्रमातून 3 मोबाईल 2 ipad,सोलोपोशे 0.5md च्या गोळ्याच मोकळं पाकीट, प्रोव्हेनॉल च्या 9 गोळ्या,सिमकार्ड आणि pen drive हे साहित्य जप्त केलं आहे भोंदू बाबा इलेक्ट्रॉनिक गॅझेट मध्ये अनेक अश्लील व्हिडिओ क्लिप्स असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यासाठीच पोलीस हे सर्व साहित्य न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवणार असून त्यामध्ये नेमका कोणता डाटा आहे याची माहिती घेणार आहेत.दरम्यान भोंदू बाबा कडे तसेच इतर वैद्यकीय औषधही मिळाली आहेत. त्यांचा नेमका वापर काय आहे याचीही तपासणी पोलीस करणार आहेत.याचं संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
kailas 1 to 1 + vis
0
Share
Report